Blog

  • जीपिकोॅन 2025 मध्ये 500 हून अधिक डॉक्टरांनी एकत्र येऊन, जनरल मेडिसिन आणि गॅस्ट्रोएन्टेरॉलॉजीतील नवीन प्रगतीवर चर्चा केली

    जीपिकोॅन 2025 मध्ये 500 हून अधिक डॉक्टरांनी एकत्र येऊन, जनरल मेडिसिन आणि गॅस्ट्रोएन्टेरॉलॉजीतील नवीन प्रगतीवर चर्चा केली

    जीपिकोॅन 2025 मध्ये 500 हून अधिक डॉक्टरांनी एकत्र येऊन, जनरल मेडिसिन आणि गॅस्ट्रोएन्टेरॉलॉजीतील नवीन प्रगतीवर चर्चा केली

    नागपूर : “गॅस्ट्रोएन्टेरॉलॉजी आणि मेडिसिन क्षेत्रातील नवीन प्रगती आणि ताजी माहिती जाणून घेण्यासाठी 23 ऑगस्ट 2025 रोजी नागपूरच्या जामठा येथील व्हीसीए क्लबमध्ये जनरल प्रॅक्टिशनर्स कॉन्फरन्स – जीपिकोॅन 2025 यशस्वीरित्या पार पडली.
    या परिषदेचा उद्देश जनरल मेडिसिन आणि गॅस्ट्रोएन्टेरॉलॉजी क्षेत्रातील ताज्या प्रगतीबद्दल जागरूकता निर्माण करणे हा होता. अशा प्रकारच्या परिषदांमुळे फॅमिली फिजिशियनना आपले ज्ञान अद्ययावत करण्यास आणि त्यांच्या दैनंदिन वैद्यकीय सेवेत अधिक सुधारणा करण्यास मदत होते. यंदा या कार्यक्रमाला 500 हून अधिक डॉक्टर आणि फॅमिली फिजिशियननी उत्साहाने सहभाग नोंदवला.

    परिषदेचा शुभारंभ पारंपरिक दीपप्रज्वलनाने झाला. हा समारंभ महाराष्ट्र शासनाचे महसूल मंत्री व नागपूर आणि अमरावती जिल्ह्यांचे पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पार पडला. ते या कार्यक्रमाचे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांच्यासोबत डॉ. श्रीकांत मुकेवार (आयोजन अध्यक्ष – जीपिकोॅन 2025 व व्यवस्थापकीय संचालक, मिडास हॉस्पिटल), डॉ. सौरभ मुकेवार (आयोजन सचिव – जीपिकोॅन 2025 व संचालक, मिडास हॉस्पिटल, वर्धा रोड, नागपूर), तसेच डॉ. शुभंकर गोडबोले(आयोजन सचिव – जीपिकोॅन 2025) आणि डॉ. भूषण बावरे (आयोजन सचिव – जीपिकोॅन 2025) हेही प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
    महत्त्वाची सत्रे आणि तज्ज्ञ वक्ते

    वैज्ञानिक कार्यक्रमात मेडिसिन आणि गॅस्ट्रोएन्टेरॉलॉजीतील महत्त्वाच्या विषयांवर तज्ज्ञांची सत्रे घेण्यात आली, त्यामध्ये पुढील विषयांचा समावेश होता :
    • हायपरटेन्शन : पॅथोफिजिओलॉजी व उपचार पद्धती – डॉ. देबाशिष बाला
    • अॅनिमिया : तपासणी व उपचारातील महत्त्वाचे मुद्दे – डॉ. रमेश मुंडले
    • डायबिटीज, लठ्ठपणा व फॅटी लिव्हर डिसीज (पॅनेल चर्चा) – डॉ. श्रीकांत मुकेवार, डॉ. निखिल बालंखे, डॉ. अमृत कौर, डॉ. सनोबर शेख
    • अॅसिड पॅप्टिक डिसीज : निदान व उपचार (गोळ्यांपासून शस्त्रक्रियेपर्यंत) – डॉ. अमित कवीमंदन
    • कॉन्स्टिपेशन : फॅमिली फिजिशियनसाठी सोपी उपचार पद्धती – डॉ. श्रीकांत मुकेवार
    • जुलाबाची हाताळणी – डॉ. भूषण भवरे
    • पोटदुखी : जीपींसाठी डायग्नोस्टिक रोडमॅप– डॉ. सौरभ मुकेवार
    • एलएफटी समजून घेणे व पिवळ्या काविळीवर केस – आधारित चर्चा – डॉ. अमृत कौर गहरा
    • शरीरभर होणारी खाज – निदान व उपचार – डॉ. नेली चौधरी
    • ताप आणि ट्रॉपिकल आजारांचे व्यवस्थापन – डॉ. शरद देशमुख
    • किडनी रोगाचे लवकर निदान – डॉ. मोनाली साहू
    • ॲक्यूट पॅन्क्रियाटायटिसचे प्राथमिक पातळीवरील व्यवस्थापन – डॉ. सौरभ मुकेवार
    • सांधेदुखी : फिजिशियनला काय माहित असणे आवश्यक आहे – डॉ. कौस्तुभ बेलापुरकर
    • न समजणारी लक्षणे – त्याकडे कसे पाहावे – डॉ. ईशा अहलुवालिया
    • डोकेदुखी समजून घेणे : डोकेदुखीचे निदान आणि व्यवस्थापन करण्यासाठी एक सामान्य डॉक्टरांचे मार्गदर्शक– डॉ. प्रणित खंडाईत
    • प्रौढ लसीकरणावरील शिफारसी : जागतिक व भारतीय दृष्टिकोन आणि जीआय आजार असलेल्या रुग्णांवर प्रौढ संसर्गाचा परिणाम – डॉ. शुभंकर गोडबोले
    • “जस्ट आस्क मी एनीथिंग” (जामा) संवादात्मक सत्र – डॉ. श्रीकांत मुकेवार आणि टीम मिडास

    या प्रसंगी बोलताना मिडास हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीकांत मुकेवार म्हणाले, “जीपिकोॅन 2025 हे केवळ वैद्यकीय ज्ञान वाटण्यासाठीचे व्यासपीठ नसून तज्ज्ञ डॉक्टर आणि फॅमिली फिजिशियन यांच्यातील एक दुवा आहे. ज्यामुळे आरोग्यसेवेतील नवनवीन प्रगती थेट तळागाळातील रुग्णांपर्यंत पोहोचू शकते.”
    डॉ. सौरभ मुकेवार, संचालक, मिडास हॉस्पिटल, वर्धा रोड, नागपूर यांनी सांगितले :“सतत शिकत राहणे हे उत्तम आरोग्यसेवेचे गमक आहे. या परिषदेच्या माध्यमातून आम्ही डॉक्टरांना मेडिसिन आणि गॅस्ट्रोएन्टेरॉलॉजीतील ताज्या माहितीने सक्षम करण्याचा प्रयत्न करत आहोत.”

    प्रमुख पाहुणे श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी अभिमान व्यक्त करताना सांगितले “नागपूरमध्ये मिडास हॉस्पिटलसारखी अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध असणे ही अभिमानाची गोष्ट आहे. मिडास हॉस्पिटलने आंतरराष्ट्रीय दर्जाचे उपचार नागपूरमध्ये उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट ध्येय ठेवले आहे. या परिषदेचा उद्देश म्हणजे आरोग्यसेवेत नवीन तंत्रज्ञान वापरण्यास प्रोत्साहन देणे आणि रुग्णांना उत्तम सेवा व उपचार देण्यासाठी जागरूकता निर्माण करणे.”

    ते पुढे म्हणाले, “मिडास हॉस्पिटल फॅमिली फिजिशियनना नवीन वैद्यकीय माहिती देऊन त्यांना सक्षम बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे, जेणेकरून ते रुग्णांना दर्जेदार उपचार देऊ शकतील. महाराष्ट्राच्या आरोग्यसेवा यंत्रणेला 2029, 2035 आणि 2047 पर्यंत अधिक मजबूत करण्याचे सरकारचे दीर्घकालीन ध्येय आहे. यात रोबोटिक शस्त्रक्रिया आणि रोबोटिक आरोग्यसेवेतील प्रगती महत्त्वाची ठरेल. नागपूरमध्ये इतके प्रगत केंद्र उभारल्याबद्दल मी डॉ. श्रीकांत मुकेवार आणि डॉ. सौरभ मुकेवार यांचे अभिनंदन करतो. तसेच अशा प्रकारच्या परिषदांचे आयोजन विदर्भातील सर्व जिल्हा स्तरावर व्हावे, अशी माझी ठाम सूचना आहे.”
    परिषद डॉ.शुभंकर गोडबोले(आयोजन सचिव – जीपिकोॅन 2025) यांच्या आभार प्रदर्शनाने संपन्न झाली आणि प्रदेशातील वैद्यकीय क्षेत्र व रुग्णसेवा अधिक सक्षम करण्याच्या दिशेने आणखी एक यशस्वी टप्पा गाठला गेला.

  • नागपुरात 8 सप्टेंबरला शिवभोजन धरकांचे धरणे आंदोलन   सहा महिन्यांपासून थकीत बिल; महिला बचत गटांमध्ये नाराजी

    नागपुरात 8 सप्टेंबरला शिवभोजन धरकांचे धरणे आंदोलन  सहा महिन्यांपासून थकीत बिल; महिला बचत गटांमध्ये नाराजी

     


    नागपुरात 8 सप्टेंबरला शिवभोजन धरकांचे धरणे आंदोलन 

    सहा महिन्यांपासून थकीत बिल; महिला बचत गटांमध्ये नाराजी

    नागपूर :WH NEWS
    शिवभोजन थाळी योजना चालविणाऱ्या केंद्र चालकांना सहा महिन्यांपासून प्रलंबित असलेली देयके तात्काळ अदा करण्याच्या मागणीसाठी नागपूर शहर शिवभोजन थाळी केंद्र संचालक संघटनेच्या वतीने 8 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता संविधान चौकात भव्य धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

    शिवभोजन योजना 1 जानेवारी 2020 पासून राज्यभर सुरू असून, दररोज सुमारे दोन लाख गरीब, मजूर, महिला, ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांना अल्प दरात जेवण उपलब्ध करून दिले जाते. मात्र, केंद्र चालकांना सहा महिन्यांपासून बिल मिळालेले नाही. त्यामुळे महिला बचत गटांना कर्ज काढून केंद्र चालवावे लागत आहे.

    या संदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांना वारंवार निवेदन देऊनही तोडगा निघालेला नाही. मंत्रालयाकडे प्रस्ताव प्रलंबित असून अर्थमंत्र्यांकडून मंजुरी न मिळाल्याने बचत गटांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.

    शहर अध्यक्ष तानाजी वनवे, शहर सचिव डॉ. जानबा मस्के, कोषाध्यक्ष किशोर ठाकरे, ग्रामीण अध्यक्ष राजू पोलकुमवार आणि भास्कर पराते यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, जर आठ दिवसांत देयके अदा झाली नाहीत, तर हे आंदोलन महाराष्ट्रभर जिल्हा व तालुका स्तरावर उभारले जाईल व शासनाचा निषेध केला जाईल.


     

  • जरांगे पाटील जिंकले, सरकार झुकले, 8मधुन 6 मागण्या मान्य… उपोषण संपले आझाद मैदान केले खाली,आरक्षण लढाई जिंकले, मराठ्यांनी साजरा केले उत्साह

    जरांगे पाटील जिंकले, सरकार झुकले, 8मधुन 6 मागण्या मान्य… उपोषण संपले आझाद मैदान केले खाली,आरक्षण लढाई जिंकले, मराठ्यांनी साजरा केले उत्साह

    जरांगे पाटील जिंकले, सरकार झुकले, 8मधुन 6 मागण्या मान्य… उपोषण संपले आझाद मैदान केले खाली,आरक्षण लढाई जिंकले, मराठ्यांनी साजरा केले उत्साह

    मुंबई (विजय खवसे) – सरकारी नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आझाद मैदानावर सुरू असलेले पाच दिवसांचे आंदोलन मंगळवारी संपले. आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्या आठ मागण्यांपैकी राज्य सरकारने सहा मागण्या मान्य केल्या आहेत. हैदराबाद गॅझेटियरच्या आधारे मराठवाडा भागातील मराठा समाजातील लोकांना कुणबी किंवा मराठा-कुणबी किंवा कुणबी-मराठा प्रमाणपत्र देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मराठा आरक्षणासाठी स्थापन केलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे अध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगे यांची आझाद मैदानात भेट घेतली. त्यांच्यासोबत अनेक मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते.

    जरांगे म्हणाले की, सरकारने प्रथम सर्व आश्वासनांच्या अंमलबजावणीबाबत सरकारी आदेश (जीआर) जारी करावा. त्यानंतरच मी उपोषण सोडेन. यावर विखे-पाटील यांनी हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याच्या सरकारी आदेशाचा मसुदा दाखवला. त्यात लिहिले होते की फक्त मराठा समाजातील पात्र लोकांनाच प्रमाणपत्र दिले जाईल. यावर जरांगे-पाटील यांनी सरकारला पात्र हा शब्द काढून टाकण्यास सांगितले. सुमारे एक तासानंतर, एक नवीन सरकारी आदेश जारी करण्यात आला. विखे-पाटील यांनी त्याची प्रत जरांगे-पाटील यांना दिली. त्यानंतर जरांगे-पाटील यांनी त्यांचे उपोषण सोडण्यास सहमती दर्शविली. विखे-पाटील यांनी जरांगे-पाटील यांना लिंबू पाणी देऊन उपोषण सोडण्यास भाग पाडले. मराठा समाजातील लोकांनी आनंद साजरा केला. जरांगे हे इतर मागासवर्गीय (ओबीसी) कोट्यात मराठा समाजाला १०% आरक्षण देण्यासह विविध मागण्यांसाठी २९ ऑगस्टपासून अनिश्चित काळासाठी उपोषण करत होते.

    या मागण्या मान्य झाल्या: – मराठवाड्यातील हैदराबाद गॅझेटियर

    या आधारे मराठा समाजातील व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र दिले जाईल. – मराठा आरक्षण आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत आणि सरकारी नोकरी दिली जाईल. जुने प्रलंबित खटले लवकरच निकाली काढले जातील. – मराठा आंदोलकांवर नोंदवलेले खटले मागे घेण्याची प्रक्रिया सप्टेंबर २०२५ पर्यंत पूर्ण केली जाईल. आतापर्यंत सापडलेल्या ५८ लाख मराठ्यांच्या नोंदी सर्व ग्रामपंचायतींच्या सूचना फलकांवर लावल्या जातील. जिल्हा दंडाधिकारी यासंदर्भातील कार्यवाही पूर्ण करतील. – उमेदवाराच्या अर्जापासून ९० दिवसांच्या आत मराठ्यांना जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. – निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या समितीचा कार्यकाळ ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढविण्यात आला आहे.

    या मागण्यांवर मिळालेले आश्वासन:- सरकारने सातारा गॅझेटियर लागू केले.

    तेव्हा काय झाले?
    २७ ऑगस्ट – जालन्याच्या मध्यभागी असलेल्या सराटी गावातून जरांगे-पाटील निघाले.

    २८ ऑगस्ट – जरंगे-पाटील रात्री उशिरा अहिल्यानगरमार्गे पुण्यात पोहोचले.

    २९ ऑगस्ट- जरांगे-पाटील यांचे उपोषण सुरू.

    30 ऑगस्ट – शिंदे समितीने जरंगे-पाटील यांची भेट घेतली

    ३१ ऑगस्ट – जरांगे-पाटील म्हणाले- मी मुंबईहून विजय मिळवेन नाहीतर माझी शेवटची यात्रा काढली जाईल

    १ सप्टेंबर – हैदराबाद-सातारा गॅझेटियर लागू करण्याची मागणी.

    २ सप्टेंबर- हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा सरकारी आदेश मंजूर झाल्यानंतर जरांगे यांचे उपोषण संपले.

    मराठा आणि कुणबींच्या एकत्रीकरणाबाबत सरकारी आदेश जारी करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी मागितला.सरकारने मराठा समाजाला न्याय दिला आहे. पण इतर कोणत्याही समाजावर अन्याय होऊ दिला जाणार नाही.

    – एकनाथ शिंदे, उप-मुख्यमंत्री

    मराठा समाजाला त्यांच्या अपेक्षेनुसार न्याय देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. महायुती सरकार मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीसाठी वचनबद्ध आहे.

    अजित पवार, उपमुख्यमंत्री

    आमची टीम सरकारच्या आदेशाचा अभ्यास करत आहे. कायदेतज्ज्ञांशीही चर्चा सुरू आहे. त्याचा अभ्यास केल्यानंतरच मी यावर माझे मत देईन.

    छगन भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित) नेते

  • “सर्वसामान्यांच्या जगण्यातले हुंकार अतिशय संवेदनशील आहेत, याची जाणीव निर्माण करा” – डॉ. – डॉ आसाराम लोमटे

    “सर्वसामान्यांच्या जगण्यातले हुंकार अतिशय संवेदनशील आहेत, याची जाणीव निर्माण करा” – डॉ. – डॉ आसाराम लोमटे

    “सर्वसामान्यांच्या जगण्यातले हुंकार अतिशय संवेदनशील आहेत, याची जाणीव निर्माण करा” – डॉ.
    – डॉ आसाराम लोमटे
    नागपूर wh news – बर्डी येथील और हिंदी मोर भवन मधील मधुरम सभागृहामध्ये शनिवार, दि. 30 ऑगस्ट 2025 ला सायंकाळी सहा वाजता कामगार केसरी आर. एस. रुईकर संस्थेकडून “कामगार केसरी रुईकर स्मृती व्याख्यान” दरवर्षीप्रमाणे आयोजित केले होते. हे व्याख्यान प्रसिद्ध साहित्यिक व पत्रकार डॉ. आसाराम लोमटे यांनी दिले.

    याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की सर्वसामान्यांच्या जगण्यातले हुंकार अतिशय संवेदनशील आहेत. भारतातील सर्व प्रदेशातील कष्टकऱ्यांचे जग चित्रीत करण्याचे प्रयत्न असता गायब आजचागायत सुरूच आहेत, याची फारशी कल्पना आपणास नाही. त्यात कष्टकऱ्यांच्या खडतर, कठीण व दुरापास्त जगणे लेखणीबद्ध होत आहेत. ‘भाकरीचा तुकडा म्हणजे नसणे म्हणजे तुम्ही गुन्हेगार आहात’ ही भावना अण्णाभाऊ साठे यांनी जगासमोर मांडली. अशा स्थलांतरित मजुरांचे चित्र चितारण्याचे प्रयत्न सातत्याने देशातील समाजाभिमुख साहित्यिकांनी अनेकदा केले आहेत.

    यात राजस्थानी, गुजराती, महाराष्ट्र, पंजाब, ओडिया व दक्षिण अशा अशा सर्व प्रांतात व भाषांमध्ये शब्दबद्ध झाले आहेत. ‘विदेशीया’ सारख्या कलाकृतीत अशाच स्थलांतर करणाऱ्या कष्टकऱ्यांचे जगणे इथे सांगितले जात आहे. त्यांचे जगणे कठीण असले तरी ते शहरी समाजापेक्षा कितीतरी प्रगल्भ आहे, हे समजावे लागेल. ही माणसे जगताना आपली जीवनमूल्य सोडत नाहीत कितीही संकटे येत असली तरीही हे आपली तत्वे सुटू देत नाही. ते आपल्याला अनुसरणीय असायला पाहिजे, असे मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले. आपल्या अनेक लोककथा कष्टकऱ्यांनी रचल्यात. त्या कष्टकऱ्यांचा जो विवेक किंवा बुलंद आवाज आहे, तो वेळप्रसंगी इथल्या देव, धर्म व व्यवस्थेलासुद्धा नाकारत आला आहे, याची दखल आपल्याला घ्यावी लागेल, असेही ते याप्रसंगी म्हणाले.

    स्मृती व्याख्यानाचे अध्यक्षीय भाषण करताना कामगार केसरी आर एस रुईकर संस्थेचे संचालक डॉ. श्रीनिवास खांदेवाले आपले अध्यक्ष भाषण करताना म्हणाले की “आम्ही भाकर विकत नसतो ” ही कष्टकऱ्यांची मनोवृत्ती आपण आजपर्यंत समजू शकलो नाही, हे सत्य आहे. समाजात एक पोकळी निर्माण झाली आहे. ती कशी भरून काढायची ही खरी समस्या आहे. ही पोकळी ग्रामीण व शहरी, कष्टकरी व सुखासीन, जुनी व नवीन पिढी, या सगळ्यांमध्ये निर्माण झाली आहे. ‘समृद्धी मार्गाने समृद्धी आलीच,’ असे अहंभावाने आपण म्हणत असलो तरी समृद्धी कोणीकडून कुठे येत आहे ? याचे उत्तर आपण कसे देऊ शकतो? समृद्धी नेमकी कुणाची ? आपणच फक्त माणसे आहोत, शहरांबाहेरील राहणारी लोक माणसे नाहीत, असा आपण समज करून घेतला आहे.

    त्यामुळे ही दरी दोन समाजात निर्माण झाली आहे. यात मेळ घालण्याची जबाबदारीही आपलीच आहे, ती स्वीकारावी लागेल, असे मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
    या कार्यक्रमाचे संचालन डॉ. जी एस ख्वाजा यांनी केले
    संस्थेचा परिचय संस्थेचे सहसंचालक कॉम्रेड आर एन पाटणे यांनी केला व अतिथींचा परिचय संस्थेचे सचिव डॉ. गौतम कांबळे यांनी तर आभार प्रदर्शन संस्थेचे सदस्य एन एस. अडचुळे यांनी केले.
    या कार्यक्रमाला शहरातील गणमान्य व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

  • बेलतरोडीतील कुख्यात गुन्हेगारावर MPDA अंतर्गत कठोर कारवाई – बेलतरोडी पोलिसांचा धडाकेबाज निर्णय… कुख्यात रोहित तिवारी सेंट्रल जैल रवाना!

    बेलतरोडीतील कुख्यात गुन्हेगारावर MPDA अंतर्गत कठोर कारवाई – बेलतरोडी पोलिसांचा धडाकेबाज निर्णय… कुख्यात रोहित तिवारी सेंट्रल जैल रवाना!

    बेलतरोडीतील कुख्यात गुन्हेगारावर MPDA अंतर्गत कठोर कारवाई – बेलतरोडी पोलिसांचा धडाकेबाज निर्णय… कुख्यात रोहित तिवारी सेंट्रल जैल रवाना!
    नागपूर (WH NEWS क्राईम प्रतिनिधी) –
    नागपूर शहरातील गुन्हेगारी जगतात भीतीचे वातावरण निर्माण करणारा रोहित उर्फ पंडित संतोष तिवारी (वय 31, रा. राकेश लेआउट, सरफी आश्रमजवळ, बेलतरोडी) याच्यावर अखेर बेलतरोडी पोलिसांनी MPDA कायद्यांतर्गत कारवाई करून त्याला नागपूर मध्यवर्ती कारागृहात डांबले आहे.

    🔹 गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये होती दहशत
    तिवारी याच्यावर बेलतरोडी पोलीस ठाण्यात जबरी चोरी, दरोडा, दरोड्याचा प्रयत्न, अवैध हत्यारे बाळगणे, जुगार खेळणे, नागरिकांना शिवीगाळ करून मारहाण करणे यांसारख्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद आहे.
    गेल्या काही वर्षांत त्याने परिसरात निर्माण केलेली दहशत इतकी वाढली होती की, नागरिकांना सुरक्षितपणे फिरणेही अवघड झाले होते.

    🔹 प्रतिबंधक कारवायांनंतरही सुधारणा नाही
    पोलीसांनी वारंवार त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाया करून सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये कोणतीही सुधारणा न झाल्याने, त्याला रोखण्यासाठी कठोर पाऊल उचलण्याची गरज निर्माण झाली.

    🔹 MPDA प्रस्तावाला तात्काळ मंजुरी
    यामुळे बेलतरोडी पोलिसांनी एम.पी.डी.ए. कायदा कलम ३अंतर्गत प्रस्ताव तयार करून मा. पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांच्या कार्यालयात सादर केला. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन मा. पोलीस आयुक्तांनी प्रस्तावास तात्काळ मंजुरी दिली. त्यानंतर आरोपीस थेट नागपूर मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात आले.

    🔹 या अधिकाऱ्यांचे विशेष योगदान
    या कारवाईत माननीय पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस आयुक्त दक्षिण प्रभाग, पोलीस उप आयुक्त परिक्षेत्र क्र. ४, सहा. पोलीस आयुक्त अजनी विभाग यांचे मोलाचे योगदान राहिले.
    तर प्रत्यक्ष पातळीवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडेयांच्या नेतृत्वाखाली सपोनि राम कांढुरे, श्रीकांत गोरडे, प्रियंका रामटेके, पोलीस हवालदार प्रशांत गजभिये, अंकुश चौधरी, श्याम सपकाळ, सुहास शिंगणे, गजभिये, भजन दास घरत व हेमंत उईंके यांनी ही कारवाई यशस्वी केली.

    🔹 नागरिकांना मोठा दिलासा
    या धडाकेबाज कारवाईमुळे बेलतरोडी परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. गुन्हेगारांना रोखण्यासाठी नागपूर पोलिसांकडून वेळोवेळी होणाऱ्या अशा कडक कारवाया हीच खरी कायद्याची ताकदअसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

  • फसवणुकीच्या प्रकरणात महिला पत्रकार कुलकर्णी  अटक -हिवाळी अधिवेशनात बोगस प्रवेश पत्र मिळविल्याचा मामला. -महिला पत्रकार हिच्यावर पत्रकार परिषद वर ही बंदी

    फसवणुकीच्या प्रकरणात महिला पत्रकार कुलकर्णी  अटक -हिवाळी अधिवेशनात बोगस प्रवेश पत्र मिळविल्याचा मामला. -महिला पत्रकार हिच्यावर पत्रकार परिषद वर ही बंदी

    फसवणुकीच्या प्रकरणात महिला पत्रकार कुलकर्णी  अटक
    -हिवाळी अधिवेशनात बोगस प्रवेश पत्र मिळविल्याचा मामला.
    -महिला पत्रकार हिच्यावर पत्रकार परिषद वर ही बंदी

    WH NEWS क्राईम करस्पॉन्डंट, नागपूर –
    नागपूर हिवाळी अधिवेशन 2023 मध्ये मध्ये एका न्युज चॅनल च्या नावाने प्रवेश पत्र बनवून प्रवेश केल्याने
    सदर पोलिसांनी फसवणुकीच्या प्रकरणात महिला पत्रकार सविता साखरे उर्फ कुलकर्णी यांना अटक केली आहे. या प्रकरणातील दुसरा आरोपी पत्रकार नरेंद्र वैरागडे याला यापूर्वीच जामीन मंजूर झाला होता.या बातमी ने नागपूर शहरासह जिल्ह्यात मोठी चर्चा आहे.

    पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वर्ष २०२३ मध्ये पुण्यातील एका ज्येष्ठ पत्रकाराने सविता साखरे उर्फ कुलकर्णी आणि नरेंद्र वैरागडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. तक्रारीत असे नमूद करण्यात आले आहे की, आरोपींनी एका नामांकित संस्थेचे नाव वापरून बनावट ओळखपत्रे तयार केली होती. ही ओळखपत्रे वापरून त्यांनी हिवाळी अधिवेशनासह विविध नेत्यांच्या निवासस्थानी प्रवेश केला होता.
    सदर संस्थेच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी तत्काळ पुण्यातील पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर शून्य गुन्हा नोंदवून हा तपास सदर पोलीस नागपूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.

    या प्रकरणात नरेंद्र वैरागडे यांनी जामीन मिळवला आहे, तर सोमवारी सविता साखरे उर्फ कुलकर्णी यांना अटक करण्यात आली. सविता स्वतःला मोठी पत्रकार समजते, तिने आपले नाव हे कुलकर्णी ठेवले मात्र ती साखरे आहे. आता तिच्यावर नागपुरात टिळक पत्रकार भवन व प्रेस क्लब मध्ये होणाऱ्या पत्रकार परिषद मध्ये सुद्धा बंदी घातली आहे. हिवाळी अधिवेशन मध्ये दुसऱ्याच्या लेटर हेडचा उपयोग करून प्रवेश पत्र मिळविणे गंभीर गुन्हा असल्याने सदर पोलीस स्टेशन चे पीआई ठाकरे यांनी दाखल घेत कार्यवाही केली.पुढील तपास ठाणेदार मनीष ठाकरेयांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

  • वाडी पोलीसांची जुगार अड्ड्यावर मोठी कारवाई – प्रतिष्ठित दहा आरोपी पकडले, काहींवर पोलिसांची मेहरबानी,१.१४ लाखांचा मुद्देमाल जप्त

    वाडी पोलीसांची जुगार अड्ड्यावर मोठी कारवाई – प्रतिष्ठित दहा आरोपी पकडले, काहींवर पोलिसांची मेहरबानी,१.१४ लाखांचा मुद्देमाल जप्त

    वाडी पोलीसांची जुगार अड्ड्यावर मोठी कारवाई – प्रतिष्ठित दहा आरोपी पकडले, काहींवर पोलिसांची मेहरबानी,१.१४ लाखांचा मुद्देमाल जप्त
    नागपूर (WH NEWS क्राईम वाडी) – वाडी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने गुप्त माहितीच्या आधारे मारुती नगर, दत्तवाडी परिसरात दिनांक 23 ऑगस्ट 2025 शनिवारी मध्यरात्री मोठी कारवाई करत जुगार पकडला.प्रतिष्ठित १० आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, १,१४,४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पोळ्याचा पाडव्यावर जुवा खेळण्याची परंपरा आहे.

    काही नागरिक जुवा खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच धाड घातली.
    पोलिसांनी दिलेल्या माहिती अनुसार एका मोबाईल शॉपी जवळील  डेरी परिसरातील बंद रूममध्ये आरोपी ताशपत्त्यांवर पैशाच्या हार-जीतचा जुगार खेळत होते. पोलीस उपनिरीक्षक भागवत कालींगे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने दोन पंचांना सोबत घेऊन छापा टाकला असता आरोपी रंगेहात जुगार खेळताना पकडले. सूत्रांने दिलेल्या माहिती अनुसार 17 नागरिक जुवा खेळत होते मात्र काही नोकरी करीत असल्याने त्यांच्यावर वाडी पोलिसांनी मेहरबानी दाखविली.


    एक पोलीस अधिकारी ज्यांच्या घरी भाड्याने राहतो तो घर मालक ही जुवा खेळत सापडल्याने त्याच्यावर सुद्धा पोलिसांनी मेहरबानी दाखविली असल्याचे बोलल्या जात आहे.जुवा तसा लाखों रुपयांचा खेळल्या जात होता मात्र नगदी हजारो मध्ये दाखविण्यात आला.१,१४,४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे असे पोलिसांकडून सांगितल्या गेले. पोलिसांनी मात्र आरोपीचे नावे का लपविले असा प्रश्न निर्माण होत आहे.

    फिर्यादी पो.ना. सोमेश्वर मधुकर वर्धे (ब.नं.1036, पोलीस ठाणे वाडी यांनी दिलेल्या तक्रारीवरून  कलम 4, 5 महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
    जप्त मुद्देमालामध्ये ताशपत्ते, रोकड रक्कम तसेच इतर साहित्याचा समावेश आहे.काही लोकांचे मोबाईल सुद्धा जप्त केले. जुवा खेळणाऱ्या लोकांना दारू पोहचविनाऱ्याचा सुद्धा मोबाईल जप्त केल्याची माहिती आहे.
    पुढील तपास वाडी पोलीस करीत आहेत.मात्र सत्यताही लपविली जात असल्याची मोठी चर्चा आहे.या प्रकरणी डीसीपी रेड्डी यांनी लक्ष देऊन तपास केला तर सत्य उघड होईल.

  • प्रा. जोगेंद्र कवाडे यांचा अपमान नाही तो संपूर्ण समाजाचा आहे-

    प्रा. जोगेंद्र कवाडे यांचा अपमान नाही तो संपूर्ण समाजाचा आहे-

    प्रा. जोगेंद्र कवाडे यांचा अपमान नाही तो संपूर्ण समाजाचा आहे.- बापूसाहेब गजभरे

    नांदेड – संघर्षयोद्धा प्रा.जोगेन्द्र कवाडे सर यांचा हा अवमान नसून संबंध आंबेडकरी चळवळीत इमानदारीने कार्य करणाऱ्या नेत्यांचा,आणि कार्यकर्त्यांचा अपमान आहे.
    काल नागपुरात घडलेल्या प्रकरणाने समाजाची जगजाहीर बदनामी झाली.
    काहींना असुरी आनंद ही झाला असेल ते खरे समाजाच्या सामाजिक ,राजकीय ,धार्मिक चळवळीचे मारेकरी
    प्रा.जोगेन्द्र कवाडे सर यांनी आपल्या आयुष्याची 60 -65 वर्षे समाजासाठी सर्मपित केली आहेत.सरांचा त्याग एवढा मोठा आहे की,त्यांची बरोबरी कोणालाही करता येणार नाही.
    महाराष्ट्राच्या गाव गावात सरांच्या नावाचा धाक होता.
    म्हणूनच त्यांना संघर्ष नायक म्हटले जाते,

    जयभीम पत्रिकेतून सरकारवर आसूड उगारणारे कवाडे सर महाराष्टाला माहित आहेत,नामांतरासाठी लॉंग मार्च काढणारे सर,खैरलांजी प्रकरणात आमदारकीचा राजीनामा देणारे सर,खेड्यापाड्यात अन्याय झाल्यावर तर रात्री बेरात्री धावून येणारे सर !
    दिल्ली आग्र्याच्या जेल पासून त राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात जेल भोगणारे सर आज ही किती तरी पोलीस केसेस सरांवर आहेत.लहान मोठे हजारो आंदोलनात सरांनी नेतृत्व केलं !

    भीमा कोरेगाव पासून ते महाड पर्यंत आणि देश पातळीवर महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे ज्या ज्या ठिकाणी गेले
    तेथे तेथे सर पोहचले आणि लोकांना जागृत केले त्या स्थळांना आज लाखों लोक जातात.
    सरांच्या बाबतीत खूप लिहिता येईल आज फक्त थोडासा मागोवा घेतला आहे.
    सरांच्या त्यागाला अनन्यसाधारण महत्व आहे.
    त्यांच्या नावाशिवाय हि चळवळ पुर्ण होऊ शकत नाही.
    त्यांना विरोध करणाऱ्यांचं समजत कांहीही स्थान नाही असे भाडोत्री विकाऊ आणि टाकाऊ लोक विरोधात समाज माध्यमावर व्यक्त होतांना दिसत आहेत.

    नागपूरच्या प्रकरणात सरांच्या समर्थनात जास्त लोक होते.
    भाडोत्री लोक बोटावर मोजण्या इतकेच होते.
    सरांची कालची भूमिका स्वागताहार्य त्यांनी समाजात भांडणे नको हि भूमिका घेतली
    समाजातल्या बुद्धिजीवी लोकांनी एकत्र येऊन प्रा.जोगेन्द्र कवाडे सर यांची कोणती भूमिका चुकली ती सांगावी
    आम्ही सरांना आपल्याशी संवाद साधण्यासाठी बोलावू
    माझी विनंती एवढीच आहे की समाजमाध्यमांवर बदनामीकारक लिखन करू नये परत एकदा हात जोडून विनंती.

    जर या उपर कुणी पोस्ट केलीच तर कायदेशीर मार्गाने कारवाई करण्यात येईल.कृपया आम्हांला तो निर्णय घेण्यास भाग पाडू नका !

    बापूराव उर्फ बापूसाहेब गजभारे
    महाराष्ट्र प्रदेश महासचिव,नांदेड
    9673580786,9422187404

  • पत्रकार प्रशांत कांबळे – चांदूर रेल्वे ते मंत्रालय प्रतिनिधी पर्यंतचा प्रवास.! वाढदिवस विशेष

    पत्रकार प्रशांत कांबळे – चांदूर रेल्वे ते मंत्रालय प्रतिनिधी पर्यंतचा प्रवास.! वाढदिवस विशेष

    पत्रकार प्रशांत कांबळे – चांदूर रेल्वे ते मंत्रालय प्रतिनिधी पर्यंतचा प्रवास.! वाढदिवस विशेष

    अमरावती जिल्ह्यातील लहानशा चांदूर रेल्वे शहरातून आपल्या पत्रकारितेच्या कारकिर्दीची सुरुवात करणारा प्रशांत कांबळे आज मुंबईसारख्या गजबजलेल्या आणि स्पर्धात्मक राजधानीच्या शहरात पत्रकारितेत स्वतःचा वेगळा ठसा उमटवत आहे. त्याचा हा प्रवास केवळ वैयक्तिक मेहनत, चिकाटी आणि जिद्दीचा नाही, तर सामाजिक बांधिलकी आणि सत्यनिष्ठेचेही उदाहरण आहे.

    सुरुवातीची पावले – चांदूर रेल्वेतून सुरुवात

    प्रशांत कांबळे ची पत्रकारितेतील कारकीर्द एका स्थानिक वृत्तपत्रात तालुका प्रतिनिधी म्हणून सुरू झाली. गावातील सामान्य माणसांचे प्रश्न, स्थानिक समस्या आणि ग्रामीण भागातील घडामोडी यांचे अचूक, जबाबदार आणि संवेदनशील वृत्तांकन त्यांनी केले. त्यामुळे अल्पावधीतच ते लोकांच्या मनात विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जाऊ लागले.

    मुंबईकडे वाटचाल

    नंतर पत्रकारितेच्या वाटेवर पुढील टप्पा गाठण्यासाठी प्रशांत कांबळे मुंबईत दाखल झाला. जय महाराष्ट्र सारख्या न्यूज चैनल मध्ये असताना मुंबईच्या गटारात काम करणाऱ्या कामगारांची व्यथा न्यूज चॅनलमध्ये मांडली.. महानगरातील जलद गतीचे आयुष्य, स्पर्धा आणि सतत बदलणाऱ्या घडामोडी यांच्या मध्यभागी राहूनही त्यांनी सत्य, तथ्य आणि जबाबदारीचा धागा सोडला नाही.

    दिव्य मराठीत मंत्रालय प्रतिनिधी

    सध्या प्रशांत कांबळे मुंबईतील अग्रगण्य दैनिक दिव्य मराठी मध्ये मंत्रालय प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. शासनाच्या निर्णयांपासून ते जनतेच्या समस्यांपर्यंत, त्यांनी नेहमीच वाचकांपर्यंत अचूक आणि प्रभावी माहिती पोहोचवण्याचे काम केले आहे. मंत्रालयातील राजकारण, धोरणे आणि त्याचा जनजीवनावर होणारा परिणाम याचे सूक्ष्म विश्लेषण करून त्यांनी आपले वेगळेपण सिद्ध केले आहे.

    सामाजिक बांधिलकी आणि संवेदनशीलता

    प्रशांत कांबळे हा केवळ बातम्या देणारा पत्रकार नाही, तर एक संवेदनशील मन, सामाजिक जाण असलेले व्यक्तिमत्त्व आहे. सामान्य नागरिकांच्या समस्या, सामाजिक अन्याय, ग्रामीण भागातील आवाज आणि वंचित घटकांचे मुद्दे निर्भीडपणे मांडतो. पत्रकारितेला व्यवसायापेक्षा लोकसेवेचे माध्यम म्हणून पाहणारा हा दृष्टीकोन त्याचा इतरांपेक्षा वेगळा ठरवतो.

    राहुल गडपाले यांनी दिली मुंबईत संधी….

    मुंबईतून काही काळ अमरावतीत आल्यानंतर प्रशांत कांबळे याला खरंतर परत मुंबईत पत्रकारितेत जायचे होते मात्र मुंबईत चांगल्या वृत्तपत्रात काम मिळणे सोपे नाही. मात्र या कामी दैनिक सकाळचे संपादक राहुल गडपाले यांनी प्रशांतला दैनिक सकाळमध्ये मुंबईत काम करण्याची संधी दिली, आणि ही राहुल गडपाले यांनी दिलेली संधी प्रशांतच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. या संधीचे सोने करत सकाळ मधून मंत्रालय प्रतिनिधी म्हणून दिव्य मराठीत प्रशांत कांबळे यांनी झेप घेतली.
    प्रशांत कांबळे च्या या यशात राहुल गडपाले यांच्यासोबतच विनोद भाऊ राऊत यांचा देखील महत्वाचा वाटा आहे…. विदर्भातल्या छोट्या गावातून मुंबईत गेलेल्या प्रशांतला मुंबईत सहकार्य साथ व मार्गदर्शन करणारे पत्रकारांचे देखील तेवढेच सहकार्य आहे.

    वाढदिवसानिमित्त शुभेच्छा

    आज प्रशांत कांबळे याचा वाढदिवस. प्रशांतला वाढदिवसानिमित्त खूप खूप मनःपूर्वक शुभेच्छा. सत्य, न्याय आणि सामाजिक बांधिलकीच्या मार्गावर प्रशांत असाच ठामपणे प्रवास करत राहावा, हीच अपेक्षा.WH NEWS NAGPUR

  • निजी ट्रैवल्स पर रोक

    निजी ट्रैवल्स पर रोक

    सुबह 8 बजे से रात 10 बजे तक शहर के अंदर पार्किंग और यात्रियों को पिक-अप/ड्रॉप करने की अनुमति नहीं
    नागपुर.
    नागपुर शहर में बढ़ते यातायात जाम की समस्या से निपटने के लिए यातायात पुलिस विभाग ने एक महत्वपूर्ण कदम उठाया है। शहर के अंदरूनी रिंग रोड क्षेत्र में निजी ट्रैवल्स बसों के परिचालन को नियंत्रित करने के लिए एक नई अधिसूचना जारी की गई है। अधिसूचना के अनुसार, अब निजी बसों को सुबह 8 बजे से रात 10 बजे तक इनर रिंग रोड पर सड़क पर पार्किंग और यात्रियों को पिक-अप/ड्रॉप करने की अनुमति नहीं होगी। इन बसों को केवल निर्दिष्ट पार्किंग क्षेत्रों में ही रुकना होगा। निजी बस संचालकों को नए नियमों का पालन करने और अपने यात्रियों को सूचित करने के लिए 7 दिन का समय दिया गया है। नियम का उल्लंघन करने पर मोटर वाहन अधिनियम की धारा 223 के तहत सख्त कार्रवाई की जाएगी। यह अधिसूचना 13 अगस्त से 12 सितंबर 2025 तक लागू रहेगी।

    यात्रियों को होगी दिक्कतें
    नागपुर से यवतमाल, चंद्रपुर, छिंदवाड़ा, जबलपुर, भंडारा, गोंदिया और ब्रह्मपुरी जैसे मार्गों पर चलने वाली सैकड़ों निजी बसें अब शहर के बाहर यात्रियों को उतारेंगी। ऐसे में, इन यात्रियों को शहर के अंदर अपने गंतव्य तक पहुंचने के लिए मेट्रो, टैक्सी, या ऑटो जैसे वैकल्पिक साधनों पर निर्भर रहना पड़ेगा। हालांकि परिवहन कार्यालय से अनुमति लेकर चलने वाली बसें जैसे मिहान और एमआईडीसी क्षेत्र के कर्मचारियों को ले जाने वाली बसें, विवाह समारोह की बसें, और स्कूल बसें इस नियम के दायरे से बाहर होंगी।

    जाम से मिलेगी राहत
    पुलिस उपायुक्त लोहित मतानी का कहना है कि यह कदम ट्रैफिक व्यवस्था को सुचारू बनाने के लिए जरूरी है। उनका मानना है कि शहर के बाहर वैकल्पिक पार्किंग और स्टॉप की व्यवस्था से यातायात में सुधार होगा। यह निर्णय शहर के महत्वपूर्ण चौराहों और सड़कों पर होने वाले भारी ट्रैफिक जाम को कम करने के उद्देश्य से लिया गया है। शहर की 35 लाख की आबादी और 25 लाख से अधिक वाहनों के चलते, कई प्रमुख सड़कें जैसे सीए रोड, रहाटे कॉलोनी चौक, ग्रेट नाग रोड, और अमरावती रोड पर बसों की अवैध पार्किंग और पिक-अप के कारण यातायात अक्सर बाधित रहता है।