रेल मदत अॅप: प्रवाशांच्या प्रत्येक तक्रारीचे डिजिटल समाधान
नागपूर WH NEWS – प्रवाशांच्या तक्रारींचे त्वरित व पारदर्शक निराकरण करण्यासाठी भारतीय रेल्वेने ‘रेल मदत’ मोबाईल अॅप विकसित केले आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात या अॅपचे व्यापक प्रसार अभियान प्रमुख स्थानकांवर राबविण्यात येत आहे.
या अॅपद्वारे प्रवासी त्यांच्या प्रवासादरम्यान स्वच्छता, खानपान, पाणी, कोचची स्थिती, सुरक्षा, बर्थसंबंधी समस्या इत्यादी तक्रारी सोप्या, जलद व पारदर्शक पद्धतीने थेट रेल्वे प्रशासनापर्यंत पोहोचवू शकतात.
यासाठी नागपूर, अजनी, बल्लारशाह, चंद्रपूर, वर्धा, सेवाग्राम, अमला, बैतूल इत्यादी प्रमुख स्थानकांवर रेल मदत पोस्टर, स्टिकर, डिजिटल स्क्रीन स्लाइड शो व स्टेशनवरील घोषणा यांच्या माध्यमातून प्रवाशांना माहिती दिली जात आहे.
ही मोहिम प्रवाशांना डिजिटल सुविधांशी जोडण्यासाठी व त्यांचा प्रवास अनुभव अधिक प्रभावी, पारदर्शक आणि समाधानकारक करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे.
प्रवाशांनी त्यांच्या प्रवासादरम्यान कोणतीही गैरसोय झाल्यास ‘रेल मदत’ अॅप चा वापर करून त्वरित मदत घ्यावी, असे आवाहन करण्यात येते.
Leave a Reply