उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजसेवकांचा धनोजे कुनबी करणार सत्कार…विदर्भवादी वामनराव चटप यांचा होईल सत्कार
केंद्रीय मंत्री यांची असणार खास उपस्थिति
नागपुर – धनोजे कुनबी समाजत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाज सेवकांचा 16 सेप्टेंबर ला सत्कार करण्याची माहिती
प धनोजे कुणबी समाज महाराष्ट्र मध्यप्रदेश संस्था यांनी बुधवारी टिळक पत्रकार परिषद मध्ये दिली.
समाजात समन्वय घडवून आणण्याच्या व समाजाचा विकास करण्याच्या दृष्टीने सन 2013 ला “ धनोजे कुणबी समाज विकास महासंघ , नागपूर ” ची स्थापना करण्यात आली . संस्थेची धर्मादाय आयुक्त कार्यालयात रीतसर नोंदणी करण्यात आली आहे .
ही संस्था दरवर्षी आरोग्य शिबीर , रक्तदान शिबीर , विद्यार्थी मार्गदर्शन कार्यक्रम , गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार , उपवर वधु परिचय मेळावे इत्यादीचे आयोजन करीत असते . यावर्षी धनोजे कुणबी समाजातील व्यक्तींनी गेल्या 20-25 वर्षात शैक्षणिक , सामाजिक , कृषी , उद्योग , व्यवसाय , साहित्य इत्यादि क्षेत्रात जे विशेष कार्य केले त्या कार्याचा गौरव करण्यासाठी त्या मान्यवरांना समाज रत्न , समाज गौरव , समाज भूषण ही सन्मानपत्र देऊन सन्मान करण्याचे ठरविले आहे . दि . 16 सप्टेंबर 2022 रोज शुक्रवारला भारताचे केंद्रीय मंत्री मा . नितीनजी गडकरी साहेब यांचे शुभहस्ते सन्मानपत्र देण्याचा कार्यक्रम आयोजित कण्यात आला आहे . सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री मधुकरराव ढोके , अध्यक्ष धनोजे कुणबी समाज विकास महासंघ , नागपूर तथा प्रमुख पाहुणे मा . श्री कृपालजी तुमाने खासदार , रामटेक लोकसभा क्षेत्र , मा . श्री शरदराव निंबाळकर माजी कुलगुरु पंजाबराव कृषि विद्यापीठ , अकोला , मा.श्री सुधीरजी पारवे माजी आमदार उमरेड हे ाहतील . हा कार्यक्रम धनोजे कुणबी समाज भवन सूयोग नगर , नागपूर येथे दि . 16 सप्टेंबर 2022 ला सकाळी ठिक 10.00 वाजता होईल .
कार्यक्रमास बहुसंख्य समाजबांधवांना निमंत्रित करण्यात आले आहे
मधुकर ढोके अध्यक्ष , देवराव टोंगे उपाध्यक्ष , दिनकरराव जिवतोडे सरचिटणीस, मारोतराव वांढरे उपाध्यक्ष, नारायणराव कुथे कोषाध्यक्ष, गजाननराव आसुटकर उपाध्यक्ष, महेश दिवसे कार्यक्रम संयोजक तथा संघटक नागपूर शहर , नरेश बेरड संघटक सचिव पत्रकार परिषद ला उपस्थित होते.
Leave a Reply