रामटेके सारखे शिक्षक तयार झाल्यास जी. प. शाळेला शुगीचे दिवस येण्यास वेळ लागणार नाही —कविता साखरवाडे
कुही प्रतिनिधि – वेलतुर जिल्हा परिषद क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्या सौ कविताताई साखरवाडे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जिवनापुर येथे सदिच्छा भेट दिली.नुकताच 5 सप्टेंबर ला शिक्षक दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद नागपूर वतीने कुही पंच्यायात समिती अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जीवनापुर येथील शिक्षक हितेशकुमार मधुकर रामटेके यांची जिल्हा आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार करिता निवड झाली. जिल्हा परिषद नागपूर येथील खेडकर सभागृहात आ.श्री. सुनील केदार माजी मंत्री महाराष्ट्र राज्य यांचे हस्ते आदर्श शिक्षक पुरस्काराने हितेशकुमार रामटेके यांना गौरविण्यात आले होते.
सौ.कविताताई साखरवाडे यांनी प्रत्येक्षात शाळेला भेट देऊन हितेशकुमार रामटेके यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार केला याप्रसंगी शाळेचा नयनरम्य परिसर शालेय बाग शाळेची गुणवत्ता उत्कृष्ट असल्याचे मनोगतात मत व्यक्त केले. ईतर शाळांनी जिवनापूर शाळेचं आदर्श घ्यावे असा पुनरुच्चार केला. या प्रसंगी जिवनापूर येथील सरपंच श्री फारुक अली सय्यद, श्री सुधाकर नरुले अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, सुधाकर चंदणखेडे पोलीस पाटील , संजय बोरघरे तंटामु्ती अध्यक्ष , दिलीप आजबले उपसरपंच , रियासद अली सय्यद , बाळाजी मांढरे ,सुरेखताई गुरपुडे, चंद्रकुमार शिवूरकर, मनोज बोरकर ,अरविंद कुंभरे स.शी, भगवान पाटील स.शी,खुशबू मेंड वाडे , स्नेहल भागवतकर , स्वप्नील भागवतकर मंगला नवघरे ,वैशाली चांडणखेदे ,माला भैसारे,प्रमिला दुधपाचारे व इतर सर्व ग्रामपंचायत सदस्या उपस्थित होते.
Leave a Reply