25 सेप्टेंबर ला मराठी पुरोगामी पत्रकार संघाची राज्य स्तरीय परिषद पुणे येथे होणार
नागपुर – मराठी पुरोगामी पत्रकार संघाची (MPPS)राज्य स्तरीय परिषद पुणे येथे दिनांक 25 सप्टेंबर 2022 रोजी येरवडा जैल नजिक बार्टी हॉल मध्ये आयोजित करण्यात आली आहे.या परिषद मध्ये विविध विषयांवर चर्चा होणार असून समाजा समोरील प्रश्न या विषयावर सुद्धा प्रकर्षाने चर्चा आहे।शिवाय आर्थिक संधी यावर ही मार्गदर्शन केलं जाणार आहे.सदर परिषद बार्टी संस्थेच्या सहकार्याने होत असल्याची माहिती मराठी पुरोगामी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुधाकर काश्यप, सचिव विजय गायकवाड यांनी दिली. सदर परिषद ला राज्यभरातील पत्रकार उपस्थित राहतील.जिल्हा,तालुक्का स्तरावरील पत्रकारांनी आपली नोंदणी वेळीच करून घेण्याची विनंती संघाने केली.
कार्यक्रमाची माहिती..
कार्यक्रमाचा दिनांक 25 सप्टेंबर 2022
वेळ -सकाळी 9.30 ते संध्याकाळी 5.30 पर्यंत
ठिकाण – बार्टी हॉल , येरवडा जेल नजीक,पुणे
वक्ते –
1) आयु धम्मज्योति गजभिये (आयपीएस)
महासंचालक , बार्टी .
2) बिपीन जगताप ,CEO,खादी ग्रामोद्योग महामंडळ
3) डॉ विजय कदम, सामजिक कार्यकर्ते , मुंबई
4) दीपक मेढे , समनव्यक , MPPS , अहमदनगर.
5) भुपेंद्र गणवीर , सल्लागार , MPPS , नागपूर
6) भगवान पगारे , उपाध्यक्ष , MPPS .
कार्यक्रमाची रूपरेषा अशी असणार आहे.
1) 9.30 ते 9.45 नोंदणी
2) 9.45 ते 10.30
परिषद उदघाटन आणि मार्गदर्शन :-
धम्मज्योति गजभिये. महासंचालक , बार्टी.आणि इतर वक्ते.
3) 10.30 ते 11.00 विषय:- हौसिंग सोसायटी
वक्ते :- भुपेंद्र गणवीर , नागपूर.
वक्ते :- सुरेश कांबळे , कोल्हापूर
4)11 ते 1 खादी ग्रामोद्योग योजना.
वक्ते :- बिपीन जगताप , CEO,
खादी ग्रामोद्योग महामंडळ
1 ते 1.30 लंच
5)1.30 ते 2.30 विषय:- सोशल मीडिया मार्केटिंग
वक्ते :- दीपक मेढे , अहमदनगर .
6) 2.30 ते 3.30
विषय:-अट्रोसिटी प्रतिबंध कायदा
वक्ते -धम्मज्योति गजभिये. महासंचालक , बार्टी.
तरी सर्व जिल्हाध्यक्ष यांनी याची नोंद घ्यावी. कार्यक्रमा साठी आपण जास्तीत जास्त 80 जनांची व्यवस्था केली आहे. सहभागी इच्छुक सदस्यांनी वेळीच नाव नोंदणी केल्यास त्याचा नियोजनासाठी उपयोग होऊ शकतो. म्हणून सर्वांकडून सहकार्याची अपेक्षा आहे.
सुधाकर काश्यप , अध्यक्ष , MPPS
विजय गायकवाड, सचिव , MPPS
विभाग अध्यक्ष
संजय शेंडे , अमरावती विभाग
विजय खवसे, नागपूर विभाग
प्रकाश साळवे, नाशिक विभाग
सुनील डोंगरे , औरंगाबाद विभाग
विकास गजभारे , नांदेड विभाग
सुरेश कांबळे , पुणे विभाग ,कोकण विभाग
———————–—————-–————