आमदार प्रतापदादा अडसड यांनी अतिवृष्टी ग्रस्त भागाची प्रशासकीय अधिकाऱ्यांसह केली पाहणी.जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क करून तातडीने मदत करण्याचे निर्देश
WH-NEWS (धामणगाव रेल्वे ):-आमदार प्रतापदादा अडसड यांनी अतिवृष्टी ग्रस्त भागाची प्रशासकीय अधिकाऱ्यांसह केली पाहणी.जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क करून तातडीने मदत करण्याचे निर्देश यावेळी आमदार प्रतापदादा अडसड यांनी दिले.अतिवृष्टी मुळे नद्यांची पातळी वाढून शेती लगत असलेल्या नाल्यांमुळे व नदीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान वारंवार होत असताना प्रशासनाने याबाबतीत तातडीने पाऊल उचलून योग्य त्या कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे आमदार प्रतापदादा अडसड यांनी यावेळी प्रशासनाला निर्देश दिले.शिरजगाव, मांडवा, विरूळ रोंघे ढगफुटी सह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आमदार प्रतापदादा अडसड यांनी प्रत्यक्ष शेत शिवारात पोचून पाहणी केली या वेळी धामणगाव रेल्वे येथील तहसीलदार श्री.वाहूरवाघ व नायब तहसीलदार श्री.मंडपे सोबत उपस्थित होते.
Leave a Reply