लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी युवकांनी राजकारणात यावे
– युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी/मेहकर (बुलढाणा)
देशात अतिशय गलिच्छ राजकारण सुरू असून, गोरगरिबांना जीवन जगण्यास असह्य करून सोडणाऱ्या भाजप सरकारच्या अन्याय व हुकूमशाही धोरणांविरोधी लढा देण्याची आता वेळ आली आहे. हा लढा राष्ट्रीय युवक काँग्रेसच्या माध्यमातून युवकांना एकत्रित करून द्यायचा आहे. तरच या देशात लोकशाही व सामान्य जनता टिकून राहील, असे प्रतिपादन युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत यांनी डोणगाव येथे केले. युवक काँग्रेसच्या“माझा गाव- माझी शाखा उपक्रमाच्या शुभारंभवेळी ते बाेलत हाेते.
जिल्हा युवक काँग्रेस कमिटीच्यावतीने आयाेजित शुभारंभ कार्यक्रम व कार्यकर्ता मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश युवक काँग्रेस प्रदेश सचीव मनोज कायदे, किसान काँग्रेस सेल चे जिल्हा उपाध्यक्ष विनायकराव टाले, युवक कॉग्रेस जिल्हा अध्यक्ष अनिकेत मापारी, जिल्हा महासचिव ज़ैनुल आबेद्दीन शेख, युवक कॉग्रेस विधानसभा अध्यक्ष भारत राठोड, दिलीप बोरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रदेश सचिव मनोज कायंदे यांनी सांगितले की, पक्षाला पुन्हा उभारी आणायची असेल तर या उपक्रमाचा शुभारंभ गावोगावी करून तरुणांना शाखेत समाविष्ट करावे. या कार्यक्रमासाठी युवक काँग्रेसचे नवनियुक्त शहराध्यक्ष सागर सरकटे, संपर्कप्रमुख आवेज़ खान, सचिव साजिद खान, अब्दुल वासिम अब्दुल वहाब, सचिन दिपके, वसीम बागवान, आसीफ शेख, अब्दुल हन्नान, शेख अशपाक यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a Reply