5 C
London
Sunday, February 15, 2026

तिवसा-अमरावतीत पत्रकार बांधवांचा सन्मानाचा क्षण!-राष्ट्रीय अध्यक्ष संघपालजी गडलिंग व सचिव विजय खवसे यांचे जंगी स्वागत

तिवसा-अमरावतीत पत्रकार बांधवांचा सन्मानाचा क्षण!-राष्ट्रीय अध्यक्ष संघपालजी गडलिंग व सचिव विजय खवसे यांचे जंगी स्वागत

तिवसा, – अमरावती येथे राष्ट्रीय युवा मराठी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संघपालजी गडलिंग आणि राष्ट्रीय सचिव विजय खवसे यांच्या आगमनाने संपूर्ण परिसरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली. सत्यासाठी लढणाऱ्या, समाजाचा आवाज बनणाऱ्या पत्रकारांच्या या संघटनेचे नेतृत्व तिवसा येथे पोहोचताच स्थानिक पत्रकार बांधवांनी त्यांचे मनापासून, आत्मीयतेने आणि अभिमानाने स्वागत केले.

हे स्वागत केवळ औपचारिक नव्हते, तर पत्रकारांच्या एकतेचा, सन्मानाचा आणि संघर्षाचा जिवंत संदेश होते. संघपालजी गडलिंग आणि विजय खवसे यांनी पत्रकारितेच्या मूल्यांची जपणूक, पत्रकारांचे हक्क, सुरक्षितता आणि न्यायासाठी संघ अधिक ताकदीने उभा राहणार असल्याचा विश्वास दिला. या भेटीत संघटनेच्या पुढील वाटचाली बाबत चर्चा झाली, तसेच “पत्रकार हा समाजाचा आरसा असून त्याच्या संरक्षणासाठी संघ सदैव तत्पर राहील” अशी भावना उपस्थितांमध्ये अधिक दृढ झाली.पत्रकार प्रशांत कांबळे,

- Advertisement -spot_imgspot_img
Latest news
- Advertisement -spot_img