वंचित बहुजन आघाडीची जिल्हास्तरिय बैठक उत्साहात
बीएसपीच्या कार्यकर्त्यांचा वंचितमध्ये प्रवेश
विस्तारीत जिल्हा कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांचा नियुक्तीपत्र देवून सन्मान
WH-NEWS (अमरावती):-वंचित बहुजन आघाडी अमरावती जिल्हा (पूर्व)ची जिल्हास्तरिय बैठक शासकिय विश्राम गृह,चपराशी पूरा,अमरावती येथे जिल्हाध्यक्ष अशोक मोहोड यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली.या बैठकीत बहुजन समाज पार्टी चे कार्यकर्त्यानी वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश घेतला.त्यांचे पक्षात जोरदार स्वागत करण्यात आले.
या जिल्हा बैठकीत पक्षाचे तालुका स्तरावर व जिल्हा परिषद सर्कल निहाय मेळाव्याचे आयोजन करणे.जिल्हा परिषद व पंचायत समिती,नगरपालिका निवडणुकी संदर्भात संभाव्य उमेदवारांची यादी तयार करणे.पक्ष बांधणी करण्यासाठी गाव तेथे शाखा तयार करणे व यादी सादर करणे या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.यावेळी पक्षाचा तालुकानिहाय आढावा घेण्यात आला.यावेळी चंदू उके,सिध्दार्थ मुंद्रे,नितीन सिरसाट,नंदकुमार गायकवाड,रविंद्र डोंगरे,दीपक बांबोडे,सिध्दार्थ भोजणे यांनी आपले मत व्यक्त केले.बहुजन समाज पार्टीचे भारत घुरडे,विश्वनाथ मेश्राम व संजय खंडारे यांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश केला.पुष्पगुच्छ देवून त्यांचे पक्षात जोरदार स्वागत करण्यात आले.यावेळी जिल्हा कार्यकारीणीचे नवनियुक्त पदाधिकारी नंदू खंडारे,संजय कापडे,सिद्धार्थ मुद्रे,वसंत मेंढे,ओंकार वाहणे,जयपाल बाते,रवींद्र वाहणे,नितीन सिरसाट,सुधीर बादगे,प्रमोद मुंद्रे,राजेश बागडे,देविदास खिराडे,उत्तम इंगोले यांसह अन्य पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देवून सन्मान केला.
जिल्हा उपाध्यक्ष बाबाराव गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.जिल्हाध्यक्ष अशोक मोहोड यांनी अध्यक्षीय भाषणातून येणाऱ्या नगरपालिका जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक लढण्याकरीता कार्यकर्त्यांनी सज्ज व्हा व कामाला लागा.पक्षाचे ऑनलाईन सदस्य नोंदणी करून सदस्य वाढवा असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन जिल्हा महासचिव प्रा.रवींद्र मेंढे यांनी केले.या बैठकीला जिल्हा उपाध्यक्ष शाम कुणबीथोप,जिल्हा कार्य.सदस्य अनंत खडसे,मोहम्मद कादरिया यांसह कैलास चव्हाण,अण्णा वरघट,चरणदास मेश्राम,रवींद्र कडू,राजेश बागडे,मुकूंद लोणारे,अनिल उके,सिद्धार्थ बेंडे,अनिल कुंभलवार,अमरावती तालुकाध्यक्ष राहुल भालेराव,नांदगाव खंडेश्वर तालुकाध्यक्ष अविनाश भगत,तालुका महासचिव संघदीप घोगरे,जयकिरण इंगोले,वरूड तालुकाध्यक्ष रवी डोंगरे,चांदूर रेल्वे तालुकाध्यक्ष मिनेश शिंदे यांच्यासह तिवसा,अमरावती,नांदगाव,धामणगाव व चांदूर रेल्वे,वरूड,मोर्शी येथील पदिधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
Leave a Reply