शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांनि लोटांगण घालत शेकडो शेतकऱ्यांनसह तहसील कार्यालयावर धडक* नांदगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी*

शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांनि लोटांगण घालत शेकडो शेतकऱ्यांनसह तहसील कार्यालयावर धडक*
नांदगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी*

WH-NEWS :-अमरावती (नांदगाव खंडेश्वर )तालुक्यात अतोनात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले म्हणून सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी व तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी युवा सेनेचे माजी जिल्हाप्रमुख प्रकाश मारोटकर यांनी बस स्थानक ते तहसील १ कि मी पर्यन्त कार्यालयावर लोटांगण घेत शेकडो शेतकऱ्यांसह धडक दिली

अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस नांदगाव तालुक्यात झाला असून शेतकऱ्यांची पिके खरडून गेली तर अनेक गावांत पाणी घुसले तीन नागरिकांची जीवितहानी सुद्धा झाली सोयाबीन कापशी व तूर या पिकाचे अतोनात नुकसान झाले शेतामध्ये पाणी थांबून शेतात तळे निर्माण झाले होते असतांना नांदगाव तालुक्यात अतिवृष्टी होऊनही प्रशासनाने नोंद न घेता तालुका अतिवृष्टीच्या यादीतून वगळल्याने शेतकऱ्यांन मध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे शासनाने ओला दुष्काळ जाहीर केलेल्या यादीत नांदगाव तालुक्याचा समावेश नाही म्हणून युवा सेनेचे प्रकाश मारोटकर यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरिता बस स्थानक परिसर ते तहसील कार्यालय पर्यन्त शेतकऱ्यांन सह लोटांगण आंदोलन केले यावेळी शिंदे फडणवीस सरकारच्या विरोधात प्रचंड नारेबाजी करण्यात आली संपूर्ण तालुका ओला दुष्काळ जाहीर करा,नियमित पिक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने ५० हजार रुपये अनुदान जाहीर केले असून ते तात्काळ देण्यात यावे,अनेक गावात पाणी घुसून घरांची पडझड झाली असून सदर घरे घरकुल योजनते प्राधान्याने मंजूर करावे,महसूल व कृषी विभागाने अतिवृष्टीने झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे पीक विमा कंपनी ग्राह्य धारून पिक विमा मंजूर करावा या मागणीचे निवेदन तहसीलदार यांनि आंदोलन स्थळी येऊन निवेदन स्वीकारले,आंदोलना दरम्यान अंगावर शहारे आणणारा प्रसंग निर्माण झाला असून यावेळी प्रशासनाची तारांबळ उडाली होती,यावेळी माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील, जिल्हाप्रमुख मनोज कडू, श्याम देशमुख, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख बाळासाहेब भागवत, उपजिल्हाप्रमुख प्रमोद कठाळे,बाळासाहेब राणे, तालुका प्रमुख विष्णू तिरमारे,युवा सेनेचे स्वराज ठाकरे,शहर प्रमुख अरुण लहाबर,महिला आघाडीच्या रेखाताई नागोलकर, छायाताई भारती, रेवती परसनकर भावेश भांबुरकर, महादेव सोनोने,निलेश इखार, रवी ठाकूर, गुणवन्त चांदूरकर, प्रमोद कोहळे, श्रीकृष्ण सोळंके, मनदेव चव्हाण, अक्षय राणे, बालू झिमटे, लीलाधर चौधरी, प्रशांत काळे,आशिष हटवार,प्रतीक रिठे,सुनील गुरमुळे,वासुदेव लोखंडे, मनोज बनारसे, भूषण मोरे,पवन खेडकर, गोकुळ राठोड, अजय काळे,मनोहर लोमटे, दिलीप देवतळे,रमाकांत मुरादे पंकज ठाकरे,,अमोल सोनटक्के, पवन पुसदकर, बाळू रावेकर, विकास रावेकर, विजय पेटले, राहुल चांदणे,इत्यादी शिवसेनेचे कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते
*नेहमी नांदगाव तालुक्यावरच अन्याय का*:- *प्रकाश मारोटकर*
धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघ झाला तेव्हापासून गेल्या १५ वर्षात नांदगाव तालुका विकासा पासून वंचित असून विविध दृष्ट्या तालुक्यावर नेहमी अन्याय झाला आहे कुठलेही वरिष्ठ शासकीय कार्यालय चांदुर पळविल्या जाते,विकास निधी पळविल्या जातो असा अन्याय नांदगाव तालुक्यावरच का असा आरोप करीत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी लोटांगण आंदोलन केले असल्याचे मत प्रकाश मारोटकर यांनी व्यक्त केले,

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More posts