जिल्ह्यातील तलाठ्यांची अडकली पदोन्नती बारा वर्षापासून चौकशी अधिकारीच नाही,चांदुर रेल्वे उपविभागातील १२० तलाठ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन
WH-NEWS :-(अमरावती )चांदुर रेल्वे :- मागील एक तपापासून सेवा करीत असताना महसूल प्रशासनाने चौकशी अधिकारी नेमला नसल्याने विभागीय स्तरावरील चौकशी केली नाही परिणामी जिल्ह्यातील अनेक तलाठ्यांच्या पदोन्नत्या रखडल्या असा आरोप उपविभागीय विदर्भ पटवारी संघ चांदुर रेल्वे शाखेने निवेदनातून केला
दरम्यान अनेक वेळा निवेदन देऊन त्यातील मागण्या विचारात न घेतल्याने उपविभागातील १२० तलाठ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे
महसूल कार्यालयीन चौकशी बाबतीत तलाठी संवर्गाचे खूप मोठ्या प्रमाणात या अधिकारी वर्गाने नुकसान केले आहे, १० ते १२ वर्षांपासून अद्यापही कार्यालयीन चौकशी होत नाही चौकशी अधिकारी नेमलेला नाही ही अतिशय ल अन्यायकारक बाब असल्याचे तलाठी संवर्गाचे म्हणणे आहे ,यामध्ये तलाठी पदोन्नतीमध्ये तसेच आर्थिक सेवा विषयक बाबी मध्ये मोठ्या प्रमाणात अधिकारी वर्गाकडून छळ केला गेला, तलाठी मंडळ अधिकारी यांना चांगल्या कंपनीने अद्यावत सॉफ्टवेअर असलेले लॅपटॉप व स्कॅनर अद्यापही पुरवली गेली नाही प्रलंबित विभागीय चौकशी प्रकरण निकाली काढण्यात आलेली नाही, नवीन लॅपटॉप मिळेपर्यत सध्या स्थितीतील लॅपटॉप प्रिंटर दुरुस्तीची पर्याय व्यवस्था करण्यात आली नाही, तलाठी यांचे सेवा पुस्तके अद्यावत केली गेली नाही, कालबद्ध पदोन्नती बाबत निर्णय घेतला गेला नाही शासकीय कर्तव्य बजावत असताना तलाठी मंडळ अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल होतात तलाठी संवर्गाच्या सेवा जेष्ठता यादीत मुदतीत प्रसिद्ध करून तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या पदोन्नती बाबत दरवर्षी निर्णय घेतला जात नाही उपविभाग स्तरावर होणाऱ्या बदल्या तसेच तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना पदोन्नती बाबत समुपदेशन धोरण आखल्या गेले नाही ,कोतवाल भरती जैसे थे अवस्थेत आहे वैद्यकीय बिले वेळेवर मिळत नाही अनुदान वाटपाच्या कामावर नकार असताना जबरदस्तीने ही कामे दिली जाते, नैसर्गिक आपत्ती आणि घरपडझड बाबत सर्वेक्षण ग्रामसेवकाकडून न करता तलाठ्यांना कामाची जबाबदारी वाढवली जाते तलाठी व मंडळाधिकारी संवर्गाचे २०५३ शीर्षाखाली कार्यालयीन कामाचा खर्च दिल्या जात नाही अश्या मागण्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे असे निवेदनाद्वारे सांगितले आहे.
प्रशासनाकडून वाढतोय दबाव
मुदतीत फेरफार,ई चावडी ,सेवा हमी कायदा , इत्यादी बाबी सांगत अधिकारी वर्गाकडून कार्यवाहीची तंबी दिली जाते आणि प्रत्यक्षात जेव्हा अधिकरी वर्गांकडून काम करण्याची वेळ येते तेव्हा तलाठी संवर्गाचीच पिळवणूक केली जात असल्याचा आरोप विदर्भ पटवारी संघ चांदुर रेल्वे उपविभागाने केला आहे.
मागील एक वर्षापासून जिल्हा प्रशासन उपविभागीय स्तरावर वारंवार निवेदन दिली मात्र अद्यापही मागण्या पूर्ण केल्या नाही त्यामुळे शनिवारपासून आम्ही सामूहिक रजा आंदोलन पुकारले आहे उपविभागातील १२० तलाठ्याने आंदोलनात सहभाग घेतला उपविभागीय विदर्भ पटवारी संघ चांदुर रेल्वे चे अध्यक्ष गोपाल नागरीकर सचिव प्रफुल्ल गेडाम व तालुक्यातील इतर तलाठी निवेदन देते वेळी उपस्थित होते.
Leave a Reply