लोकशाही टिकविणाऱ्या पत्रकारांसाठी राजकीय पक्षांनी मतभेद विसरून एकत्र यावे : खा. मेंढे
– प्रेस ट्रस्ट ऑफ गोंदियाचा सातवा स्थापना दिन
गोंदिया : जगातील सर्वात मोठी आणि प्रगल्भ लोकशाही म्हणून आपला देश ओळखला जातो. माध्यमांच्या प्रतिनिधींनी जीवावर उदार होऊन ही लोकशाही टिकविली आहे. त्यामुळे या पत्रकारांच्या कल्याणासाठी आता आपण पुढे आले पाहिजे. मतभेद विसरून सर्वांनी गोंदिया जिल्ह्यातील पत्रकारांना हक्काचा निवारा आणि पत्रकार भवन निर्माण करण्यासाठी मंजूर केलेली जागा तातडीने हस्तांतरित करावी.
मुंबई आणि दिल्ली येथून सहा महिन्यात हा तोडगा निघावा, अशी अपेक्षाही भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खा. सुनील मेंढे यांनी व्यक्त केली.
ते 1 सप्टेंबर रोजी द गेटवे हॉटेल येथे आयोजित प्रेस ट्रस्ट ऑफ गोंदियाच्या सातवे स्थापना दिन व सत्कार सोहळा कार्यक्रमात उद्घाटक म्हणून बोलत होते.
प्रेस ट्रस्ट ऑफ गोंदियाचे अध्यक्ष अपूर्व मेठी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमात प्रमूख पाहुणे म्हणून आ. विनोद अग्रवाल, आ. मनोहर चंद्रिकापुरे, जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले, जिल्हाधिकारी नयना गुंडे, माजी आमदार राजेंद्र जैन, अदानी प्रकल्पाचे पियुष दिगावकर, माजी नगराध्यक्ष अशोक इंगळे, विरेंद्र अंजनकर, सचिव रवि आर्य आदी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा आणि संस्थांचा गौरव करण्यात आला.
यात विशेषत्वाने स्व.रणजितभाई जसानी स्मृति प्रित्यर्थ जिल्हा गौरव सामाजिक सेवा पुरस्कार कुष्ठरोगासाठी सेवाकार्य करणाऱ्या डॉ.जगन्नाथ राऊत, स्व.रामकिशोर कटकवार स्मृति प्रित्यर्थ जिल्हा गौरव कर्तव्यनिष्ठ पुरस्कार उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, स्व. रामदेव जायस्वाल स्मृति प्रित्यर्थ जिल्हा गौरव साहित्यरत्न पुरस्कार रमेश शर्मा, स्व.मोहनलाल चांडक स्मृति प्रित्यर्थ जिल्हा गौरव कृषीरत्न पुरस्कार चोपराम कापगते, सहयोग संस्थानतर्फे शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हा गौरव पुरस्कार खुशबू जगणे यांचे शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व धनादेश देऊन सत्कार करण्यात आला. तसेच प्रेस ट्रस्ट ऑफ गोंदियाचा जीवन गौरव पुरस्काराने ज्येष्ठ पत्रकार संतोष नागनाथे यांना देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात विशेष म्हणजे कोरोना काळात सोनझारी समाजाद्वारे मोक्षधाम येथे केलेल्या सेवा कायार्साठी त्यांचा सत्कार करण्यात आला. हा सत्कार रामु बेहरे, विक्रम बेहरे आदींनी स्विकारला.
याप्रसंगी आ. विनोद अग्रवाल यांनी प्रेस ट्रस्ट ऑफ गोंदियाच्या कार्यक्रमाची स्तूती करून समाजातील हिरे शोधून त्यांच्या सत्काराच्या परंपरेचे कौतुक केले व आपण नेहमीच पत्रकारांच्या हितासाठी व कल्याणार्थ कार्य करणाऱ्या प्रेस ट्रस्टच्या सोबत असल्याचे सांगितले. आ. मनोहरराव चंद्रिकापूरे यांनी लोकशाहीत समाजाला आरसा दाखविणाऱ्या पत्रकारांच्या जिवनातील संघर्षाबाबत बोलून दिवसेंदिवस बदलत असलेल्या पत्रकारीतेमुळे पडत असलेल्या प्रभावाबाबत सांगितले. माजी आ. राजेंद्र जैन यांनी पत्रकारांना वेळोवेळी सहकार्याची भुमिका आपली असून पत्रकार भवनासाठी सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी जि.प. अध्यक्ष पंकज रहांगडाले, माजी नगराध्यक्ष अशोक इंगळे, विरेंद्र अंजनकर, पियुष दिगावकर यांनी आपल्या मनोगतातून सत्कारमुर्तींचे अभिनंदन करून प्रेस ट्रस्टच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. अपूर्व मेठी यांनी आपल्या अध्यक्षीय संबोधनातून प्रेस ट्रस्ट ऑफ गोंदियाची वाटचाल व भविष्यातील उद्दिष्टांबाबत सांगुन पत्रकारांचे समाजासाठीही काही देणे आहे, या उद्देशातून समाजाच्याच सहकार्याने हा कार्यक्रम असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव रवि आर्य यांनी केले. संचालन उपाध्यक्ष जयंत शुक्ला यांनी तर आभार कोषाध्यक्ष हिदायत शेख यांनी मानले.
कार्यक्रमात प्रामुख्याने अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, निवासी उपजिल्हाधिकारी जयराम देशपांडे, तहसीलदार धनंजय देशमुख, अनिल खडतकर, न.प. प्रशासक व मुख्याधिकारी करण चव्हाण, जयदिप जसानी, निरज कटकवार, अशोक चांडक, जयेश रमादे, माणिक गेडाम, दिलीप संघी, दिलीप जैन, माधुरी नासरे, पोलिस निरीक्षक बबन आव्हाड, संदेश केंजळे, महेश बंसोडे, चंद्रकांत सुर्यवंशी, अजय भुसारी, डॉ. गजानन डोंगरवार, भिकम शर्मा, छैलबिहारी अग्रवाल, देवेश मिश्रा, जिवनेश मिश्रा, दिपक कदम, भावना कदम, संजय कुलकर्णी, अजय श्यामका, निलेश कोठारी, गजेंद्र फुंडे, सुनील तरोणे, अविनाश काशिवार, नारायण चांदवाणी, चंद्रकांत खंडेलवाल, अतुल दुबे, अनंत दिक्षित, नितीश शाह, दिनेश उके आदिंसह जिल्ह्यातील मान्यवर व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष संतोष शर्मा, अंकूश गुंडावार, जावेद खान, हरींद्र मेठी, कपिल केकत, प्रमोद नागनाथे, मुकेश शर्मा, आशिष वर्मा, राजन चौबे, योगेश राऊत, दिपक जोशी, सौ.अर्चना गिरी, बिरला गणवीर, नरेश रहिले, भरत घासले, संजीव बापट आदिंनी परिश्रम घेतले.
…………………
पत्रकार भवनासाठी प्रशासन सहकार्य करणार : जिल्हाधिकारी गुंड
यावेळी आपल्या मनोगतातून जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी प्रेस ट्रस्टच्या सत्कार कार्यक्रमाचे कौतुक करून सत्कारासाठी योग्य व्यक्तींची निवड केल्याचे सांगितले. पत्रकार भवन हा जिल्ह्यासाठी महत्वाचा मुद्दा असून ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रशासन सर्वोतोपरी सहकार्य व मदत करण्याची त्यांनी ग्वाही दिली. याप्रसंगी त्यांनी सोनझारी समाजाच्या कार्याचे गौरव करून त्यांना असलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आपण तत्पर असून त्यांना कार्यालयात भेटण्यासाठी आमंत्रित केले.