नांदेडमध्ये पँथर्सचा शुक्रवारी राज्यस्तरीय गौरव सोहळा..
अविनाश महातेकर, गंगाधर गाडे, जयदेव गायकवाड, दिवाकर शेजवळ प्रमुख अतिथी
नांदेड दि.१२ ऑक्टोबर २०२२:
नामांतराच्या लढ्यात घरे-दारे, संसाराची सर्वाधिक आहुती, बलिदान देणाऱ्या आणि दलित पँथरला संजीवनी देणाऱ्या मराठवाड्यात पँथरच्या स्थापनेचा सुवर्ण महोत्सव येत्या १४ ऑक्टोबर(शुक्रवार) रोजी दणक्यात साजरा होणार आहे. हा समारंभ दुपारी १२ ते संध्याकाळी ६ वाजेच्या दरम्यान नांदेडच्या कुसुम सभागृहात पार पडणार आहे.
या सोहळ्यात राज्यभरातील झुंजार, त्यागी, समर्पित पँथर्सचा गौरव करण्यात येणार आहे, अशी घोषणा ज्येष्ठ रिपब्लिकन नेते, ‘पँथर’ सुरेशदादा गायकवाड यांनी राज्यात आज एका पत्रकाद्वारे केली आहे. नांदेडच्या दलित पँथर सुवर्ण महोत्सव समितीने पँथरच्या या गौरव सोहळ्याचे आयोजन केले असून सुरेशदादा गायकवाड हे त्याचे स्वागताध्यक्ष आहेत.
या समारंभाचे उदघाटन ज्येष्ठ पँथर नेते, माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
माजी आमदार ‘पँथर’ जयदेव गायकवाड (पुणे) ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ(मुंबई), ज्येष्ठ पँथर नेते गंगाधर गाढे( औरंगाबाद) हे या समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत, असे गायकवाड यांनी सांगितले.
पँथरच्या या राज्यस्तरीय सन्मान सोहळ्यात आंबेडकरी चळवळीचे समीक्षक प्रा. एम. आर. कांबळे(सोलापूर), प्रख्यात साहित्यिक प्रा. डॉ. प्रकाश मोगले हे प्रमुख मार्गदर्शक आहेत, अशी माहिती दलित पँथर सुवर्ण महोत्सव समितीच्या पत्रकात त्यांनी दिली आहे.
दुपारी १२ वाजता पँथरच्या लढ्यातील शहिदांच्या आणि आंबेडकरी चळवळीतील दिवंगत सेनानीच्या वारसांचा सन्मान करण्यात येणार आहे.
तर, दुपारी २.३० वाजता मराठवाड्याच्या औरंगाबाद, परभणी, हिंगोली, लातूर, बीड, जालना, उस्मानाबाद, नांदेड या आठही जिल्ह्यातील झुंजार, समर्पित पँथर्सचा खास सत्कार करण्यात येणार आहे.
या समारंभात ज्येष्ठ पत्रकार बी. व्ही. जोंधळे, रामभाऊ पेरकर, किशोर थोरात( माजी उप महापौर) संजय उजगरे, ज्येष्ठ पत्रकार जी. पी. मिसाळे, प्रा. सुनील मगरे, प्रा. प्रतिभा आहिरे, गौतम लांडगे, राजानंद सुरडकर यांचाही विशेष सन्मान करण्यात येईल, अशी माहिती सुरेशदादा गायकवाड यांनी दिली.
या सोहळ्याच्या प्रसंगी नांदेडचे शाहीर गौतम पवार आणि संचातर्फे क्रांतिकारी आंबेडकरी जलसा सादर केला जाणार आहे असी माहिती सुरेशदादा गायकवाड
स्वागताध्यक्ष, दलित पँथर सुवर्ण महोत्सव समिती सुरेशदादा गायकवाड यांनी दिली… संपर्क मो:8421883300
Leave a Reply