महावितरणच्या प्रादेशिक कार्यालयातस्वातंत्र्यादिन उत्साहात साजरा.. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार

0
138

महावितरणच्या प्रादेशिक कार्यालयातस्वातंत्र्यादिन उत्साहात साजरा..
उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार
नागपूर दि. १६ ऑगस्ट २०२२; महावितरणच्या काटोलरोडस्थित प्रादेशिक व मुख्य अभियंता कार्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला.या वेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.महावितरणचे संचालक(प्रकल्प) प्रसाद रेशमे,महानिर्मितीचे संचालक(कोळसा) राजेश पाटील यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.मुख्यालयातील मुख्य अभियंता मनीष वाठ,नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) शरद दाहेदार, अधीक्षक अभियंते हरीश गजबे, अविनाश सहारे,अजय खोब्रागडे,अमित परांजपे, सहाय्यक महाव्यवस्थापक प्रदीप सातपुते, सहमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मधुसूदन मराठे,कार्यकारी अभियंता समीर शेंदरे,राजेश घाटोळे,राजेंद्र गिरी,वरिष्ठ व्यवस्थापक (वित्त व लेखा) अशोक पोइनकर,प्रणाली व्यवस्थापक प्रसन्ना येळणे, प्रवीण काटोले, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी सचिन लहाने आदी मान्यवर व अधिकारी तसेच कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

या वेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अतिरिक्त कार्यकारी अभियंता आलोक करंडे, सहाय्यक अभियंता नितेश खंडारे,कनिष्ठ अभियंता पवनकुमार चरपे, सहाय्यक सुरक्षा व अंमलबजवणी अधिकारी संकल्पना तडसकर, वरिष्ठ तंत्रज्ञ प्रशांत बारई,निखिल कांबळे, तंत्रज्ञ सुकेक्षणी मून यांचा सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here