राष्ट्रीय भीम सेनेची राजकीय पक्षात नोंदणी…राष्ट्रीय अध्यक्ष श्रीधर साळवे
नागपूर : स्वाभिमानी सामाजिक संघटना भीमसेनेची सण २०१२ मध्ये नागपुरच्या उत्तर नागपुरातून सुरुवात झाली..आज त्या भीमसेनेला ‘राष्ट्रीय भीमसेना’ म्हणून निवडणूक आयोगाने मान्यता दिली.
या संस्थेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला सामाजिक, आर्थिक प्रश्नांवर न्याय देण्याचे काम केले आहे. या कार्याची लोकप्रियता लक्षात बघता भीमसेने ला राष्ट्रीय भीम सेना या नावाने नवीन पक्षाची महाराष्ट्र मुख्य निवडणूक आयुक्तांकडे नोंदणी केली आहे. अशी माहिती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीधर साळवे यांनी नुकत्याच झालेल्या पत्रपरिषदेत दिली.
आता राष्ट्रीय भीमसेना महाराष्ट्रात होणार्या महानगरपालिका, नगरपरिषद, नगर पंचायतीच्या सर्व निवडणुका महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात लढवणार आहे. असेही साळवे म्हणाले. जाती-धर्ममुक्त भारत हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. भारतात समता, बंधुता, न्याय प्रस्थापित व्हावा तसेच हा देश महान सम्राट अशोकाचा भारत देश असावा हा आमचा उद्देश आहे.
या मुद्द्यावर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये प्रचार व प्रसार करण्यात येणार आहे. येत्या निवडणुकीत या मुद्द्यांवर उमेदवारांना उभे करून विजयी करण्याचे काम केले जाणार आहे. शाहू-फुले-आंबेडकरांचे ध्येय पूर्ण करण्यासाठी आमचा पक्ष सदैव तत्पर असेल. अशी ग्वाही यावेळी श्रीधर साळवे यांनी पत्रपरिषदेत दिली.
Leave a Reply