काँग्रेस सोबत आघाडी संपुष्टात- प्रा. जोगेन्द्र कवाडे – भीमसैनिकांचा राष्ट्रीय मेळाव्यात प्रा. कवाडे यांची घोषणा

काँग्रेस सोबत आघाडी संपुष्टात- प्रा. जोगेन्द्र कवाडे
– भीमसैनिकांचा राष्ट्रीय मेळाव्यात प्रा. कवाडे यांची घोषणा
WH News प्रतिनिधी/नागपूर
गेल्या दिड दशकापासून कॉंग्रेस आघाडीमध्ये मित्रपक्ष म्हणून काँग्रेस पक्षाने सम्मानपूर्वक सत्तेत वाटा देत आपले राजकीय मित्रत्व जपून आघाडीचा धर्म पाळणे आवश्यक होते. परंतु तसे न करता पीपल्स रिपब्लिकन पक्षाची सातत्याने उपेक्षा करून जो विश्वासघात केले आहे. अशा कॉंग्रेस पक्षासोबत असलेली आघाडी संपुष्टात येत असल्याचे प्रा. जोगेन्द्र कवाडे यांनी जाहीर केले. तसेच यापुढे विश्वासपात्र नसणाऱ्या पक्षासोबत निवडणूक विषयक आघाडी न करता पक्षाद्वारे आगामी काळातील सर्व निवडणूका या स्वबळावर लढविल्या जाणार तसेच इतर कोणत्याही राजकीय पक्षाकडून सन्मानजनक प्रस्ताव आल्यास आघाडीचा विचार देखिल केल्या जाईल अशी स्पष्ट भूमिका पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खा. प्रा. जोगेन्द्र कवाडे यांनी मागपूर येथे पक्षाव्दारा आयोजित सांस्कृतिक दहशतवाद बिमोड भीमसैनिक मेळाव्यामध्ये बोलतांना स्पष्ट केली आहे.

पिपल्स रिपब्लिकन पार्टीच्यावतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पूर्वसंध्येला लाँगमार्च प्रणेता, माजी खासदार प्रा. जोगेन्द्र कवाडे यांच्या अध्यक्षतेखाली सांस्कृतिक दहशतवाद बिमोड भीमसैनिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
हजारो भीमसैनिकांच्या उपस्थितीत मेाळाव्याला संबोधीत करतांना पक्षाध्यक्ष प्रा. जोगेन्द्र कवाडे सर पुढे म्हणाले की, देशभरात विघटनवादी प्रवृत्तीचा धूमाकुळ चालु आहे. त्यांच्या धार्मिक व जातीय उन्मादामुळे राष्ट्रीय एकात्मता व अखंडतेला बाधा पोहचत आहे. केन्द्र सरकार हे देखिल संविधानानुसार नाही तर आर.एस.एस.चा अजेंडा राबवून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान बदलवू पाहत आहे.

सांस्कृतिक दहशतवादाच्या माध्यमातून दहशतवाद पसरवून दलित, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक समुदायांना लक्ष करून त्यांचेवर अत्याचार केले जात आहे. लोकशाहीला संपुष्टात आणून हुकूमशाही प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केल्या जात आहे आणि म्हणूनच देशात फोफावत चाललेल्या सांस्कृतिक दहशतवादाचा बिमोड करण्याचा संकल्प करून संविधान वाचविण्यासाठी भीमसैनिक आपल्या प्राणाचे मोल देण्याची तयारी ठेवून संविधानाचे रक्षण करतील याची जाणिव घटना बदलवू पाहणाऱ्या धर्मांधांनी ठेवावी, असे आपल्या अध्यक्षीय भाषणातून बोलताना प्रा. जोगेन्द्र कवाडे ठणकावून सांगितले.

पिपल्स रिपब्लिकन पार्टीच्यावतीने पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष युवानेते जयदीप कवाडे यांनी निमंत्रीत केलेल्या ‘सांस्कृतीक दहशतवाद बिमोड भीमसैनिक मेळाव्याचे उद्घाटन पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष गोपाळराव आटोटे यांचे हस्ते करण्यात आले.
या भव्य मेळाव्यात प्रामुख्याने प्रा. जोगेन्द्र कवाडे यांनी सामाजिक, आर्थिक, मुद्यांवरही आपले विचार व्यक्त करताना म्हटले की, यापूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारने मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीतील असलेले 33 टक्के आरक्षण रद्द करण्याचा जो निर्णय घेऊन सामाजिक अन्याय केला त्या संबधाने बोलतांना म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने जे निर्णय घेतले होते तेच निर्णय आताच्या विद्यमान शिंदे-फडणविस सरकारने रद्द करण्याचे जाहीर केले.

त्याप्रमाणेच मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील आरक्षण हटविण्याचा निर्णय घेतल्या गेला होता. तो निर्णय देखिल रद्द करून पदोन्नतीतील 33 टक्के आरक्षण पूर्ववत चालू करावे आणि भागासवर्गीयांना दिलासा द्यावा अशी मागणीही करत विद्यमान सरकारकडूनही या मागणी संबधाने दुर्लक्ष केल्या गेले तर पिपल्स रिपब्लिकन पार्टीव्दारा तीव्र आंदोलन छेडल्या जाण्याचा इशाराही यावेळी प्रा. कवाड यांनी दिला आहे.

प्रामुख्याने भीमसैनिक मेव्याचे निमित्ताने पक्षाच्या वतीने ११ ठराव पारीत करण्यात आले.

भीमसैनिकाच्या राष्ट्रीय मेनव्यामध्ये पिपल्स रिपब्लिकन पार्टी राष्ट्रीय अध्यक्षपदी पुढील तीन वर्षाकरिता माजी खासदार प्रा. जोगेन्द्र कवाडे यांची फेर निवड करण्यात येत असल्याचे घोषित करण्यात आले तर राष्ट्रीय कार्याध्य युवानेते जयदीप कवाड यांची फेर निवड करण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले.

यावेळी मंचावर युवा नेता जयदीप कवाडे, कैलास बोंबले, ऍड. जे. के. नारायण, गणेशभाई उन्हवणे, चरणदास इंगोले, गणेशराव पडधन, बापुसाहेब गजभारे, प्रमोद टाले. विजय वाघमारे, चौधरी छत्रपालसिंह (हरियाणा), राजकिशोर आनंद (नवी दिल्ली), सुरेशभाई सोनवणे (गुजरात), इंद्रजित घाटे, भगवान आढाव, प्रा, पुरुषोत्तम पाटील, अनिल तूरुकमारे, नरेंद डोंगरे, दिलीप भिसे, दौलत हिवराळे, युवराज कामळे, मेघराज डोंगरे, राजेश जाधव, भगवान कांबळे, महिला आघाडीच्या सुवर्णा वानखेडे, सविताताई नारनवरे, मिनाबाई अविंग, संजय खांडेकर, प्रा. मुनेश्वर बोरकर, अरुण वाहने, सुमेध मुरपाठकर च्यासह विविध राज्यातून आलेले नेते उपस्थित होते.

ताजा अपडेट