माणुसकीला काळीमा! अवघ्या 13 वर्षांच्या चिमुकलीवर अतिप्रसंग; वाडी पोलिसांनी आरोपीला घेतले ताब्यात!

Follow Us on :

माणुसकीला काळीमा! अवघ्या 13 वर्षांच्या चिमुकलीवर अतिप्रसंग; वाडी पोलिसांनी आरोपीला घेतले ताब्यात!
नागपूर WH NEWS : समाजमन सुन्न करणारी आणि माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना नागपूर जिल्ह्यातील दवलामेटी येथील गणेश नगर परिसरात उघडकीस आली आहे. अवघ्या 10 वर्षांच्या, पाचव्या वर्गात शिकणाऱ्या चिमुकलीवर अतिप्रसंग झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट पसरली असून बालसुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार दुपारी सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. पीडित चिमुकली आपल्या भावासोबत घरी एकटीच होती. तिचे आई-वडील भाड्याच्या घरात वास्तव्यास आहेत. याच परिसरातील शेजारच्या घरात आरोपीदेखील भाड्याने राहत असल्याची माहिती आहे.

घटनेनंतर घाबरलेल्या चिमुकलीने घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला. आपल्या लेकरासोबत असा अमानुष प्रकार घडल्याचे समजताच आई-वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. ज्या वयात मुलांच्या हातात पुस्तकं आणि खेळणी असायला हवीत, त्या वयात या निष्पाप चिमुकलीला इतक्या भयानक प्रसंगाला सामोरे जावे लागल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

बुधवारी रात्री पीडित मुलीचे कुटुंबीय तक्रार देण्यासाठी वाडी पोलीस ठाण्यात पोहोचले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तत्काळ हालचाली करत संशयित आरोपीला ताब्यात घेतले. पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
बातमी लिहिपर्यंत या प्रकरणात अधिकृत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली होती.

एक गंभीर प्रश्न समाजासमोर!
अवघ्या तेरा वर्षांच्या मुलींचे बालपणही सुरक्षित नसेल, तर आपण कोणत्या समाजात जगत आहोत? मुलींच्या सुरक्षेच्या घोषणा केवळ भाषणांपुरत्याच मर्यादित राहणार आहेत का? अशा घटनांमधील दोषींना कठोर शिक्षा होणे आणि पीडित चिमुकलीला न्याय मिळणे हीच आज समाजाची अपेक्षा आहे.
या चिमुकलीला न्याय मिळालाच पाहिजे! तिचे बालपण हिरावून घेणाऱ्या प्रत्येक विकृत प्रवृत्तीविरुद्ध कायद्याने कठोर भूमिका घेतली पाहिजे. BNS कलम 64,पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरु आहे.पुढील तपास सुरु असल्याची माहिती PI नितीन मगर यांनी दिली.

News By

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

यह भी पढ़िए