अभिवादनकार कवी प्रसेनजित ताकसांडे यांना विनम्र अभिवादन..झाले बुद्ववासी! आज घाट रोड मोक्षधाम येथे अंतिम संस्कार 

Follow Us on :

अभिवादनकार कवी प्रसेनजित ताकसांडे यांना विनम्र अभिवादन..झाले बुद्ववासी! आज घाट रोड मोक्षधाम येथे अंतिम संस्कार 

नागपूर – दहा मिनिटापूर्वीच मध्यरात्री बाराचा ठोका पडला. आणि मोबाईल खणखणला .. मोबाईलच्या स्क्रीनवर बघितलं… मित्र पॅंथर प्रकाश बनसोड यांचा फोन होता. पुन्हा उचलतात आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कवी तसेच पॅंथर प्रसेनजित ताकसांडे यांच्या निधनाची बातमी त्यांनी दिली. अगदी दोन आठवड्यापूर्वी आंबेडकरी चळवळीतील नाटककार विलास पाटील यांचे निधन झाले आणि लगेच प्रसेनजित ताकसांडे चळवळीतील कवी कार्यकर्ता हरवल्याचा दुसरा धक्का. काही वर्षांपूर्वी त्यांचा ‘अभिवादन’ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला होता, आज चळवळीतील आंबेडकरी बनाया या कवीला अभिवादन करण्याची वेळ आली. फोन ठेवल्यानंतर काही वेळातच कवी प्रसेनजित ताकसांडे यांचा धनवटे रंगमंदिर समोर सर्व कवी कार्यकर्ते असलेल्या तो काळ नजरेसमोर आला….जसा जसा काळ बदलत जातो तसं तसं सगळंच बदलत जातं हा निसर्गाचा नियमच…. मात्र आमच्या चळवळीची जी हानी होते ती भरून निघणे कठीण जाते .

धनवटे रंगमंदिर समोरचा परिसर म्हणजे आंबेडकरी सांस्कृतिक चळवळीतील कार्यकर्त्यांचा कट्टा…. येथील धनवटे रंगमंदिराच्या
लोखंडी रेलिंगवर बसून सर्व चर्चा होत असत. नवीन कविता वाचल्या जात होत्या, सांस्कृतिक चळवळीच्या बारूद येथे तयार होत होतं..हा ठिय्या होता .. तिथे चर्चा व्हायच्या. आंबेडकरी चळवळीची वळण जणू येथून तयार व्हायची.. या ठिकाणी पॅंथर प्रसेनजित ताकसांडे यांची उपस्थिती नेहमीची. सर्व दिग्गज प्रा. रणजित मेश्राम, अमर रामटेके , बबन बेसेकर , राजीव गायकवाड , गोविंद वाघमारे , नानू नेवरे , दादाकांत धनविजय , रोशन सोमकुंवर , संजय जीवने, सुनील रामटेके, धर्मेश सोनटक्के, सुधाकर सोमकुवर, अशोक जांभुळकर, अनिल कांबळे,सतीश ढोले , सतीश पावडे , उल्हास मनोहर , सुरेश मुन , कमल वाघधरे , पुरुष पंडागळे , नेताजी राजगडकर , मारुती कुळमेथे , अशोक कोल्हटकर , सुहास लोहकरे याशिवाय याशिवाय अनेक कार्यकर्ते कलावंत इथं यायचे चळवळीची चर्चेत चर्चा व्हायची.. मी केबल जीवनतारे आणि सुनील रामटेके सर्वात लहान येथे आम्ही उपस्थित असायचं. बंगाली रंगभूमीचे कलावंत दिसायचे, मराठी रंगभूमीचे दिसायचे. अशी सर्व सांस्कृतिक चळवळ इथे एकोप्याने दिसायची.. मात्र त्याच साखळीतील कवी प्रसेनजित ताकसांडे यांचे मध्यरात्री निधन झाले.

ताकसांडे यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीची हानी झाली आहे . ती कधीही भरून निघू शकत नाही. अभिवादनकार कवी प्रसेनजित ताकसांडे यांना विनम्र अभिवादन..
…..
भारतीय दलित पँथरचे ज्येष्ठ नेते, ख्यातनाम आंबेडकरवादी, विचारवंत ,कवी पँथर प्रसेनजीत ताकसांडे ( वय ७६)यांचे शुक्रवार ,दिनांक २७/०२/२०२६ रोजी रात्री ११: ०० वाजता आकस्मित निधन झाले. त्यांचेवर उद्या शनिवार दिनांक २८/०२/२०२६ रोजी दुपारी ४:०० वाजता त्यांचे निवासस्थान उंटखाना, नागपूर येथून निघून टिकेकर घाट, मोक्षधाम, घाट रोड नागपूर येथे अंतिमसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांचे पश्चात पत्नी सह दोन मुले आणि तीन मुली असा परिवार आहे.
भारतीय दलित पँथरच्यावतीने भावपूर्ण आदरांजली.

साभार -जीवन केवलतारे फेसबुक वरून

News By

  • WH NEWS is an independent digital news platform committed to factual, balanced, and public-interest journalism across Maharashtra. We provide structured reporting on political developments, civic issues, social matters, cultural events, and government updates. Our aim is to present verified information with neutrality, transparency, and professional ethics. All content is published strictly for informational purposes. Views expressed by interviewees are their personal opinions. WH NEWS respects the Constitution of India, the rule of law, and the authority of courts and public institutions. WH NEWS operates independently without external control. Any financial support received is strictly voluntary and accepted only as goodwill support for journalism. No demand, solicitation, pressure, or conditional benefit is ever involved. Contributions are used solely for reporting, production, and operational expenses and never influence editorial decisions.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

यह भी पढ़िए