शाक्यभूषण मित्र परिवार सेवाग्रामतर्फे ‘गुरु-शिष्य स्नेहमिलन’ व बुद्ध-भीम गीतांचा आषाढी पौर्णिमा महोत्सव उत्साहात साजरा
वर्धा सेवाग्राम (ब्युरो) – शाक्यभूषण मित्र परिवार, सेवाग्राम यांच्या वतीने आयोजित ‘गुरु-शिष्य स्नेहमिलन आणि बुद्ध-भीम गीतांचा आषाढी पौर्णिमा महोत्सव अत्यंत भक्तिभावाने आणि सामाजिक एकतेचा संदेश देत मोठ्या उत्साहात पार पडला.या कार्यक्रमातून गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व, सामाजिक समतेचे मूल्य आणि धम्मविचारांची प्रेरणा उपस्थितांपर्यंत पोहोचविण्यात आली.
कार्यक्रमाची सुरूवात वंदनगीताने करण्यात आली, जे कवी, गायक विनोद बाबू कांबळे (मनचला) यांनी सादर केले. त्यांच्या सुमधुर गायनाला संगीत संयोजक छोटू भुजाडे व त्यांच्या संचाने दिलेली साथ मंत्रमुग्ध करणारी ठरली.
कार्यक्रमात अनेक प्रभावी बुद्ध-भीम गीते सादर करण्यात आली. त्याचा समारोप परमानंद भारती यांच्या हृदयस्पर्शी गीताने झाला, ज्याने वातावरण भारावून गेले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दीपक भोंगाडे यांनी तर आभार प्रदर्शन रविभाऊ गणविर यांनी केले.
या प्रेरणादायी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये मा. राहुल थुल, नागसेन मानकर, रविभाऊ गणविर, दिनेश ताकसांडे, छोटू भुजाडे, पिंटू भोंगाडे, देवानंद कांबळे, पंकज भुजाडे, गौतम सोनटक्के, नंदू जवादे, सोनू मेश्राम यांचे विशेष योगदान लाभले.
धम्म, संस्कृती व एकतेचा संगम ठरलेला हा महोत्सव सेवाग्राममध्ये कायम स्मरणात राहील, अशी उपस्थितांची भावना होती.
Leave a Reply