५९ अनुसूचित जातींचा एकजुटीचा एल्गार! १७ डिसेंबरला नागपूर विधानभवनावर ५ लाखांचा विराट मोर्चा! उपवर्गीकरण धोरण रद्द करण्याची मागणी; आरक्षण उपवर्गीकरणविरोधी कृती समितीचा ठाम निर्धार

Follow Us on :

५९ अनुसूचित जातींचा एकजुटीचा एल्गार! १७ डिसेंबरला नागपूर विधानभवनावर ५ लाखांचा विराट मोर्चा!
उपवर्गीकरण धोरण रद्द करण्याची मागणी; आरक्षण उपवर्गीकरणविरोधी कृती समितीचा ठाम निर्धार
नागपूर (WH NEWS) : अनुसूचित जातींच्या प्रस्तावित आरक्षण उपवर्गीकरण धोरणाविरोधात महाराष्ट्रातील ५९ अनुसूचित जातींनी एकजुटीचा निर्धार केला असून, येत्या १७ डिसेंबर २०२६ रोजी नागपूरच्या विधानभवनावर पाच लाख नागरिकांचा भव्य संयुक्त विराट आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. उपवर्गीकरण धोरण अधिकृतपणे रद्द झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा ठाम इशारा आरक्षण उपवर्गीकरणविरोधी कृती समिती, महाराष्ट्र (विदर्भ विभाग) यांनी दिला आहे.


या मोर्चाच्या नियोजनासाठी १७ नोव्हेंबर २०२६ रोजी नागपूर येथील बानाई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह, उरवेला कॉलनी येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला विदर्भातील विविध जिल्ह्यांमधील ५९ अनुसूचित जातींचे सुमारे १०० ते १२५ सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत प्रस्तावित उपवर्गीकरण धोरणाचे सामाजिक, घटनात्मक आणि भविष्यातील संभाव्य परिणाम यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. चर्चेनंतर उपस्थित प्रतिनिधींनी एकमताने उपवर्गीकरण धोरणाला विरोध दर्शविला आणि १७ डिसेंबर रोजी पाच लाख नागरिकांचा विराट मोर्चा काढण्याचा ऐतिहासिक ठराव सर्वानुमते मंजूर केला.

या मोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ५९ अनुसूचित जातींचे सामाजिक ऐक्य, संघटनात्मक ताकद आणि घटनात्मक हक्कांच्या संरक्षणासाठीचा आवाज सरकारपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. मोर्चा यशस्वी करण्यासाठी विदर्भातील सर्व जिल्ह्यांसह संपूर्ण महाराष्ट्रात बैठका, जनजागृती, संघटनात्मक बांधणी आणि व्यापक जनसंपर्क अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.
‘उपवर्गीकरण अधिकृतपणे रद्द झाल्याशिवाय संघर्ष थांबणार नाही आणि आम्ही माघार घेणार नाही,’ असा ठाम निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

बैठकीला प्रमुख मान्यवरांची उपस्थिती
या बैठकीला आवाज इंडियाचे संचालक अमन कांबळे, ॲड. स्मिता कांबळे, विश्वास पाटील, ॲड. आकाश मुन, अशोक जोनवाल व टीम, बिरलाजी व टीम, श्रीराम बन्सोड, धर्मेश फुसाटे, डॉ. अशोक कुरकुडे, डॉ. सुचित बागडे, अरुण गाडे, डॉ. महेंद्र कांबळे, दिनेश गोडघाटे, ॲड. स्मिता ताकसांडे, इंजि. कल्पना मेश्राम, पायल लोकरे, अर्चना खोब्रागडे, करुणा तभाने, निकिता बोरकर व टीम, सुनील वाकोडे, शालिक जिल्हेकर, हृदय चक्रधर, राहुल कांबळे, अजय बागडे, संकेत शंभरकर, विनोद बन्सोड, अमोल बन्सोड, स्वप्नील हुमने, आकाश मुनेश्वर, ॲड. प्रशिक वानखेडे, ॲड. सुबोध आवळे, ॲड. कबीर कालिदास, प्रीतम, पराजक्ता नगराळे, गोविंद ढोके, सुमेध कांबळे, वंदना हाडके, दीपक डोंगरे, राजेंद्र दुपारे, मच्छिंद्र साळवे, कांचन उके, एस. वाय. वानखेडे, परशुराम वानखेडे, धीरज सहारे, रोशन नांदगाये, अरविंद तायडे, शारदा नंदेश्वर, राजेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

५९ जाती – एकच आवाज, एकच निर्धार!
१७ डिसेंबर रोजी नागपूरच्या विधानभवनावर होणाऱ्या या विराट मोर्चाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले असून, सामाजिक ऐक्य आणि आरक्षणाच्या हक्कांच्या संरक्षणासाठी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आरक्षण उपवर्गीकरणविरोधी कृती समिती, महाराष्ट्र यांच्या वतीने करण्यात आले आहे.

News By

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

यह भी पढ़िए