कास्ट्राइब महासंघाचे 42 वे अधिवेशन 4 ऑक्टोम्बर ला…नितिन गडकरी उद्धघाटन

कास्ट्राइब महासंघाचे 42 वे अधिवेशन 4 ऑक्टोम्बर ला…नितिन गडकरी उद्धघाटन

नागपूर – कास्ट्राइब महासंघाचे 42 वे वार्षिक अधिवेशन मंगळवार , दिनांक 4 आक्टोबर , 22 रोजी जवाहर विद्यार्थी गृह ,वेस्ट हाईकोर्ट रोड़ सिविल लाइन नागपुर येथे आयोजित केल्याची माहिती कास्ट्राइब महासंघाचे संस्थापक अध्यक्ष कृष्णा इंगळे यांनी शुक्रवारी प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषद मध्ये दिली.

या अधिवेशनास महाराष्ट्राच्या कान्याकोप – यातुन संघटनेचे पदाधिकारी / कार्यकर्ते येणार आहेत . सदरचे ४२ वे वार्षिक अधिवेशन साजरी करणारी महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण भारतातील मागासवर्गीयाची एकमेव संघटना आहे . महासंघाची स्थापना मुळातच मागासवर्गीयांवर भरती , पदोन्नती मध्ये होणारा अन्याय आणि बदल्या मध्ये केला जाणारा दुजाभाव दूर व्हावा याकरिता झालेली आहे . सन २०१४ पासुन महाराष्ट्रात भरती बंद करण्यात आली असल्यामुळे आजमितीस महाराष्ट्रात ३,५०,००० / – ( तिन लक्ष पन्नास हजार ) सरळ सेवा भरती मधील तसेच पदोन्नती मधील जवळपास एक लाखाचा अनुशेष शिल्लक आहे . मात्र दुर्देवाने शासनाने मागासवर्गीयांची भरती व पदोन्नती बंद केलेली असल्यामूळे मागासवर्गीय कर्मचा – यांमध्ये शासनाप्रती असंतोष आहे .

सदरच्या वार्षिक अधिवेशनास महाराष्ट्रातून जवळपास ६ ते ७ हजार संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत .. या अधिवेशनाचे उद्घाटन मा . नितीनजी गडकरी , केंद्रिय रस्ते वाहतुक व माहामार्ग मंत्री , नवी दिल्ली यांच्या हस्ते होणार असून मा.डॉ. शैलेश टेभुर्णीकर , प्रधान मुख्य वनसंरक्षक , म.रा. वनभवन , सिव्हिल लाईन , नागपूर तसेच मा . रणजित मेश्राम , सुप्रसिध्द साहित्यीक व जेष्ठ पत्रकार , याशिवाय प्रा.डॉ.वाल्मीक सरोदे , विभाग प्रमुख , डॉ . बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठ , औरंगाबाद तसेच अॅड . प्रभाकरराव मारपकवार अधिवक्ता उच्च न्यायालय , नागपूर प्रमुख अतिथी राहणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री कृष्णा इंगळे अध्यक्ष कास्टाईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य हे भूषविणार आहेत .

तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे महासचिव श्री . नामदेवराव कांबळे , सुत्र संचालन डॉ . सोहन चवरे तर आभार प्रदर्शन श्री . आकाश तांबे , सरचिटणिस , कास्ट्राईब शिक्षक कर्मचारी संघटना , म.रा. हे करणार आहेत . मा संघटनेचा अध्यक्ष म्हणून मला अतिशय आनंद होत आहे की , प्रत्यक्षात संघटनेच्या स्थापनेपासुन आजमितीस संघटनेच्या कार्याला गेल्या ४२ वर्षापासुन शासकिय सेवेत कार्यरत असलेल्या मागावर्गीय कर्मचा – यांचे जवळपास एक लाखाचे वर प्रश्न सोडविले आहते . यामध्ये माजी आमदार श्री . अविनाश पांडे आणि तेव्हाचे मा . जिल्हाधिकारी श्री .. आरमुगम नागपूर हाणामारीचे प्रकरण संघटनेने २ लाखाचे वर कर्मचा – यांचा मोर्चा काढुन तत्कालीन पंतप्रधान मा . राजीव गांधी यांना वायरलेश व्दारे संदेश पाठवुन प्रकरणाचे गार्भीय लक्ष्यात आणुन दिले .

त्यामुळे वरिष्ठ पातळीवरून हालचाली वेगाने सुरू झाल्या व पर्यायाने लग्नाच्या दिवशी श्री . पांडे यांना अटक करण्यात आली .. नागपूर विद्यापिठ कि पेशवाई विद्यापिठ असा बोर्ड नागपूर विद्यापिठास लावायचा होता कारण ६ उच्चवर्णीयांना मागासवर्गीय दाखवून निवड केली होती . त्या विरुध्द तत्कालीन मुख्यमंत्री ना . वसंतदादा पाटील यांनी मा . राज्यपाल यांच्याकडे तकार प्रकरण सोपवुन या प्रकरणाची न्यायमुर्ती एच . डी . पटेल यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून न्याय मिळवून दिलेला आहे . ता . मलकापुर जिल्हा अमरावती येथील एका शिक्षिकेने डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचा पाठय पुस्तकातील धडा घरात ठेवला की घर बाटते त्यामुळे पाठय पुस्तकातील धडा विदयार्थ्याकडुन उकडयावर फाडण्यात आला . सदरची घटना संघटनेच्या निदर्शनास आल्यावर संघटनेने सदरचे धडा प्रकरण देशभर गाजविले . याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभागाने एकाऐकी २० कर्मचा – यांना सेवेतून काढले होते .

त्यामुळे संघटनेनी तत्कालीन मा . श्रीमती शालीनीताई पाटील हया सार्वजनिक बांधकाम मंत्री असतांना त्यांच्याकडे निवेदने सादर करुन ज्यांना सार्वजनीक बांधकाम विभागाने सेवेतुन एकाऐकी काढले होते अशा कर्मचा – यांना सेवेत पूर्ववत कामावर घेण्यात बाध्य केले . अशाप्रकारे कास्ट्राईब कर्मचारी महासंघ , महाराष्ट्र राज्य , यांच्या बाबतीत नेहमीच शासनाकडून / विभागप्रमुख अथवा इतर अधिका – यांकडून होणा – या अन्याय अत्याचारा विरुध्द लढा देवून कर्मचा – यांना न्याय मिळवून दिलेला असुन भविष्यातही न्याय मिळवुन देण्यासाठी झटत राहील .

महत्वाची बाब म्हणजे तर संघटनेच्या अस्तित्वापासून तर आतापर्यंत जवळपास • दोन ते तीन लाख उमेदवारांना शासनाच्या विविध विभागात स्थानिक स्वराज्य संस्था व महामंडळे अशा ठीकाणी सुशिक्षित बेरोजगारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार सेवेत प्रवेश मिळवून दिल्यामुळे एकप्रकारे संघटनेने बेरोजगारांचे प्रमाण कमी करण्यास मदत केली आहे असे म्हटल्यास ते अतिशोयक्ती ठरणार नाही . मा . मुख्य सचिव , महाराष्ट्र राज्य , मंत्रालय , मुबई , यांचे आदेशाप्रमाणे दर ३ महिण्यात मा . जिल्हाधिकारी , मा . मुख्य कार्यपालन अधिकारी , जिल्हा परिषद , तसेच विभागिय आयुक्त , विद्यापिठे , आणि कृषी पिद्यापिठे यांचेसोबत दर ६ महिण्याला बैठकी घेण्याचे आदेश आहेत . अशा बैठकी घेण्यात येणारी देशातील एकमेव संघटना आहे . वरील पत्रकार परिषदेला खालील प्रमाणे संघटनेचे पदाधिकारी व प्रतीनिधी उपस्थित राहतील . सर्वश्री : – डॉ . सोहन चवरे , नरेद्र धनविजय , डॉ . सुभाष गायकवाड , राजकुमार रंगारी , दिलीप चौरे , राकेश कांबळे , प्रभाकर सोनडवले , विभुतीचंद्र गजभिये , चदंन चावरिया , अजय वानखेडे , जालिंदर गजभारे , अविनाश इंगळे , विनोद गजभिये , निरंजन वासे , डॉ . बाळासाहेब बन्सोड , निरंजन पाटील , देविदास हेलोंडे , अरविंद ग्याबरीयल , अशोक राऊत , मनोज निकोसे उत्तम सालवणकर , चंद्रदर्शन सुर्यवंशी उपस्थित होते.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More posts