डिजिटल मीडियाचा झंझावात – एम.बी. न्यूजचे संपादक मंगेश बोबडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
नागपूर 3 नोव्हेंबर 25- चांदुर रेल्वे या छोट्या शहरातून निघालेला एक युवक आज डिजिटल मीडियाच्या जगात आपले स्वतंत्र स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरला आहे. तो म्हणजे एम.बी. न्यूज चे संपादक मंगेश बोबडे. आज 3 नोव्हेंबर 2025 ला त्यांच्या वाढदिवसानिमित्त, पत्रकारितेच्या क्षेत्रातील त्यांच्या झपाट्याने झालेल्या वाटचालीचा आढावा घेणे हीच खरी त्यांची कमाई म्हणावी लागेल.
मंगेश बोबडे हे नाव आज अमरावती विभागात तसेच विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये ओळखले जाते. कारण बातमी कुठेही घडली तरी “सर्वात आधी एम.बी. न्यूज” या ब्रीदवाक्याला ते नेहमी न्याय देतात.
त्यांच्या झपाट्याने काम करण्याच्या वृत्तीमुळे अनेकांनी त्यांना “वेगवान पत्रकार” म्हणून ओळख दिली आहे.
चांदुर रेल्वे या छोट्या गावात जन्मलेल्या मंगेश बोबडे यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर आणि समर्पणाच्या भावनेने डिजिटल मीडियात प्रवेश केला. पारंपरिक माध्यमांपासून दूर जाऊन त्यांनी मोबाईल आणि इंटरनेटच्या माध्यमातून बातमी पोहचविण्याची नवी दिशा दाखवली.
बातमी म्हणजे केवळ माहिती नव्हे, तर जबाबदारी आणि सत्याची वाटचाल असते आणि हाच विश्वास ठेवून मंगेश बोबडे यांनी एम.बी. न्यूजला लोकांच्या मनात स्थान मिळवून दिले. एखादी घटना घडताच ते स्वतः घटनास्थळी धाव घेतात, सत्य समोर आणतात आणि काही क्षणांतच ती बातमी जनतेपर्यंत पोहोचवतात.
त्यांच्या या तत्परतेमुळे आणि पत्रकारितेतील निष्ठेमुळे आज ते अनेक तरुण पत्रकारांसाठी प्रेरणास्थान बनले आहेत. बातमी मिळविण्याची त्यांची धडपड, सत्यासाठीचा आग्रह आणि लोकांपर्यंत योग्य माहिती पोहोचविण्याची त्यांची तळमळ हे त्यांचे खरे वैशिष्ट्य आहे.
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त WH NEWS कडून एम.बी. न्यूज परिवारासह, सर्व सहकारी पत्रकार, मित्रपरिवार आणि शुभचिंतक त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देत आहेत“आपले कार्य असेच तेजाने उजळत राहो,
आपल्या पत्रकारितेच्या प्रवासात आणखी यशोशिखरे गाठो!”
मंगेश बोबडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
विजय खवसे, WH NEWS संपादक नागपूर

Leave a Reply