कन्हान सिहोरा येथे 4 ऑक्टोबरला धम्मदेशना व बुद्धमूर्ती वितरण.. – आंतरराष्ट्रीय भंते वज्र मेथी डॉ. पोंचाई पीनिया पोंपोंग यांची उपस्थिती – गगन मलिक फौंडेशनचे भव्य आयोजन

कन्हान सिहोरा येथे 4 ऑक्टोबरला धम्मदेशना व बुद्धमूर्ती वितरण..
– आंतरराष्ट्रीय भंते वज्र मेथी डॉ. पोंचाई पीनिया पोंपोंग यांची उपस्थिती
– गगन मलिक फौंडेशनचे भव्य आयोजन
WH प्रतिनिधी/नागपूर (कन्हान)
गगन मलिक फौंडेशनच्या विद्यमाने येत्या 4 ऑक्टोबर रोजी म्हणजेच धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पूर्वसंध्येला आंतरराष्ट्रीय भंते गण तसेच आंतरराष्ट्रीय धम्म प्रचारक नागपूर लगतच्या कन्हान सिहोरा येथील बुद्धा स्पिरीचल पार्क येथे धम्मदेशना करणार आहेत. दरम्यान फाउंडेशनच्या वतीने 11 हजार 111 बुद्ध मूर्तींचे वितरणही होणार आहे.

या भव्य दिव्य अशा कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय बनते व जरा मेथी डॉक्टर पोंनचीयी पिनीया पोंग् यांच्या सह १२६ लोकांचे आंतरराष्ट्रीय डेलिगेशन उपस्थित राहणार आहे. यासह प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री रामदास आठवले, रामटेकचे खासदार कृपाल तुमाने, गगन मलिक फौंडेशनचे अध्यक्ष तथा अभिनेता गगन मलिक, माजी आमदार डॉक्टर मिलिंद माने, कान्हानच्या नगराध्यक्ष करुणा आष्टनकर यासह इतर मान्यवर उपस्थित राहतील.

आंतरराष्ट्रीय भंतेचे हे डेलिगेशन 2 ऑक्टोबरला नागपुरात दाखल होणार आहेत. 4 ऑक्टोबरला सकाळी ५ वाजता सिहोरा (कन्हान) येथे भव्य अशा डोममध्ये धम्मदेशनेचा कार्यक्रम सुरू होईल. यानंतर दुपारी 12 वाजतापासून बुद्ध मूर्ती वितरण कार्यक्रमाला सुरुवात होईल. तत्पूर्वी मान्यवरांचे स्वागत आणि सत्कार होईल. या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते 11 हजार 111 बुद्धमूर्ती वैयक्तिक स्वरूपात वितरित होतील. तर 200 च्या जवळपास बुद्धमूर्ती विहारांच्या कमिटीला वितरित करण्यात येतील. या भव्य अशा कार्यक्रमाला 25 ते 30 हजार बौद्ध आणि आई उपस्थित राहणार अशी माहिती गगन मलिक फाउंडेशनचे समन्वयक नितीन गजभिये यांनी दिली. हजारोंच्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन गगन मलिक व नितीन गजभिये यांनी केले आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पी. एस. खोब्रागडे, प्रा. प्रवीण कांबळे, भीमराव फुसे, प्रशांत डेंगरे, मोहन वाकडे, विनयबोधी डोंगरे, अनिरुद्ध दुपारे, विशाल कांबळे, गुणवंत सोनटक्के, वर्षाताई मेश्राम, स्मिता वाकडे, प्रकाश कुंभे, विनोद थूल, दिनेश शिंदे, विजय भारती, लताताई रामटेके आदी परिश्रम घेत आहेत.
—–०००—-

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More posts