खोलाट नदीला पुर,माजी आमदाराचे गाव पाण्यात….गावचा संपर्क तुटला…अधिकारी अजुन पोहचले नाही गावात…आजी माजी आमदार ही घरिच..!
चांदूर रेल्वे ता.प्रतिनिधि -तालुक्यात गेली दोन दिवसांपासून संतत धार पाऊस सुरु असल्याने जनजीवन विसकळीत झाले आहे.चांदूर रेल्वे तालुक्यातील जवळा धोतरा गावात पुराचे पानी शिरल्या ने नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले.जवळ पास 27 ते 28 कुटुंब रविवार पासून पाण्यात असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते प्रकाश रंगारी यांनी WH न्यूज़ ला दिली.गावात पानी असल्याने नागरिक सड़के वर आले आहे.

खोलाट नदी चा उगम पोहरा जंगलातून असून सावंगा विठोबा धरण ओहर फ्लो झाल्याने नदिला पुराचे प्रमाण वाढले.दोन दिवसा पासून अख्ख गाव घरिच आहे.पाण्यामुळे गावचा संपर्क तूटल्याने आता अधिकारी कसे येतील हा ही प्रश्न निर्माण झाला.प्राप्त माहिती नुसार पुरामुळे काही जीवित हानी नाही.घरात पाणी शिरल्याने मामूली नुकसान झाले.त्यात शेतीच्या पिकांचे नुकसान मोठ्या प्रमानात होण्याची शक्यता आहे.गावातील श्मशान भूमि पूर्ण पण्याखाली आली आहे.

माजी आमदार घरी गाव वाऱ्यावर..!
जवळा धोत्रा गाव माजी आमदार वीरेंद्र जगताप यांचे गाव.मात्र ते चांदूर रेल्वे शहरात वस्तव्यास आहे.गेली दोन दिवसा पासून सतत पाऊस सुरु असल्याने गावात क़ाय स्थिति आहे हे पाहण्यासाठी अजुन पर्यंत जगताप गावात गेले नसल्याची माहिती गावकर्यांनी दिली.जगताप यांची शेती सुद्धा याच गावात आहे.
पटवारी ग्रामसेवक गावात जाणार असल्याची माहित आहे. परन्तु बातमी लिहे पर्यंत कुठलाच शासकीय अधिकारी गावात आले नाही.तहसीलदार,उवविभागिय अधिकारी,ठानेदार यांनी सुद्धा अजुन पर्यंत भेट दिली नसल्याची माहिती ही गावकर्यांनी दिली.

आमदार प्रतापदादा अड्सड ही घरिच
मतदार संघात पाऊस असल्याने आमदार प्रतापदादा अड्सड ही घरा बाहेर पडले नाही.मतदार संघातील नदी काठावरिल गावालतील नागरिकांचे क़ाय हाल आहे हे बघण्या करिता सुद्धा आजी-माजी आमदारा कड़े वेळ नाही.आता जनते कड़े को लक्ष देणार असा प्रश्न गावकर्यांनी केला.
जवळा धोत्रा गावचा अधिकाऱ्यांनी दौरा करून पाहणी करण्याची मागणी होत आहे.

Leave a Reply