शेतीच्या नुकसान भरपाईची रक्कम केली गरिबांच्या कल्याणासाठी परत – महाराष्ट प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांचा पुढाकार

शेतीच्या नुकसान भरपाईची रक्कम केली गरिबांच्या कल्याणासाठी परत
– महाराष्ट प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांचा पुढाकार
– खापरखेडा औष्णिक केंद्राला दिली भेट
– प्लांटमध्ये मृत झालेल्यांच्या कुटुंबीयांच्या परिवारासाठी केली मदतीची मागणी
नागपूर(खापरखेडा)-  अतिवृष्टीमुळे खापरखेडा परिसरातील शेतात खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राची फ्लायऍश वाहून आल्याने महाराष्ट प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष श्री. कुणाल राऊत यांच्या शेताचे नुकसान झाले. या नुकसानीच्या मोबदल्याची रक्कम औष्णिक विद्युत केंद्राकडून मिळाली. मोबदल्याची हि रक्कम कुणाल राऊत यांनी गरीब, शेतकरी, शेतमजूर व मजुरांच्या परिवाराच्या कल्याणासाठी औष्णिक केंद्राचे मुख्य अभियंत्यांकडे परत केली. तसेच दोन दिवसांपूर्वी खापरखेडा प्लांटमध्ये दोन युवा मजुरांचा मृत्यू झाला.

त्यांच्या परिवाराला त्वरित मोबदला मिळावा तसेच परिवारातील एका व्यक्तीला नोकरी द्यावी अशी मागणीही यावेळी कुणाल राऊत यांनी मुख्य अभयंता राजू घुगे यांच्याकडे केली.

गत जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खापरखेडा औष्णिक केंद्राचे फ्लायऍशचे तलाव फुटल्याने लगतच्या शेकडो हेक्टरमध्ये फ्लायऍश वाहून गेली. यात महाराष्ट प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांच्याही शेतीचे मोठे नुकसान झाले. खापरखेडा औष्णिक केंद्राकडून नुकसान भरपाईचा मोबदला कुणाल राऊत यांना मिळाला. मात्र मला मिळालेल्या मोबदल्याची ही रक्कम त्यांनी गरीब शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता राजू घुगे यांना परत केली. काम करणाऱ्या गरीब मजुराच्या परिवारासाठी तसेच एखाद्या गरजू शेतकऱ्याला, शेतमजुराला, अपंग मजुराला ज्यांना पैशाची नितांत गरज आहे अशा गरजू लोकांना ही रक्कम वितरित करण्यात असेही त्यांनी यावेळी घुगे यांना सांगितले.

याप्रसंगी खापरखेडा जि. प. सदस्य प्रकाश खापरे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव आसिफ शेख, सौरभ श्रीरामे, आशिष मंडपे, सतीश पाली, निषाद इंदूरकर, सावनेर विधानसभा अध्यक्ष राजेश खंगारे, नागपूर जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष अमोल केने, सौरभ रंगारी, विवेक प्रधान, शुभम देवतळे, सुनील चवरे, नागपूर जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेस महासचिव अलौकिक लाडसे, लोकेश गावंडे, सावनेर विधानसभा उपाध्यक्ष प्रशांत कुनभरे, सावनेर विधानसभा महासचिव, प्रमोद लांडगे, खापरखेडा शहर अध्यक्ष पवन पटमासे, चनकापूर उपाध्यक्षअमित भगत, लुकेश गावंडे, सुनील पांडे, आशिष पोनीकर, साहिल गिरे, मुकेश टेकाम, सुभम कंगाली, सुबम चोरचिया, निलेश माहुरे आदी उपस्थित होते.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More posts