Category: विदर्भ

  • तनाएरा नवे फेस्टिव्ह कलेक्शन ‘मियारा’ सादर; यंदाच्या सणासुदीत दोन अंकी वाढीचे अनुमान विशेष ऑफर्स आणि अनोखी खरेदी योजना ग्राहकांना मिळणार स्वप्नपूर्तीचा आनंद

    तनाएरा नवे फेस्टिव्ह कलेक्शन ‘मियारा’ सादर; यंदाच्या सणासुदीत दोन अंकी वाढीचे अनुमान विशेष ऑफर्स आणि अनोखी खरेदी योजना ग्राहकांना मिळणार स्वप्नपूर्तीचा आनंद

    तनाएरा नवे फेस्टिव्ह कलेक्शन ‘मियारा’ सादर; यंदाच्या सणासुदीत दोन अंकी वाढीचे अनुमान
    विशेष ऑफर्स आणि अनोखी खरेदी योजना ग्राहकांना मिळणार स्वप्नपूर्तीचा आनंद
    नागपूर, WH NEWS दि. १७ सप्टेंबर २०२५ : महिलांच्या एथनिक वेअर ब्रँड टाटा परिवारातील एक सदस्य असलेल्या तनाश्रयने यंदाच्या सणासुदीत आपले नवे फेस्टिव्ह कलेक्शन ‘मियारा’ सादर केले आहे. पारंपरिकतेला आधुनिक डिझाईन्सची जोड देत आकर्षक एथनिक वेअर महिलांसाठी तयार करण्यात आले असून, यात विविध प्रसंगांसाठी शोभतील असे सुंदर पेहराव उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

    ‘मियारा’ कलेक्शनची वैशिष्ट्ये :
    • आधुनिक डिझाईन्ससोबत पारंपरिक कलांची झलक
    • उत्सव-लग्न समारंभांसाठी योग्य पेहराव
    • समृद्ध रंगसंगती आणि विविध फॅब्रिक्सची उपलब्धता
    या निमित्ताने तनाश्रयने ग्राहकांसाठी खास ऑफर्स जाहीर केल्या आहेत. १०,००० रुपयांच्या खरेदीवर ग्राहकांना १,००० रुपयांचे रिडीम कूपन, तर १५,००० रुपयांवरील खरेदीवर २,००० रुपयांचे गोल्ड कॉईन मोफत देण्यात येणार आहेत. ही ऑफर २० ऑक्टोबर २०२५ पर्यंत लागू असेल.
    तनाएरा रिटेल प्रमुख अनिर्बान बॅनर्जी म्हणाले, “विशेष ऑफर्स आणि गोल्डन कूपन योजनेमधून आमची इच्छा आहे की, तनाएरा साडी हा यंदाच्या सीझनमधील ग्राहकांची सर्वात सार्थक निवड बनावी. बाजारपेठेत तेजी आहे आणि आमचे अनुमान असे आहे की, या संपूर्ण सणासुदीच्या काळात आमच्या व्यवसायात दोन अंकी वाढ होईल.”

    ‘मियारा’ सोबत सणांचा आनंद दुप्पट करण्यासाठी खास साड्या सुद्धा बाजारात आणल्या आहेत. या साड्यांची किंमत ६,४९९ रुपयांपासून पुढे आहे. स्वतःसाठी खास खरेदी म्हणून, विचारपूर्वक निवडलेल्या या साड्या कायम लक्षात राहतील अशी भेट ठरणार आहे. ग्राहकांना अनुभव मिळवण्याचे आणि हाताने विणलेल्या साड्या स्वतःच्या वॉर्डरोबमध्ये सामील करण्याचे नवे मार्ग तनाएरा ने सादर केले आहेत.
    ग्राहकांसाठी उपलब्ध ठिकाणे :
    तनाश्रय शोरूम – किंग्सवे, स्टेशन रोड, नागपूर

  • Nagpur। नागपुर में बनेगा ‘डिजिटल हाऊस’, डिजिटल मीडिया ने लिया बड़ा निर्णय

    Nagpur। नागपुर में बनेगा ‘डिजिटल हाऊस’, डिजिटल मीडिया ने लिया बड़ा निर्णय

    नागपुर में बनेगा ‘डिजिटल हाऊस’, डिजिटल मीडिया ने लिया बड़ा निर्णय

    नागपुर : बदलते दौर के साथ अब डिजिटल मीडिया भी ‘एक्शन मोड’ में दिखाई दे रहा है। नागपुर डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल संघ की ओर से शहर में एक भव्य ‘डिजिटल हाऊस’ बनाने का निर्णय लिया गया है। शनिवार (13 सितंबर) को रविभवन में आयोजित बैठक में यह अहम फैसला लिया गया। बैठक की अध्यक्षता संघ के अध्यक्ष भीमराव लोणारे ने की, जबकि सचिव विजय खवसे, वरिष्ठ पत्रकार ममता खांडेकर और अमित वानखेडे उपस्थित थे।

    हाल ही में नागपुर प्रेस क्लब में भाजपा प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण की प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडिया के चुनिंदा पत्रकारों के साथ बैठक आयोजित की गई थी। इस बैठक में डिजिटल मीडिया के संपादकों को बुलाया ही नहीं गया। दरअसल, नागपुर प्रेस क्लब द्वारा लगातार डिजिटल माध्यमों के साथ सौतेला व्यवहार किया जा रहा है। इसी कारण संघ ने निर्णय लिया कि प्रेस क्लब और टिळक पत्रकार भवन में आयोजित होने वाली पत्रकार परिषदों का डिजिटल मीडिया संपादक बहिष्कार करेंगे।

    बैठक में यह भी मांग की गई कि नागपुर के जिला सूचना अधिकारी डिजिटल मीडिया संपादकों का सम्मान करें, महाराष्ट्र सरकार की ओर से डिजिटल मीडिया को विज्ञापन मिले और नागपुर में डिजिटल मीडिया हब के लिए जगह उपलब्ध कराई जाए। इन सभी मांगों का निवेदन हिवाळी अधिवेशन के दौरान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को सौंपा जाएगा।

    इस बैठक में नागपुर के 30 से 40 डिजिटल मीडिया संपादक उपस्थित थे। खास बात यह रही कि ग्रामीण पत्रकार संघ ने भी डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल संघ का समर्थन किया है। जल्द ही अन्य पत्रकार संगठन भी समर्थन देने वाले हैं, यह जानकारी संघ के अध्यक्ष भीमराव लोणारे ने दी।

  • जरांगे पाटील जिंकले, सरकार झुकले, 8मधुन 6 मागण्या मान्य… उपोषण संपले आझाद मैदान केले खाली,आरक्षण लढाई जिंकले, मराठ्यांनी साजरा केले उत्साह

    जरांगे पाटील जिंकले, सरकार झुकले, 8मधुन 6 मागण्या मान्य… उपोषण संपले आझाद मैदान केले खाली,आरक्षण लढाई जिंकले, मराठ्यांनी साजरा केले उत्साह

    जरांगे पाटील जिंकले, सरकार झुकले, 8मधुन 6 मागण्या मान्य… उपोषण संपले आझाद मैदान केले खाली,आरक्षण लढाई जिंकले, मराठ्यांनी साजरा केले उत्साह

    मुंबई (विजय खवसे) – सरकारी नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आझाद मैदानावर सुरू असलेले पाच दिवसांचे आंदोलन मंगळवारी संपले. आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्या आठ मागण्यांपैकी राज्य सरकारने सहा मागण्या मान्य केल्या आहेत. हैदराबाद गॅझेटियरच्या आधारे मराठवाडा भागातील मराठा समाजातील लोकांना कुणबी किंवा मराठा-कुणबी किंवा कुणबी-मराठा प्रमाणपत्र देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मराठा आरक्षणासाठी स्थापन केलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे अध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगे यांची आझाद मैदानात भेट घेतली. त्यांच्यासोबत अनेक मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते.

    जरांगे म्हणाले की, सरकारने प्रथम सर्व आश्वासनांच्या अंमलबजावणीबाबत सरकारी आदेश (जीआर) जारी करावा. त्यानंतरच मी उपोषण सोडेन. यावर विखे-पाटील यांनी हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याच्या सरकारी आदेशाचा मसुदा दाखवला. त्यात लिहिले होते की फक्त मराठा समाजातील पात्र लोकांनाच प्रमाणपत्र दिले जाईल. यावर जरांगे-पाटील यांनी सरकारला पात्र हा शब्द काढून टाकण्यास सांगितले. सुमारे एक तासानंतर, एक नवीन सरकारी आदेश जारी करण्यात आला. विखे-पाटील यांनी त्याची प्रत जरांगे-पाटील यांना दिली. त्यानंतर जरांगे-पाटील यांनी त्यांचे उपोषण सोडण्यास सहमती दर्शविली. विखे-पाटील यांनी जरांगे-पाटील यांना लिंबू पाणी देऊन उपोषण सोडण्यास भाग पाडले. मराठा समाजातील लोकांनी आनंद साजरा केला. जरांगे हे इतर मागासवर्गीय (ओबीसी) कोट्यात मराठा समाजाला १०% आरक्षण देण्यासह विविध मागण्यांसाठी २९ ऑगस्टपासून अनिश्चित काळासाठी उपोषण करत होते.

    या मागण्या मान्य झाल्या: – मराठवाड्यातील हैदराबाद गॅझेटियर

    या आधारे मराठा समाजातील व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र दिले जाईल. – मराठा आरक्षण आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत आणि सरकारी नोकरी दिली जाईल. जुने प्रलंबित खटले लवकरच निकाली काढले जातील. – मराठा आंदोलकांवर नोंदवलेले खटले मागे घेण्याची प्रक्रिया सप्टेंबर २०२५ पर्यंत पूर्ण केली जाईल. आतापर्यंत सापडलेल्या ५८ लाख मराठ्यांच्या नोंदी सर्व ग्रामपंचायतींच्या सूचना फलकांवर लावल्या जातील. जिल्हा दंडाधिकारी यासंदर्भातील कार्यवाही पूर्ण करतील. – उमेदवाराच्या अर्जापासून ९० दिवसांच्या आत मराठ्यांना जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. – निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या समितीचा कार्यकाळ ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढविण्यात आला आहे.

    या मागण्यांवर मिळालेले आश्वासन:- सरकारने सातारा गॅझेटियर लागू केले.

    तेव्हा काय झाले?
    २७ ऑगस्ट – जालन्याच्या मध्यभागी असलेल्या सराटी गावातून जरांगे-पाटील निघाले.

    २८ ऑगस्ट – जरंगे-पाटील रात्री उशिरा अहिल्यानगरमार्गे पुण्यात पोहोचले.

    २९ ऑगस्ट- जरांगे-पाटील यांचे उपोषण सुरू.

    30 ऑगस्ट – शिंदे समितीने जरंगे-पाटील यांची भेट घेतली

    ३१ ऑगस्ट – जरांगे-पाटील म्हणाले- मी मुंबईहून विजय मिळवेन नाहीतर माझी शेवटची यात्रा काढली जाईल

    १ सप्टेंबर – हैदराबाद-सातारा गॅझेटियर लागू करण्याची मागणी.

    २ सप्टेंबर- हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा सरकारी आदेश मंजूर झाल्यानंतर जरांगे यांचे उपोषण संपले.

    मराठा आणि कुणबींच्या एकत्रीकरणाबाबत सरकारी आदेश जारी करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी मागितला.सरकारने मराठा समाजाला न्याय दिला आहे. पण इतर कोणत्याही समाजावर अन्याय होऊ दिला जाणार नाही.

    – एकनाथ शिंदे, उप-मुख्यमंत्री

    मराठा समाजाला त्यांच्या अपेक्षेनुसार न्याय देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. महायुती सरकार मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीसाठी वचनबद्ध आहे.

    अजित पवार, उपमुख्यमंत्री

    आमची टीम सरकारच्या आदेशाचा अभ्यास करत आहे. कायदेतज्ज्ञांशीही चर्चा सुरू आहे. त्याचा अभ्यास केल्यानंतरच मी यावर माझे मत देईन.

    छगन भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित) नेते

  • प्रा. जोगेंद्र कवाडे यांचा अपमान नाही तो संपूर्ण समाजाचा आहे-

    प्रा. जोगेंद्र कवाडे यांचा अपमान नाही तो संपूर्ण समाजाचा आहे-

    प्रा. जोगेंद्र कवाडे यांचा अपमान नाही तो संपूर्ण समाजाचा आहे.- बापूसाहेब गजभरे

    नांदेड – संघर्षयोद्धा प्रा.जोगेन्द्र कवाडे सर यांचा हा अवमान नसून संबंध आंबेडकरी चळवळीत इमानदारीने कार्य करणाऱ्या नेत्यांचा,आणि कार्यकर्त्यांचा अपमान आहे.
    काल नागपुरात घडलेल्या प्रकरणाने समाजाची जगजाहीर बदनामी झाली.
    काहींना असुरी आनंद ही झाला असेल ते खरे समाजाच्या सामाजिक ,राजकीय ,धार्मिक चळवळीचे मारेकरी
    प्रा.जोगेन्द्र कवाडे सर यांनी आपल्या आयुष्याची 60 -65 वर्षे समाजासाठी सर्मपित केली आहेत.सरांचा त्याग एवढा मोठा आहे की,त्यांची बरोबरी कोणालाही करता येणार नाही.
    महाराष्ट्राच्या गाव गावात सरांच्या नावाचा धाक होता.
    म्हणूनच त्यांना संघर्ष नायक म्हटले जाते,

    जयभीम पत्रिकेतून सरकारवर आसूड उगारणारे कवाडे सर महाराष्टाला माहित आहेत,नामांतरासाठी लॉंग मार्च काढणारे सर,खैरलांजी प्रकरणात आमदारकीचा राजीनामा देणारे सर,खेड्यापाड्यात अन्याय झाल्यावर तर रात्री बेरात्री धावून येणारे सर !
    दिल्ली आग्र्याच्या जेल पासून त राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात जेल भोगणारे सर आज ही किती तरी पोलीस केसेस सरांवर आहेत.लहान मोठे हजारो आंदोलनात सरांनी नेतृत्व केलं !

    भीमा कोरेगाव पासून ते महाड पर्यंत आणि देश पातळीवर महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे ज्या ज्या ठिकाणी गेले
    तेथे तेथे सर पोहचले आणि लोकांना जागृत केले त्या स्थळांना आज लाखों लोक जातात.
    सरांच्या बाबतीत खूप लिहिता येईल आज फक्त थोडासा मागोवा घेतला आहे.
    सरांच्या त्यागाला अनन्यसाधारण महत्व आहे.
    त्यांच्या नावाशिवाय हि चळवळ पुर्ण होऊ शकत नाही.
    त्यांना विरोध करणाऱ्यांचं समजत कांहीही स्थान नाही असे भाडोत्री विकाऊ आणि टाकाऊ लोक विरोधात समाज माध्यमावर व्यक्त होतांना दिसत आहेत.

    नागपूरच्या प्रकरणात सरांच्या समर्थनात जास्त लोक होते.
    भाडोत्री लोक बोटावर मोजण्या इतकेच होते.
    सरांची कालची भूमिका स्वागताहार्य त्यांनी समाजात भांडणे नको हि भूमिका घेतली
    समाजातल्या बुद्धिजीवी लोकांनी एकत्र येऊन प्रा.जोगेन्द्र कवाडे सर यांची कोणती भूमिका चुकली ती सांगावी
    आम्ही सरांना आपल्याशी संवाद साधण्यासाठी बोलावू
    माझी विनंती एवढीच आहे की समाजमाध्यमांवर बदनामीकारक लिखन करू नये परत एकदा हात जोडून विनंती.

    जर या उपर कुणी पोस्ट केलीच तर कायदेशीर मार्गाने कारवाई करण्यात येईल.कृपया आम्हांला तो निर्णय घेण्यास भाग पाडू नका !

    बापूराव उर्फ बापूसाहेब गजभारे
    महाराष्ट्र प्रदेश महासचिव,नांदेड
    9673580786,9422187404

  • पत्रकार प्रशांत कांबळे – चांदूर रेल्वे ते मंत्रालय प्रतिनिधी पर्यंतचा प्रवास.! वाढदिवस विशेष

    पत्रकार प्रशांत कांबळे – चांदूर रेल्वे ते मंत्रालय प्रतिनिधी पर्यंतचा प्रवास.! वाढदिवस विशेष

    पत्रकार प्रशांत कांबळे – चांदूर रेल्वे ते मंत्रालय प्रतिनिधी पर्यंतचा प्रवास.! वाढदिवस विशेष

    अमरावती जिल्ह्यातील लहानशा चांदूर रेल्वे शहरातून आपल्या पत्रकारितेच्या कारकिर्दीची सुरुवात करणारा प्रशांत कांबळे आज मुंबईसारख्या गजबजलेल्या आणि स्पर्धात्मक राजधानीच्या शहरात पत्रकारितेत स्वतःचा वेगळा ठसा उमटवत आहे. त्याचा हा प्रवास केवळ वैयक्तिक मेहनत, चिकाटी आणि जिद्दीचा नाही, तर सामाजिक बांधिलकी आणि सत्यनिष्ठेचेही उदाहरण आहे.

    सुरुवातीची पावले – चांदूर रेल्वेतून सुरुवात

    प्रशांत कांबळे ची पत्रकारितेतील कारकीर्द एका स्थानिक वृत्तपत्रात तालुका प्रतिनिधी म्हणून सुरू झाली. गावातील सामान्य माणसांचे प्रश्न, स्थानिक समस्या आणि ग्रामीण भागातील घडामोडी यांचे अचूक, जबाबदार आणि संवेदनशील वृत्तांकन त्यांनी केले. त्यामुळे अल्पावधीतच ते लोकांच्या मनात विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जाऊ लागले.

    मुंबईकडे वाटचाल

    नंतर पत्रकारितेच्या वाटेवर पुढील टप्पा गाठण्यासाठी प्रशांत कांबळे मुंबईत दाखल झाला. जय महाराष्ट्र सारख्या न्यूज चैनल मध्ये असताना मुंबईच्या गटारात काम करणाऱ्या कामगारांची व्यथा न्यूज चॅनलमध्ये मांडली.. महानगरातील जलद गतीचे आयुष्य, स्पर्धा आणि सतत बदलणाऱ्या घडामोडी यांच्या मध्यभागी राहूनही त्यांनी सत्य, तथ्य आणि जबाबदारीचा धागा सोडला नाही.

    दिव्य मराठीत मंत्रालय प्रतिनिधी

    सध्या प्रशांत कांबळे मुंबईतील अग्रगण्य दैनिक दिव्य मराठी मध्ये मंत्रालय प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. शासनाच्या निर्णयांपासून ते जनतेच्या समस्यांपर्यंत, त्यांनी नेहमीच वाचकांपर्यंत अचूक आणि प्रभावी माहिती पोहोचवण्याचे काम केले आहे. मंत्रालयातील राजकारण, धोरणे आणि त्याचा जनजीवनावर होणारा परिणाम याचे सूक्ष्म विश्लेषण करून त्यांनी आपले वेगळेपण सिद्ध केले आहे.

    सामाजिक बांधिलकी आणि संवेदनशीलता

    प्रशांत कांबळे हा केवळ बातम्या देणारा पत्रकार नाही, तर एक संवेदनशील मन, सामाजिक जाण असलेले व्यक्तिमत्त्व आहे. सामान्य नागरिकांच्या समस्या, सामाजिक अन्याय, ग्रामीण भागातील आवाज आणि वंचित घटकांचे मुद्दे निर्भीडपणे मांडतो. पत्रकारितेला व्यवसायापेक्षा लोकसेवेचे माध्यम म्हणून पाहणारा हा दृष्टीकोन त्याचा इतरांपेक्षा वेगळा ठरवतो.

    राहुल गडपाले यांनी दिली मुंबईत संधी….

    मुंबईतून काही काळ अमरावतीत आल्यानंतर प्रशांत कांबळे याला खरंतर परत मुंबईत पत्रकारितेत जायचे होते मात्र मुंबईत चांगल्या वृत्तपत्रात काम मिळणे सोपे नाही. मात्र या कामी दैनिक सकाळचे संपादक राहुल गडपाले यांनी प्रशांतला दैनिक सकाळमध्ये मुंबईत काम करण्याची संधी दिली, आणि ही राहुल गडपाले यांनी दिलेली संधी प्रशांतच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. या संधीचे सोने करत सकाळ मधून मंत्रालय प्रतिनिधी म्हणून दिव्य मराठीत प्रशांत कांबळे यांनी झेप घेतली.
    प्रशांत कांबळे च्या या यशात राहुल गडपाले यांच्यासोबतच विनोद भाऊ राऊत यांचा देखील महत्वाचा वाटा आहे…. विदर्भातल्या छोट्या गावातून मुंबईत गेलेल्या प्रशांतला मुंबईत सहकार्य साथ व मार्गदर्शन करणारे पत्रकारांचे देखील तेवढेच सहकार्य आहे.

    वाढदिवसानिमित्त शुभेच्छा

    आज प्रशांत कांबळे याचा वाढदिवस. प्रशांतला वाढदिवसानिमित्त खूप खूप मनःपूर्वक शुभेच्छा. सत्य, न्याय आणि सामाजिक बांधिलकीच्या मार्गावर प्रशांत असाच ठामपणे प्रवास करत राहावा, हीच अपेक्षा.WH NEWS NAGPUR

  • विश्व आदिवासी दिनानिमित्त जय बिरसा आदिवासी विकास सोसायटी लाव्हा तर्फे भव्य रॅलीचे आयोजन

    विश्व आदिवासी दिनानिमित्त जय बिरसा आदिवासी विकास सोसायटी लाव्हा तर्फे भव्य रॅलीचे आयोजन

     


    विश्व आदिवासी दिनानिमित्त जय बिरसा आदिवासी विकास सोसायटी लाव्हा तर्फे भव्य रॅलीचे आयोजन

    वाडी लाव्हा – विश्व आदिवासी दिनाच्या औचित्याने जय बिरसा आदिवासी विकास सोसायटी लाव्हा यांच्या वतीने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीची सुरुवात आंबेडकर नगर येथे बाबासाहेब डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून करण्यात आली. त्यानंतर लाव्हा येथे बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस माल्यार्पण व ध्वजवंदन सोहळा पार पडला.

    यानंतर सोनबा नगर येथे कुवारा भिवसन पेन यांची पूजा करण्यात आली आणि बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. शेवटी टेकडी वाडी येथे बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे अनावरण करून कार्यक्रमाची सांगता झाली.

    या रॅलीत सुखलाल भलावी, दिनेश उईके, सचिन सलामे, विनोद करनाके, महेश धुर्वे, श्रावण कुळमते, बुधारामजी कोवाचे, वाढवेजी, भोजराजजी पुसाम, रमेश सलामे, कपील पुसाम, सौरभ वरठी, बोरकरजी, धनपालजी मरसकोल्हे, महेशजी कुरसंगे, रेखलाल खंडाते, प्रमोद वरठी, जगदिश मरकाम, मनीश उईके, कठोतेजी, यशोदाबाई मडावी, शारदाताई मर्सकोल्हे, इंदिराताई कुरसंगे, रेखाताई कोडापे, पेंदामताई, दुर्गाताई कुरसंगे, ललीताबाई कोकोंडे, शिलाबाई पुसाम, शोभाबाई सलामे यांच्यासह मोठ्या संख्येने आदिवासी बांधव व भगिनी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामुळे लाव्हा परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.


     

  • धगधगाने वाला तूफ़ान थमा, पूर्व सूबेदार जगन्नाथजी गवई ने लिया अंतिम विदा

    धगधगाने वाला तूफ़ान थमा, पूर्व सूबेदार जगन्नाथजी गवई ने लिया अंतिम विदा

    धगधगाने वाला तूफ़ान थमा, पूर्व सूबेदार जगन्नाथजी गवई ने लिया अंतिम विदा
    चांदूर रेलवे। (बंडू आठवले )  मिलिंद नगर के पूर्व सूबेदार एवं नगर परिषद के उपाध्यक्ष जगन्नाथजी गवई का 91 वर्ष की आयु में निधन हो गया। वे संघर्ष से उठने वाले, अन्याय के विरुद्ध डटकर खड़े होने वाले, सेवानिवृत्त फौजी और समाजसेवी थे।

    जगन्नाथ गवई के पिता का 1952 में निधन हो गया था। मात्र 19 वर्ष की उम्र में परिवार की ज़िम्मेदारी संभालते हुए उन्होंने अपने मित्र पुंडलिकराव आठवले के साथ 1954 में सेना में भर्ती ली। वहीं से उन्होंने अपनी देश सेवा की शुरुआत की और सूबेदार मेजर के पद तक पहुंचे। 1962 और 1965 के भारत-पाक युद्ध में उन्होंने बहादुरी से हिस्सा लिया। 1972 में सेवानिवृत्त होकर उन्होंने समाज सेवा का नया सफ़र शुरू किया।

    अपने छोटे भाई शेषरावजी गवई के निधन के बाद 1986 में हुए उपचुनाव में वे नगरसेवक चुने गए और लगातार दो बार नगर परिषद के उपाध्यक्ष रहे। नगर परिषद में अपनी बुलंद आवाज़ और आक्रामक कार्यशैली के लिए वे जाने जाते थे। मटन मार्केट का मुद्दा उन्होंने दिल्ली तक उठाया और 10 वर्षों तक नगरसेवक के रूप में जनसेवा की।

    कोरोना काल में उन्होंने अपनी पेंशन से ज़रूरतमंदों को राशन वितरित किया। एक सच्चे फौजी और दानवीर के रूप में उनकी छवि रही। पूर्व पार्षद बंडु  आठवले ने कहा, “मामा हमारे बीच नहीं रहे, लेकिन उनका शूरवीर व्यक्तित्व हमेशा याद रहेगा। हम हमेशा उनकी प्रेरणा लेकर उनके विचारो पर चलेंगे.सुभेदार को  NEWS की और से भावपूर्ण श्रद्धांजलि।”

  • ग्राहकांच्या लेखी परवानगीशिवाय स्मार्ट मीटर बसविण्यास विरोध. – बहुजन वंचित आघाडीकडून अभियंत्यांना विनंती

    ग्राहकांच्या लेखी परवानगीशिवाय स्मार्ट मीटर बसविण्यास विरोध. – बहुजन वंचित आघाडीकडून अभियंत्यांना विनंती

    ग्राहकांच्या लेखी परवानगीशिवाय स्मार्ट मीटर बसविण्यास विरोध. – बहुजन वंचित आघाडीकडून अभियंत्यांना विनंती

    नागपूर WH NEWS 
    सध्या राज्य सरकारच्या धोरणानुसार, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी प्रत्येक घरातून जुने मीटर काढून नवीन स्मार्ट मीटर बसवित आहे.

    परंतु या नवीन स्मार्ट मीटरच्या संदर्भात, मोठ्या संख्येने राजकीय सामाजिक , ग्राहक संघटनांनी अनेक शंका उपस्थित केल्या आहेत, ज्यामुळे वीज ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी स्मार्ट मीटरमध्ये आढळून आलेल्या दोषांमुळे वीज ग्राहकांमध्ये संताप आणि चिंता दिसून येत आहे.

    या परिस्थिती लक्षात घेता, वंचित बहुजन आघाडीकडून सोमवारी सोनबा नगर येथील वाडी वीज वितरण कार्यालयाच्या अभियंत्यांना वीज ग्राहकांच्या परवानगीशिवाय स्मार्ट मीटर बसविण्याचे काम थांबवण्याची विनंती करण्यात आली. *वंचित बहुजन आघाडीचे तहसील उपाध्यक्ष नागेश बोरकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी प्रकाश मेश्राम, राजेश वानखेडे, विनायकराव घुमटकर, दर्शन बेले, यांनी वीज वितरण कार्यालयाच्या सहाय्यक अभियंत्यांची भेट घेतली आणि त्यांची विनंती सादर केली आणि चर्चेदरम्यान सांगितले की, सध्या स्मार्ट मीटरबाबत ग्राहकांमध्ये खूप गोंधळ आहे. वीज विभाग याचे समाधानकारक उत्तर देऊ शकत नाही. या स्मार्ट मीटरच्या वेगवान गतीमुळे ग्राहकांना जास्त वीज बिल आकारले जात आहे. भविष्यात हे स्मार्ट मीटर प्रीपेड मीटरमध्ये देखील बदलता येतील. या परिस्थिती लक्षात घेता, ग्राहकांच्या लेखी परवानगीशिवाय जुन्या वीज मीटरच्या जागी नवीन स्मार्ट मीटर बसवू नयेत.

    स्मार्ट वीज मीटरच्या करारा अंतर्गतही अशी तरतूद नमूद करण्यात आली आहे. आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एका निवेदनात म्हटले आहे की ते ऐच्छिक आहे. कोणत्याही परिस्थितीत स्मार्ट मीटरमुळे वीज ग्राहकांची आर्थिक लूट सहन केली जाणार नाही. वाडी, आठवा मैल आणि ग्रामीण भागात अशा कोणत्याही कारवाईला जबरदस्तीने विरोध केला जाईल. आणि वंचित बहुजन आघाडीने वाडी वीज वितरण कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिला. वंचित बहुजन आघाडीने सरकारवर उद्योगपतींच्या फायद्यासाठी हे स्मार्ट मीटर जबरदस्तीने ग्राहकांवर लादल्याचा आरोप केला. विद्युत अभियंत्याने स्मार्ट मीटरबाबत उपस्थित शिष्टमंडळाला योग्य माहिती देऊन हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला, परंतु शिष्टमंडळ त्यावर समाधानी झाले नाही. अभियंत्यांनी योग्य कारवाईसाठी वरिष्ठांकडे विनंती पाठविण्यास मान्यता दिली.

    रमेश गजभिये, अभिजित मेश्राम, गौतम डोंगरदिवे, नितेश पुंडकर, सिद्धार्थ मेश्राम, सचिन साहेबराव गोलाईत, दिलीप पटेल, हरीश गजभिये, अमन मेश्राम, मयूर गजभिये, मयंक चौधरी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रणाली शिष्टमंडळात वंचित बहुजन आघाडीचे सहभागी होते.

  • आदिवासी फासेपारधी व भटक्या जमातीच्या वस्त्यांमध्ये विविध दाखले वाटप करण्यासाठी शिबीरे घ्यावीत – अॅड. धर्मपाल मेश्राम

    आदिवासी फासेपारधी व भटक्या जमातीच्या वस्त्यांमध्ये विविध दाखले वाटप करण्यासाठी शिबीरे घ्यावीत – अॅड. धर्मपाल मेश्राम

    आदिवासी फासेपारधी व भटक्या जमातीच्या वस्त्यांमध्ये विविध दाखले वाटप करण्यासाठी शिबीरे घ्यावीत
    – अॅड. धर्मपाल मेश्राम

    नागपूर, दि. 5:– अनुसूचित जाती व जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती यांचेकडे अधिवास पुरावे उपलब्ध नसल्यामुळे त्यांना शासनाकडून वितरीत करण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेता येत नाही. घरकुल योजनेचा लाभ मंजूर होत नाही, जातीचे प्रमाणपत्र व जात वैधता प्रमापत्र वेळेत मिळत नाहीत. यावर प्रभावी उपाय म्हणून संबंधित विभागाने विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या वस्त्यांमध्ये विविध दाखले वाटप करण्यासाठी शिबीरे आयोजित करण्याचे निर्देश अॅड. धर्मपाल मेश्राम यांनी दिले.

    रविभवन, नागपूर येथे महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष अॅड. धर्मपाल मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ तळागळातील लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

    आदिवासी फासे पारधी, विमुक्‍त भटक्या जामातीच्या 157 वस्तींमध्ये विविध दाखले वाटप शिबीर आयोजित करणे, घरकुल योजनांचा लाभ मंजूर करणे, जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र निर्गमीत करणे करिता लवकरच जिल्हानिहाय उप जिल्हाधिकारी पातळीचा समन्वय अधिकारी (नोडल अधिकारी) म्हणून नेमण्याचे व त्यासाठी प्रत्येक जिल्हयातील समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी महिनाभरात अहवाल देण्याचे निर्देशीत केले.

    बैठकीला आदिवास विकास विभागाचे उपायुक्त दिगांबर चव्हाण, उपजिल्हाधिकारी विवेक साळुंके, जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुखदेव कौरती, पोलीस उपअधीक्षक हेमंत खराबे, सामाजिक नेते व अखिल भारतीय स्तरावर घुमंतू भटक्या जातींमध्ये काम करणारे श्री दुर्गादासजी व्यास, आशिष कावळे, राजीव डोणारकर, प्रदिप वडणेरकर, प्रविण पवार, प्रशांत पवार, श्रीकांत तिजारे, अमोल एडके आदी उपस्थित होते.

  • आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी आता वंचित, मागास, भटक्या, विमुक्त वर्गाच्या प्रश्नाकडे विशेष लक्ष देवून त्यांच्या प्रश्र्नांची उकल करावी – प्रमोद काळबांडे

    आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी आता वंचित, मागास, भटक्या, विमुक्त वर्गाच्या प्रश्नाकडे विशेष लक्ष देवून त्यांच्या प्रश्र्नांची उकल करावी – प्रमोद काळबांडे

    आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी आता वंचित, मागास, भटक्या, विमुक्त वर्गाच्या प्रश्नाकडे विशेष लक्ष देवून त्यांच्या प्रश्र्नांची उकल करावी – प्रमोद काळबांडे (more…)