नरखेड तालुक्यात मतदार नोंदणीची विशेष मोहीम
नरखेड (दि ९) – मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी १ या जानेवारी २०२३ या दिनाकांवर आधारित आहर्ता मतदार यादीचा पुननिरीक्षण कार्यक्रम जाहीर केलेला आहे. त्यानुसार ०४८ काटोल विधानसभा अंतर्गत येणाऱ्या नरखेड तालुक्यातील सर्व मतदान केंद्रावर तसेच नगरपरिषद हद्दीतील १९ मतदान केंद्रावर मतदार नोंदणीची विशेष मोहीम दि ११ सप्टेंबर रोज रविवारला सकाळी ११ पासून राबविण्यात येणार आहे.
या विशेष मोहिमेत मतदान नोंदणी, मतदार यादीतील नावाची वगळणी, स्थनांतारबाबत फार्म भरणे, आधार कार्ड सोबत मतदान कार्ड लिंक करणे इत्यादी मतदाराशी निगडित नोंदणीची कामे पूर्ण करण्यात येणार आहे. या मतदार नोंदणी विशेष मोहिमेचा मतदारांनी लाभ घ्यावा असे आव्हान सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार डी जी जाधव यांनी केले आहे.
Leave a Reply