लघुवेतन कॉलनी परिसरात दिसला मोर !थय थय नाचाया लागला..!

लघुवेतन कॉलनी परिसरात दिसला मोर !थय थय नाचाया लागला..!

नागपूर : इंदोरा येथील लघुवेतन कॉलनी परिसरात राष्ट्रीय पक्षी मोर दिसल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये कुतुहलाचे वातावरण आहे. गेल्या आठवड्याभरापासून मोर हा परिसरातच मुक्कामी आहे.नियमित तो थय थय नाचाया लागतो.

लघुवेतन कॉलनी घनदाट वसाहतिचा परिसर असून येथे मातोश्री रमाई आंबेडकर उद्यान आहे. सकाळी गार्डन फिरायला येणाऱ्या अनेकांना मोरा चे दर्शन झाले. स्थानिकांनी सांगितल्यानुसार मोर सकाळी ७ ते सायंकाळ ७ वाजेपर्यंत घरांच्या छतावर इकडून तिकडे उडताना दिसत असल्याचे सांगितले. लघुवेतन कॉलनी येथे राहणारे स्वप्नील भालेराव यांच्या छतावर दोन दिवसा अगोदर मोर दिसला असल्याचे त्यांनी सांगितले.

छायाचित्रात दिसत असलेला मोर स्वप्नील भालेराव यांच्या छतावर होता. नेमका हा राष्ट्रीय पक्षी दाट वसाहतीमध्ये कसा अधिवासात आहे. याचा शोध वनविभागाने घ्यावा, अशी मागणी वन्यप्रेमींनी केली आहे.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More posts