13.2 C
London
Tuesday, March 3, 2026

कुटुंबियांना प्रत्येकी ७५ लाख रुपये कंपनी तर्फे अणि राज्य सरकार तर्फे 5 व केंद्र सरकार कडून 2 लाख,

कुटुंबियांना प्रत्येकी ७५ लाख रुपये कंपनी तर्फे अणि राज्य सरकार तर्फे 5 व केंद्र सरकार कडून 2 लाख,

नागपूर WH NEWS – काटोल तालुक्यातील राऊळगाव येथील SBL Energy Limited मध्ये झालेल्या भीषण स्फोटप्रकरणी आज विभागीय आयुक्त कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीत स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ७५ लाख रुपये कंपनी तर्फे अणि राज्य सरकार तर्फे 5 व केंद्र सरकार कडून 2 लाख, तसेच जखमींना २५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. ही आर्थिक मदत जीवाची भरपाई करू शकत नाही, याची जाणीव सर्वांना आहे; मात्र मृतक व जखमींच्या कुटुंबियांवर अचानक ओढवलेल्या आर्थिक संकटाचा काही अंशी भार कमी करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरेल.

तसेच, या संपूर्ण घटनेची उच्चस्तरीय, निष्पक्ष आणि वेळबद्ध चौकशी करण्यात यावी, अशी ठाम भूमिका बैठकीत मांडण्यात आली. भविष्यात अशा दुर्दैवी घटना घडू नयेत यासाठी जबाबदारी निश्चित करून कठोर उपाययोजना राबविण्याचीही मागणी करण्यात आली.

बैठकीस पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री आशीष जैस्वाल, आमदार चरणसिंह ठाकूर, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी विपिन ईटनकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, पोलीस अधीक्षक हर्ष पोतदार जी, सलिल देशमुख उपस्थित होते.

- Advertisement -spot_imgspot_img
Latest news
- Advertisement -spot_img