राष्ट्रवादी काँग्रेस नगर परिषद / नगर पंचायत कर्मचारी संघटनेच्या नागपूर ( ग्रामीण ) जिल्हा अध्यक्ष पदी नगरसेवक प्रवीण घोडे यांची निवड
नागपूर :- राष्ट्रवादी काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय श्री.शरदराव पवार साहेब यांचे विचार व पक्षाचे ध्येय धोरण सर्वसामान्य जनते पर्यंत पोहोचवणे तसेच पक्ष संघटना बळकट करण्यासाठी तसेच जेष्ठ नेते मा.श्री.अजितदादा पवार साहेब व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.श्री. जयवंतरावजी पाटील साहेब यांचे मार्गदर्शना नुसार पक्षसंघटना वाढविणे व कर्मचाऱ्याचे प्रश्न स्थानिक स्तरावर व शासन स्तरावर सोडवणेसाठी ” राष्ट्रवादी काँग्रेस नगर परिषद नगर पंचायत कर्मचारी संघटनेची स्थापना करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस नगर पंचायत कर्मचारी संघटनेच्या नागपूर ग्रामीण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावणे कामी व पक्षाचे ध्येय धोरण समाजा पर्यंत पोहोचविणे करीता आपली जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात येत आहे.आपण पक्ष वाढीसाठी सक्रिय काम कराल व कर्मचारी यांना न्याय मिळवून द्याल असा विश्वास ठेवून या आशयाचे नियुक्ती पत्र महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस नगर परिषद / नगर पंचायत कर्मचारी संघटनाचे प्रदेशाध्यक्ष मा.सुभाष खु.मालपाणी यांनी हिंगणा नगर पंचायत चे नगरसेवक प्रविण घोडे यांना दिले. घोडे यांनी आपल्या निवडीचे श्रेय, राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार , जेष्ठ नेते मा.अजितदादा पवार ,प्रदेशाध्यक्ष जयवंतराव पाटील , माजी मंत्री रमेशचंद्रजी बंग , यांना दिले या नियुक्तीचे पत्र मा.रमेशचंद्रजी बंग यांच्या निवासस्थानी बंग साहेबांच्या हस्ते देण्यात आले.
या प्रसंगी शामबाबू गोमासे , राजुभाऊ गोतमारे , बबनराव अव्हाले सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती , नरेश नरड संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणा , प्रभाकर लेकुरवाळे संचालक खरेदी विक्री हिंगणा , हिंगणा , योगेश सातपुते सरपंच सातगाव , सुनिल बोदांडे पं.स.सदस्य हिंगणा , उमेश राजपूत पं. स.सदस्य हिंगणा , गुणवंत चामाटे नगरसेवक हिंगणा , दादाराव इटनकर नगरसेवक , विशाखा लोणारे नगरसेविका , मेघा भगत नगरसेविका , रामराव येळणे , श्रावण राऊत , सुधाकर धामंदे , अरुण भोयर , विनोद येळणे , प्रतीक येळणे , अशोक नागपुरे , भूषण लोणारे ,
Leave a Reply