युवक काँग्रेस तर्फे अंकिताला श्रद्धांजली देत कॅन्डल मार्च
– अंकिताच्या मारेकऱ्याला फाशी देण्याची मागणी
नागपूर/प्रतिनिधी WH NEWS
उत्तराखंड येथील एका भाजप नेत्याच्या मुलाने त्याच्या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या 19 वर्षे रिसेप्शनिस्ट अंकिता भंडारी हिला वेश्याव्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न केला. तिने याचा विरोध केला असता तिची निर्गुण हत्या करण्यात आली. मृत अंकिताला न्याय मिळावा या मागणीसाठी तसेच तिला श्रद्धांजली देण्यासाठी उत्तर नागपूर युवक काँग्रेस ने शुक्रवारी सायंकाळी इंदोरा चौक ते कमाल चौक दरम्यान कॅण्डल मार्च काढून अंकिताला श्रद्धाजंलि अर्पित केली.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या मार्गदर्शनात उत्तर नागपूर युवक काँग्रेस अध्यक्ष निलेश खोब्रागडे यांच्या नेतृत्वात आयोजित कॅण्डल मार्चची सुरुवात इंदौरा येथून झाली. प्रथम अंकिताच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून व श्रद्धांजली देऊन मार्चला सुरुवात झाली. अंकिताच्या मारेकर्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करीत केंद्र सरकार विरोधात आणि भाजप विरोधात निषेध नोंदविण्यात आला. अंकिताचा मारेकरी हा उत्तराखंडच्या भाजप नेत्याचा मुलगा असल्याने त्याला केंद्र सरकारचे म्हणजेच मोदी सरकारचे अभय मिळत आहे. हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवून तात्काळ आरोपीला शिक्षा द्यावी अशी भावना यावेळी निलेश खोब्रागडे यांनी व्यक्त केली.

यावेळी शहर युवक कांग्रेस अध्यक्ष तौसीफ खान, उत्तर नागपुर युवक कांग्रेस अध्यक्ष नीलेश खोब्रागड़े,दीपक खोब्रागड़े गौतम अंबादे, पंकज सावरकर, कुणाल निमगडे,सचिन दोहाने,इंद्रपाल वाघमारे, सचिन वासनिक, दीपा गावंडे, ज्योति खोब्रागड़े ,प्रणाली गावंडे, जितेंद्र वेडेकर, संतोष खड़से, आकाश इंदुरकर, गोपाल राजवाड़े, मुन्ना पटेल, प्रकाश नांदगांवे, शिलज पांडे, अनिरुद्ध पांडे, सुशांत गणवीर, उमेश डाखोरे, दानिश अली, सोनू खोबरागडे, विजय डोंगरे, सप्तऋषि लांजेवार, पलाश लिंगायत, विलियन साखरे, विजय सोमकुवार, रौनक नांदगावे, निखिल शेलारे व दीपक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply