धरतीआबा क्रांतिकारी बिरसा मुंडा जयंतीनिमित्त आजाद समाज पार्टीतर्फे अभिवादन; मिठाई वाटप करून जयंती उत्साहात साजरी!
नागपूर (WH NEWS) : जल, जंगल आणि जमिनीच्या हक्कांसाठी ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढा उभारणारे महान क्रांतिकारक आणि आदिवासी समाजाचे जननायक धरतीआबा भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आजाद समाज पार्टी (कांशीराम), विदर्भ पूर्वच्या वतीने गोडवाना चौक येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी भगवान बिरसा मुंडा यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. तसेच उपस्थितांना मिठाईचे वाटप करून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या जल, जंगल आणि जमिनीवरील अधिकारांसाठी ब्रिटिश राजवटीविरोधात ऐतिहासिक संघर्ष केला. त्यांच्या क्रांतिकारी विचारांनी, त्यागाने आणि संघर्षाने देशातील सामाजिक न्यायाच्या चळवळीला नवी दिशा दिली. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प यावेळी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाला आजाद समाज पार्टी (कांशीराम) विदर्भ पूर्वचे अध्यक्ष नितीन नागदेवते, मीडिया प्रमुख सुशीलकुमार ढोलेकर, सचिव खुशिताई कामळे, प्रवक्ता सलमान पठाण, जिल्हाध्यक्ष निलेश राऊत, शहराध्यक्ष पियुष धुळे, उत्तर नागपूर अध्यक्ष नितेश तांबे, अक्षय मेश्राम, राणी पाटील, धर्मेंद्र सूर्यवंशी, विनोद मडावी, संदीप उईके, राजेश मेश्राम, संदीप पाटील, नितेश जुमळे, मोहित कुमरे यांच्यासह पक्षाचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वंचित, शोषित, आदिवासी आणि बहुजन समाजाच्या हक्कांसाठी लढा सुरू ठेवणार!

क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांच्या संघर्षमय जीवनातून प्रेरणा घेत वंचित, शोषित, आदिवासी आणि बहुजन समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने संघर्ष करण्याचा निर्धार यावेळी आजाद समाज पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
