- एसटी महामंडळाच्या चालक वाहकाची दबंगिरी ज्येष्ठ नागरिकांना जंगलात दिले सोडून
नागपुर -एसटी महामंडळ जनतेच्या सेवेसाठी आहे.मात्र वाहक चालकांची दबंगिरी एवढी वाढली की चक्क एका सीनियर सिटीजन ला अर्ध्या रस्त्यावर जंगलात उतरवून देण्याचा धक्कादायक प्रकार घडला.
अंनतचतुर्थी दिवशी गणपती बाप्पांच्या कार्यक्रमाला बहीनीच्या घरी नागपूर ला येते वेळेस 9 सप्टेंबर रोजी शुक्रवारला शशिकांत अकर्ते नावाचे प्रवासी 10 वाजून 30 मिनिटांनी सकाळी पांडूर्णा चौक वरुड येथून नागपूरला जाण्यासाठी एसटी बस क्रमांक MH 40- N 9538 क्रमांकाच्या गाडीमध्ये बसून प्रवासाला सुरुवात केली असता ती बस मोर्शी नागपूर डेपोची होती. कंडक्टर तिकीट काढत इतर प्रवाशांना देत देत तो जेष्ठ नागरिक शंशीकात अकर्ते या प्रवाशा जवळ पोहोचला असता कन्डक्टरला आधार कार्ड दाखविले, जन्मतारीख असलेले व एसटीचे वरुड येथून 18 जून 22 ला काढलेले जेष्ठ नागरिकांसाठी असलेले सवलतीसाठीचा फॉर्मही व आगारातून काढलेल्या पास साठीच्या अर्जाची पोचपावती सुद्धा दाखविली असता, त्या कंडक्टर ने मला तुमचे वय 65 वर्षाची नाही आहे.
तुम्हाला पूर्ण तिकीटचे पैसे द्यावे लागतील. असे म्हटले. त्यावर प्रवासी यांनी म्हटले की, ही पोचपावती काय खोटी आहे काय ? पोचपावती मला त्या डेपो मधील मॅडमने खोटी पावती दिली का ? त्या पावतीची त्याला झेरॉक्स दाखविली परंतु झेरॉक्स चालत नाही म्हटले. जाऊ द्या. झेरॉक्स चालत नाही. तर माझे जन्मतारीख असलेले आधार कार्ड आहे. त्यावर माझी जन्मतारीख 6 /6 /1957 आहे. तरी तो मला मनाला की, नाही तुमचे वय योजनेसाठी कमी आहे. तर प्रवांशानी म्हटलं की, असे कसे कमी आहे. माझ कंन्डक्टर ऐकतच नव्हता वास्तविक पाहता त्याने बारकाईने जन्म तारखेचे निरीक्षण केले असते तर त्याच्या ते लक्षात आले असते.
हा माणूस एसटी प्रवासासाठी अर्ध्या टिकीटसाठी पात्र आहे. पण त्यांनी मला पूर्ण टिकीट काढावे लागतील असे म्हटले. अन्यथा गाडीमधून उतरून जा म्हणून मला सुरळी-कुरळी स्टॉप च्या चांदस वाटोळा अर्ध्यामध्येच गाडीची बेल वाजवून मला जंगलातच भर रस्त्यात उतरवून दिले. व त्याला मी म्हटले की तुम्ही जेष्ठ नागरिकांचा अपमान करीत आहात, मी तुमची कंप्लेंट वरिष्ठांकडे करतोय. *जा जे होईल ते करून घे* ? असं त्या कंडक्टरने जेष्ठ नागरिकांना म्हटले व तो प्रवाशी त्या ठिकाणावरून 4 किलोमीटर अंतरावर पायदळ चालत चांदस वाटोळा स्टॉपवर एक तासात पोहचला. त्यानंतर तोच प्रवाशी चांदस वाठोडा वरून 11 वाजून 13 मिनिटांनी काटोलला मोर्शी ते काटोल गाडी क्रमांक MH 40 -9151 जाणाऱ्या गाडीमध्ये बसला. त्या कंडक्टरला कागदपत्र दाखविले असता त्यांनी 25 रुपये, अर्धी तिकीट देऊनच पोहोचविले. त्या बस कंडक्टरने सुद्धा मला काहीच त्रास दिलेला नाही. तसेच मी काटोल वरून परतवाडा ते नागपूर गाडीनेही प्रवास 2 वाजून 36 मिनिटांनी. नागपूरसाठी बसला असता, गाडी क्रमांक MH 40-5391 नंबरच्या गाडीत बसलेत.
त्याही कंडक्टरने सुद्धा कागदपत्रे तपासून मला 45 रुपयाचे तिकीट दिले असता मला त्यांच्याकडून कुठलाही त्रास झालेला नाही. त्यानंतर तोच प्रवासी नागपूरला पोहचला नंतर लगेच गाडीतून उतरून नागपूर एसटी महामंडळाच्या कार्यालयात जाऊन खाली उतरवून दिलेल्या कंडक्टरच्या नावाची चौकशी केली असता, ती गाडी मोर्शी डेपोची असून त्यावरील कंडक्टरचे नाव शिरभाते असल्याचे मला सांगण्यात आले.
मी घडलेल्या बाबत एसटीचे तक्रार पुस्तकेत सविस्तर तक्रार नोंदविली आहे. त्यांना माझा मोबाईल नंबर दिलेला आहे. तरी त्या कंन्डकटरची चौकशी करून कारवाई करण्यास सांगितले. माझ्यासारख्या सुशिक्षित नागरिकाला त्याने मानसिक व शारीरिक व वेळेचा अपव्य करून त्रास दिलेला आहे. अशा व्यक्तींकडून निरीक्षणांना किती त्रास होईल याचा विचार करावा. व त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्या प्रवाशांनी नागपूरच्या डेपोत सविस्तर पणे केली आहे.त्या चालक वाहकावर कार्रवाई करण्याची मागणी होत आहे.
Leave a Reply