श्रीकृष्ण हायस्कूल मध्ये ‘श्रीकृष्ण जन्माष्टमी’
सुंदर नृत्य केले सादर;दहिहांडी फोडली
WH-NEWS अमरावती (मंगेश बोबडे) चांदूर रेल्वे:-
आमला विश्वेश्वर येथील श्रीकृष्ण हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात ‘श्रीकृष्ण जन्माष्टमी’ मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी विद्यार्थ्यां करीता ‘दहीहांडी‘चा कार्यक्रम घेण्यात आला.
सर्वप्रथम प्राचार्य प्रसेनजित तेलंग यांच्या हस्ते श्रीकृष्ण यांच्या मुर्तीचे पुजन करण्यात आले.त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला.त्यामध्ये रेनबो इंग्लिश स्कूल च्या चिमुकल्यांनी बाळ कृष्ण व राधा बनुन सुंदर नृत्य सादर केले.तर वर्ग पाचवी,सातवी व नववीच्या विद्यार्थी-विद्यार्थीनींने सुंदर नृत्य सादर केले. विद्यार्थ्यांनी मनोरा तयार करून दहिहांडी फोडली. प्राचार्य प्रसेनजित तेलंग व पर्यवेक्षिक दीपक बडोणे यांच्या मार्गदर्शनात रवींद्र पाचघरे,अशोक तायडे,कविता बोराळे यांच्यासह सर्व शिक्षकांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाला पालकांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply