दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्यासाठी विधिमंडळ अधिवेशनात आवश्यक पूर्तता करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी अनुयायांसाठी सुविधा, सुरक्षा व वाहतुकीचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश

Follow Us on :

दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्यासाठी विधिमंडळ अधिवेशनात आवश्यक पूर्तता करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

– भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी अनुयायांसाठी सुविधा, सुरक्षा व वाहतुकीचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश

मुंबई, WH NEWS दि. १८ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील चैत्यभूमी येथे येणाऱ्या अनुयायांसाठी विविध सुविधा, सुरक्षा, वाहतूक, आरोग्य आणि स्वच्छतेच्या व्यवस्थांचे काटेकोर व समन्वित नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ हे नाव देण्यास राज्य शासनाने यापूर्वीच तत्वतः मान्यता दिली असून, केंद्र शासनाकडून प्राप्त मार्गदर्शनानुसार विधानमंडळाच्या समितीशी संबंधित आवश्यक प्रक्रियेची पूर्तता विधीमंडळ अधिवेशनात करून नामकरणाची कार्यवाही करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथील तयारीचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत आढावा घेण्यात आला. विधानभवनातील मंत्रिमंडळ सभागृहात आयोजित बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, गृह राज्यमंत्री योगेश कदम, माजी मंत्री संजय बनसोडे, समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, भाई गिरकर यांच्यासह विविध विभागांचे सचिव, वरिष्ठ पोलीस अधिकारी, रेल्वे, मुंबई महापालिका आणि भारतीय बौद्ध महासभा, अखिल भारतीय बौध्द भिख्खू संघ, आदी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

News By

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

यह भी पढ़िए