बारसे यांना स्व . बाळासाहेब तिरपुडे जीवनगौरव पुरस्कार जहीर
नागपुर – महाराष्ट्र राज्याचे प्रथम उपमुख्यमंत्री व महाराष्ट्र प्रदेश इंदिरा कॉंग्रेस समितीचे संस्थापक अध्यक्ष आणि युगांतर शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व . नाशिकराव उपाख्य बाळासाहेब तिरपुडे यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 16 जानेवारी 2023 रोजी सकाळी 9.30 वाजता युगांतर शिक्षण संस्थेच्या सिव्हील लाईन्स परिसरात जीवनगौरव पुरस्कार वितरण समारंभ स्व . बाळासाहेब तिरपुडे स्मृती जयंती समितीव्दारा आयोजित केला आहे .
एक यशस्वी राजकारणी व कर्तबगार प्रशासक म्हणून बाळासाहेब परिचित आहेत . सोबतच कीडा क्षेत्र व वंचित घटकांसाठीच्या मदतकार्याचीही त्यांना आवड होती . स्व . बाळासाहेब तिरपुडे जीवनगौरव पुरस्कार प्रख्यात समाजसेवक व झोपडपट्टी फुटबॉल या लोकप्रिय खेळाचे जनक प्रा . विजय बारसे यांना प्रदान करण्यात येणार आहे .
सामाजिक क्षेत्रात अविरतपणे कार्य करणारे निवृत्त कीडा प्राध्यापक प्रा . बारसे यांनी दूर्बल घटकातील तरुणांसाठी झोपडपट्टी फुटबॉल हा खेळ लोकप्रिय केला व आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी खेळाडूंची निवड केली . त्यांच्या कीडा विकास संस्थेच्या माध्यमातुन प्रा . बारसे यांनी समाजातील वंचित वर्गातील तरुणांचे पुनर्वसन करून त्यांना वाईट कार्यापासुन दूर ठेवण्याचे कार्य केले आहे .
प्रा . बारसे यांच्या व्यक्तिमत्वापासुन प्रेरणा घेऊन प्रसिध्द सिनेनिर्माते नागराज मंजुळे यांनी ‘ झुंड ‘ हा हिंदी चित्रपट केला असुन सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी प्रा . बारसे यांची व्यक्तीरेखा साकारली आहे . प्रा . बारसे या वैदर्भिय व्यक्तीच्या विशेष कार्याचा गौरव युगांतर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री . राजकुमार तिरपुडे यांच्या हस्ते स्व . बाळासाहेब तिरपुडे जीवनगौरव पुरस्काराने करण्यात येईल . संस्थेच्या कार्याध्यक्षा श्रीमती वनिता तिरपुडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील .
समाजातील विविध क्षेत्रातील लोकांना कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे . युगांतर शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्री कलश तिरपुडे , सरचिटणीस श्री . गणेश गौरखेडे , सचिव श्री . बाबा कोंबाडे , डॉ . स्वाती धर्माधिकारी , डॉ . ललित खुल्लर , डॉ . विवेक अवसरे , प्रा . शिल्पा जिभेकर , डॉ . रोशन गजबे पत्रकार परिषदेस उपस्थित होते .