श्री दादासाहेब धनवटे नगर विद्यालय शाळेने केले 150 वर्ष पूर्ण..गौरव ग्रंथाचे होणार प्रकाशन…गड़करीं राहणार उपस्थित

श्री दादासाहेब धनवटे नगर विद्यालय शाळेने केले 150 वर्ष पूर्ण..गौरव ग्रंथाचे होणार प्रकाशन…गड़करीं राहणार उपस्थित

नागपुर -शाळेचा शतकोत्तर सुवर्णमहोत्सव साजरा झाला . एखादी शाळा पिढ्या – दर – पिढ्या अलौकिक प्रतिभा असलेल्या नरत्नांच्या जडणघडणीचे केंद्र बनते , देशाला गरज असलेल्या प्रतिभावंतांच्या निर्मितीचे केंद्र बनते अशा शाळा फार मोजक्या आहेत असे मत गुरुवारी मुख्यद्यपिका अर्चना जैनाबादकर यांनी टिळक पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषद मध्ये व्यक्त केले.

श्री दादासाहेब धनवटे नगर विद्यालय शाळा महाराष्ट्रातील सर्वात जुनी शाळा आहे . या शाळेला 150 वर्षे तर या वास्तूला जवळजवळ 250 वर्षे पूर्ण झालीत . शाळेच्या प्रदीर्घ वाटचालीत शाळेने अनेक स्थित्यंतर बघितलीत . ब्रिटिश अमलापासून ते आजतगायत ही शाळा अनेक घटनांची साक्षीदार आहे . राजकीय , सामाजिक , सांस्कृतिक , कला , क्रीडा , विज्ञान अश्या सर्वच क्षेत्रात शाळेने देशपातळीवर आणि जागतिक पातळीवर नेतृत्व करणारे अनेक प्रतिभावंत घडविले . अनेक ऐतिहासिक घडामोडीची ही शाळा भाग राहिली . कवी केशवसूत , पहिले सरसंघचालक केशव हेडगेवार , महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक , पुरुषोत्तम दारव्हेकर , प्रकाश मंगळगिरी , भाऊ काणे , विश्राम जामदार , विजय मुनीश्वर , केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यासारखे अनेक विद्यार्थी शाळेने घडविले .

शाळेचा हा गौरवशाली प्रवास ग्रंथरूपात प्रकाशित व्हावा असा शाळेचा मानस होता . त्याला आता मूर्त रूप प्राप्त होत आहे . शाळेतील काही माजी विद्यार्थी , शिक्षक आणि मुख्याध्यापिका अर्चना जैनाबादकर यांच्या पुढाकारने मुख्यसंपादक राजीव देव यांच्या नेतृत्वात हा गौरव ग्रंथ मा . केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी व आंतरिक्ष शास्त्रज्ञ प्रकाश मंगळगिरी यांच्या हस्ते श्री दादासाहेब धनवटे नगर विद्यालय महाल नागपूर येथे दिनांक 18 सप्टेंबर 2022 रविवार ला सायंकाळी 6:00 वाजता प्रकाशित होत आहे . शाळेचे सर्व माजी विद्यार्थी , शाळा स्नेही सर्वांनी या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार व्हावे असे आवाहन श्री दादासाहेब धनवटे नगर विद्यालय शाळेच्या मुख्याद्यापिका अर्चना जैनाबादकर यांनी केले .

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More posts