खैरी पिन्नासे (संगम) येथे भगत परिवाराकडून गरजू नागरिकांना ब्लॅंकेट वाटप; दिवंगत उत्तमराव भगत यांना वाहिली श्रद्धांजली

0
3

खैरी पिन्नासे (संगम) येथे भगत परिवाराकडून गरजू नागरिकांना ब्लॅंकेट वाटप; दिवंगत उत्तमराव भगत यांना वाहिली श्रद्धांजली
खैरी पिन्नासे (संगम), ता. नागपूर —
उत्कर्ष ज्ञानविकास बहुउद्देशीय संस्था, नागपूर यांच्या वतीने दिवंगत उत्तमराव भगत यांच्या स्मृतिपित्यर्थ आज दिनांक 12/12/2025 रोजी खैरी पिन्नासे (संगम) ग्रामपंचायतीमध्ये गरजू व आर्थिक दृष्ट्या दुर्बल नागरिकांना ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले.गेली अनेक वर्षा पासून जनार्धन भगत सामाजिक उपक्रम राबवत आहे.


कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ग्रामपंचायत सरपंच श्री. चंद्रशेखर पिन्नासे यांनी भूषविले, तर प्रमुख उपस्थिती म्हणून नानाभाऊ लापकाळे, माजी सरपंच (नागलवाडी) हे राहिले. कार्यक्रमाचे संचालन उपसरपंच राहुल सुधाकर पिन्नासे यांनी केले.
या सामाजिक उपक्रमात भगत परिवारातर्फे जनार्दन भगत, देवानंद भगत, सौ. रजनी भगत तसेच उत्तम किड्स कॉन्व्हेंटच्या प्रिन्सिपल रजनी बगडे, शिक्षिका चित्रा सहारे, महादेव मांदाळे यांची विशेष उपस्थिती होती.
गावातील अनेक गोर-गरीब व गरजू नागरिकांना ब्लॅंकेटचे वितरण करण्यात आले. लाभार्थ्यांमध्ये बच्छला मौजे, आशाबाई पडघान, लीलाबाई सहारे, बिंदाबाई उगले, सुशीला क्षीसागर, अंजनाबाई कुसवाम, बेबीबाई वानखेडे, भागाबाई राठोड, लक्ष्मीबाई कंगाले, सुमान शेख, परवीन सुमान शेख, कांता बाई वानखडे, विठाबाई वांढरे, धनुबाई साखरकर, बेबीबाई नेवारे, हेमराज भोंडे, बबन लाड, सखुबाई टेटे, लताबाई, निर्मला इखनकर यांचा समावेश होता.
कार्यक्रमास गावातील अनेक नागरिक उत्स्फूर्तपणे उपस्थित राहिले. मानवसेवा आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या कार्याबद्दल उपस्थितांनी भगत परिवाराचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here