तनाएरा नवे फेस्टिव्ह कलेक्शन ‘मियारा’ सादर; यंदाच्या सणासुदीत दोन अंकी वाढीचे अनुमान
विशेष ऑफर्स आणि अनोखी खरेदी योजना ग्राहकांना मिळणार स्वप्नपूर्तीचा आनंद
नागपूर, WH NEWS दि. १७ सप्टेंबर २०२५ : महिलांच्या एथनिक वेअर ब्रँड टाटा परिवारातील एक सदस्य असलेल्या तनाश्रयने यंदाच्या सणासुदीत आपले नवे फेस्टिव्ह कलेक्शन ‘मियारा’ सादर केले आहे. पारंपरिकतेला आधुनिक डिझाईन्सची जोड देत आकर्षक एथनिक वेअर महिलांसाठी तयार करण्यात आले असून, यात विविध प्रसंगांसाठी शोभतील असे सुंदर पेहराव उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
‘मियारा’ कलेक्शनची वैशिष्ट्ये :
• आधुनिक डिझाईन्ससोबत पारंपरिक कलांची झलक
• उत्सव-लग्न समारंभांसाठी योग्य पेहराव
• समृद्ध रंगसंगती आणि विविध फॅब्रिक्सची उपलब्धता
या निमित्ताने तनाश्रयने ग्राहकांसाठी खास ऑफर्स जाहीर केल्या आहेत. १०,००० रुपयांच्या खरेदीवर ग्राहकांना १,००० रुपयांचे रिडीम कूपन, तर १५,००० रुपयांवरील खरेदीवर २,००० रुपयांचे गोल्ड कॉईन मोफत देण्यात येणार आहेत. ही ऑफर २० ऑक्टोबर २०२५ पर्यंत लागू असेल.
तनाएरा रिटेल प्रमुख अनिर्बान बॅनर्जी म्हणाले, “विशेष ऑफर्स आणि गोल्डन कूपन योजनेमधून आमची इच्छा आहे की, तनाएरा साडी हा यंदाच्या सीझनमधील ग्राहकांची सर्वात सार्थक निवड बनावी. बाजारपेठेत तेजी आहे आणि आमचे अनुमान असे आहे की, या संपूर्ण सणासुदीच्या काळात आमच्या व्यवसायात दोन अंकी वाढ होईल.”
‘मियारा’ सोबत सणांचा आनंद दुप्पट करण्यासाठी खास साड्या सुद्धा बाजारात आणल्या आहेत. या साड्यांची किंमत ६,४९९ रुपयांपासून पुढे आहे. स्वतःसाठी खास खरेदी म्हणून, विचारपूर्वक निवडलेल्या या साड्या कायम लक्षात राहतील अशी भेट ठरणार आहे. ग्राहकांना अनुभव मिळवण्याचे आणि हाताने विणलेल्या साड्या स्वतःच्या वॉर्डरोबमध्ये सामील करण्याचे नवे मार्ग तनाएरा ने सादर केले आहेत.
ग्राहकांसाठी उपलब्ध ठिकाणे :
तनाश्रय शोरूम – किंग्सवे, स्टेशन रोड, नागपूर
Leave a Reply