8.6 C
London
Wednesday, March 4, 2026

आदिवासी समाजातून राज्यसभेकडे वाटचाल; मायाताई ईवनाते यांना भाजपची संधी?

आदिवासी समाजातून राज्यसभेकडे वाटचाल; मायाताई ईवनाते यांना भाजपची संधी?

नागपूर WH NEWS – अनुसूचित जमाती समाजातून पुढे आलेल्या ज्येष्ठ नेत्या मायाताई ईवनाते यांची राज्यसभेसाठी वर्णी लागण्याची शक्यता असून भारतीय जनता पक्षाकडून त्यांचे नाव चर्चेत आले आहे. त्यांच्या नावाच्या चर्चेमुळे नागपूरसह विदर्भाच्या राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे.

मायाताई ईवनाते या नागपूरच्या माजी महापौर असून त्यांनी १५ डिसेंबर २००७ ते २३ डिसेंबर २००९ या कालावधीत नागपूर महानगरपालिका येथे महापौरपद भूषवले. त्यांच्या कार्यकाळात शहर विकासाच्या विविध उपक्रमांना गती मिळाली होती.
त्या अनेक वर्षांपासून भारतीय जनता पक्ष मध्ये सक्रिय आहेत. शहर आणि प्रदेश पातळीवर विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पक्ष संघटनेत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

मायाताई या आदिवासी समाजातून येतात आणि सामाजिक प्रश्नांवर सातत्याने काम करत आहेत. त्यांनी राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग (NCST) च्या सदस्य म्हणूनही काम पाहिले आहे. त्यामुळे अनुसूचित जमाती व वंचित घटकांच्या प्रश्नांची त्यांना सखोल जाण आहे.
राजकीय कारकिर्दीचा आढावा:
2002 – नगरसेवक (भाजप)
2007 – महापौर, नागपूर
2012 – नगरसेवक (भाजप प्रदेश उपाध्यक्ष)
2017 – राष्ट्रीय आदिवासी सदस्य
2026 – प्रभाग 12 मधून नगरसेवक, तसेच अग्निशमन सभापती, मनपा नागपूर
2026 मध्ये पुन्हा एकदा त्यांनी प्रभाग क्रमांक 12 मधून नगरसेवक म्हणून विजय मिळवला असून सध्या त्या मनपा नागपूरमध्ये अग्निशमन समितीच्या सभापती म्हणून कार्यरत आहेत.
राज्यसभेसाठी त्यांचे नाव पुढे आल्याने आदिवासी समाजाला प्रतिनिधित्वाची संधी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पक्ष नेतृत्वाकडून अंतिम निर्णय झाल्यानंतर अधिकृत घोषणा होण्याची अपेक्षा आहे.

- Advertisement -spot_imgspot_img
Latest news

- Advertisement -spot_img