सध्या महाराष्ट्रात फक्त अमरावती जिल्यातील चांदुर रेल्वे मध्ये टांगा धावत आहे प्रवास्याच्या सेवेत आजही,ते पण अल्प दरात ….
WH-NEWS :-(अमरावती)आज सकाळी आम्ही सर्व ग्रुप मेंबर्स मॉर्निंग वॉक वरून परत येत होतो,आज रविवार असल्यामुळे आमच्या ग्रुप पैकी कुणीतरी चहा – नास्त्याचा यजमानपद घेतं,या प्रमाणे आमचे गावंडे मामा नास्ता व चहा आम्ही सर्व क्रीडा संकुलावरून बस स्टँड कडे चहा – नास्ता करीता निघालो ,गाड्या दोनच असल्यामुळे साहजिकच दोन गाड्यावर सहा लोक बसले पण मला मात्र जागा मिळाली नाही त्यामुळे पायीच जायला निघालो तेव्हा गावंडे मामांनी नी रस्त्यावरून चाललेल्या टांगा चालत होता लगेच हाक मारली आणि ” अरे बाबू ये सर को डेपो तक लेके जा …” अस म्हटल आणि त्यांनी टांगा थाबविल्यावर गावंडे मामा आणि त्या टांगा वाल्याच्या आग्रहापोटी मी टांग्यात अगदी फ्रंट सीट ला जाऊन बसलो .विरूळ चौकापासून तर डेपो पर्यंतच साधारणतः २-३ मिनिटाच्या या प्रवासात त्या टांग्यावल्याशी मी नेहमीप्रमणेच हितगुज सुरुवात केली .आणि तो तरुण गावंडे मामाबद्दल बोलायला , त्यांनी आमच्या गावंडे मामा ची केलेली स्तुती खरचं वाखण्याजोगी होती त्याच कारण म्हणजे आमचे गावंडे मामा म्हणजे जनावरांचे चालते फिरते डॉक्टरच.त्यामुळे त्या टांग्यावल्याच्या मनात त्यांच्या विषयीची सहृदयता कमालीची होती , ” सर गावंडे साहेब बहुत अच्छा आदमी है .. आधे रात को भी फोन करो तो लगे आ जाते ,पैसे राहो या न रहो हमारे घोडो का इलाज तुरंत करते” .ही त्याची वाक्ये ऐकून मी सुध्दा क्षणभर भावुक झालो . आमच्या गावंडे मामा विषयी असलेला माझ्या मनात असेल आदर नक्कीच वृद्धिंगत झाला ..आणि विचार केला की माणसाचे चांगले कर्म मात्र नक्कीच माणसाने कमावलेले अप्रतिम धन आहे ह्या गोष्टीची खरी जाणीव मला आज झाली.टांग्यावयासोबतच हा संवाद आणि डोक्यात असलेले विचार सुरू असतानाच बस स्टँड आले .तेव्हड्यात माझे मित्र श्री अविनाश आढाव सरांनी हा फोटो घेतला.ह्या प्रसंगाला अगदी मी अक्षरशः भारावून माझी लेखणी हातात घेऊन अनुभव अंकित करतोय….
समग्र महाराष्ट्रामध्ये टांग्यासाठी प्रसिद्ध असलेल्या शहरांच्या यादीत आमच्या चांदूर रेल्वे च नाव मात्र पहिल्या क्रमांकाचं …बाकी पण शहरामध्ये असेलही कदाचित टांगे असतीलही कदाचित पण अनेक शहरांमध्ये टांग्याचे नामोनिशाण जणू मिटलेच असे चित्र पहायाला मिळते.,मात्र आमच्या शहरातील टांगे आजही सुरू आहेत. हा आमच्या शहराचा ऐतिहासिक वारसा आहे. आमच्या शहरातील काहि नागरिक टांगा चालविण्याचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात. एवढ्या महागाईच्या काळात सुध्या अगदी वाजवी दरात रेल्वे स्टेशनपासून ते प्रवाशाला जेथे जायचे आहे त्या घरापर्यंत थेट ने – आण करण्याचे काम हे टांगे अविरतपणे करीत आलेले आहे.. गावात आलेली नवीन पाहुणे मंडळी आवडीने या टांगा सवारी चा आनंद लुटतात ,लहान मुले सुद्धा तांग्यात बसायला आतुर असतात..
आजच्या या माहिती तंत्रज्ञानाच्या काळामध्ये टांगा सारखी वाहतुकीच साधन सापडणे अतिशय दुर्मिळ झालेल आहे .तरी आजही हे साधन पाहायला सापडणे म्हणजेच अगदी आनंदाची आणि आमच्या चांदुरकरांसाठी अभिमानाची बात आहे ती याकरिता की माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात दळणवळणाची अत्याधुनिक साधने आहेत. प्रत्येकाजवळ आज टू व्हीलर, फोर व्हीलर गाड्या आहेत. त्यामुळे टांग्याच्या या व्यवसायावर जणू दरड कोसळावी अशी स्तीथी ह्या व्यवसायाची झालेली आहे पण तरीही अशाही बिकट परिस्थिती मध्ये आमच्या शहरातील हा टांगा व्यावसायिकाने आपला संयम कधी ढळू दिला नाही.हे मला याठिकाणी अगदी अभिमानाने सांगावेसे वाटते ,अगदी कोरोनाच्या काळात देखील यांचा हा व्यवसाय अगदी ठप्प झालेला असतानाही या व्यवसायातील अनेकांनी अनेक छोटे मोठे व्यवसाय करून ह्या बिकट काळावर मात केलेली मी स्वतः अनुभवली आणि पाहिली. पण आता हळू हळू सर्व स्तिथी पूर्वरत होताना दिसते पण रेल्वे विभागांच्या अनेक अडीअडचणी मुळे गाड्यांचे थांबे शासनाने कमी केलेत तर कधी काही अन्य कारणांनी गाड्या बऱ्याचदा रद्द होतात तेव्हा मात्र या लोकांचे खूप आर्थिक नुकसान होत असताना मी बघितले आहे. टांगा त्यांचे उदरनिर्वाहक साधन असल्यामुळे गाडी येईल आणि मला सवाऱ्या या मिळतील या एकमेव आशेवर ही बिचारी मंडळी मध्यरात्री पर्यंत तासनतास स्टेशन वर गाड्यांची वाट पाहत बसतात ..असो..
✍️- अतुल प्रभाकर उज्जैनकर….
Leave a Reply