नियमित वीज बिल वसूल करा, वीज चोरी विरुद्ध सतत मोहिमा राबवा:प्रादेशिक संचालक सुहास रंगारी

Follow Us on :

नियमित वीज बिल वसूल करा, वीज चोरी विरुद्ध
सतत मोहिमा राबवा:प्रादेशिक संचालक सुहास रंगारी
नागपूर दि.१५ सप्टेंबर २०२०: महावितरणला आर्थिकदृष्या सक्षम करणे अत्यंत अत्यावश्यक असून त्यासाठी नियमित वीज बिल वसूल करा थकबाकीदारांची वीज खंडित करा, वीज बिल वसुली व वीज चोरी रोखण्यासाठी सतत मोहिमा राबवाव्या, असे निर्देश महावितरणच्या नागपूर प्रादेशिक विभागाचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांनी दिले.

नागपूर प्रादेशिक विभाग अंतर्गत येणाऱ्या पाचही परिमंडळातील मुख्य अभियंते, अधीक्षक अभियंते आणि कार्यकारी अभियंते यांची आढावा बैठक नागपूर प्रादेशिक कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांनी सर्व परिमंडलांतील कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. सर्वच वर्गवारीतील ग्राहकाकांकडे थकबाकी राहणार नाही यासाठी अभियंते,कर्मचारी यांनी नियमितपणे वीज बिल वसुली मोहीम राबवावी. वीज चोरांविरुद्ध सातत्याने कठोर कारवाई करावी,असे निर्देश सुहास रंगारी यांनी दिले.तसेच यात हयगय करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येइल असा इशारा त्यांनी दिला.

केंद्र सरकारच्या अर्थ सहाय्याने महावितरणद्वारे राबविण्यात येणार असलेल्या सुधारित वितरण क्षेत्र योजनेचे मुख्य उद्दीष्ट हे वीजहानी कमी करण्याचे असून त्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी,१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान राबविण्यात येणाऱ्या सेवा सप्ताहात महावितरणशी संबंधित सेवांची तातडीने पूर्तता करण्यात यावी,सोलर रूफ टॉप योजनेचा जास्तीत-जास्त लाभार्थ्यांना लाभ मिळेल यासाठी एजन्सी सोबत समन्वय साधून त्याला गती देण्याचे निर्देश प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांनी बैठकीत दिले. या बैठकीत या महिन्यात सेवानिवृत्त होणाऱ्या बुलढाण्याचे अधीक्षक अभियंता संजय आकोडे यांचा प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या आढावा बैठकीत नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके,चंद्रपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील देशपांडे, अकोला परिमंडलाचे मुख्य अभियंता अनिल डोये,अमरावती परिमंडलाच्या मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण,गोंदिया परिमंडलाचे मुख्य अभियंता (प्रभारी) राजेश नाईक,महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) शरद दाहेदार,नागपूर परिक्षेत्र कार्यालयातील अधीक्षक अभियंते हरीश गजबे,अविनाश सहारे,उपमहाव्यवस्थापक (मानव संसाधन) रूपेश देशमुख ,सहमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मधुसूदन मराठे सर्व परिमंडलाचे अधीक्षक अभियंते,कार्यकारी अभियंते उपस्थित होते.

News By

  • WH NEWS is an independent digital news platform committed to factual, balanced, and public-interest journalism across Maharashtra. We provide structured reporting on political developments, civic issues, social matters, cultural events, and government updates. Our aim is to present verified information with neutrality, transparency, and professional ethics. All content is published strictly for informational purposes. Views expressed by interviewees are their personal opinions. WH NEWS respects the Constitution of India, the rule of law, and the authority of courts and public institutions. WH NEWS operates independently without external control. Any financial support received is strictly voluntary and accepted only as goodwill support for journalism. No demand, solicitation, pressure, or conditional benefit is ever involved. Contributions are used solely for reporting, production, and operational expenses and never influence editorial decisions.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

यह भी पढ़िए