शालेय क्रीडा स्पर्धाचे आयोजन, खेळाडू शारिरीक शिक्षकांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घ्यावा..

शालेय क्रीडा स्पर्धाचे आयोजन, खेळाडू शारिरीक शिक्षकांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घ्यावा..
अमरावती शहर राष्ट्रवादी काँग्रेसची विभागीय आयुक्त दिलीप पांढरपट्टे यांच्याशी चर्चा..!
अमरावती जिल्हा शारीरिक शिक्षक व क्रीडा विषय समितीचे निवेदन

अमरावती –महाराष्ट्रातील शालेय क्रीडा स्पर्धाचे आयोजन ,नियोजन तसेच सहभागा संबंधित शालेय विद्यार्थी ,खेळाडु व शारीरिक शिक्षकांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अमरावती शहर तसेच अमरावती जिल्हा शारीरिक शिक्षक व क्रीडा विषय समिती व महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शारीरिक शिक्षण शिक्षक महामंडळ यांच्या संयुक्तिक शिष्टमंडळाने विभागीय आयुक्त दिलीप पांढरपट्टे यांना निवेदन सादर केले .

निवेदनात सांगण्यात आले की, गेल्या दोन वर्षापासुन कोवीड-१९ च्या प्रादुर्भावाने महाराष्ट्र राज्य शासनाने संपुर्ण महाराष्ट्रात प्रत्यक्ष मैदानावरील खेळ व क्रीडा प्रकारांचे सराव व स्पर्धां करीता बंदी आणलेली होती.परंतु या सञात सर्व शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी खेळाडुंचे सराव गेली सहा महिन्या पासुन मोठ्या प्रमाणात नियमित सुरू आहे. प्रत्येक सञात माहे जुनं पर्यंत “भारतीय शालेय खेळ महासंघ,दिल्ली.यांचे पुढील सञातील शालेय राष्ट्रीय स्पर्धा आयोजनाचे वार्षीक वेळापञक जाहिर होते. परंतु या सञात आजतागायत शालेय क्रीडा स्पर्धांचा कार्यक्रम प्राप्त झालेला नाही.

त्यामुळे खेळाडूंचे नुकसान होत आहे. खेळाडुंना प्रोत्साहन देण्याकरीता वर्ग १० वी व १२वी च्या प्रविष्ट विद्यार्थी खेळाडुंना शालेय क्रीडा स्पर्धा सहभाग व प्राविण्या करीता अतिरीक्त क्रीडा गुण दिले जातात.करीता शालेय क्रीडा स्पर्धा आयोजन होणे गरजेचे आहे. सोबतच वयोगट १९च्या खेळाडुंना राज्य व राष्ट्रीय स्पर्धा प्राविण्या करीता महाराष्ट्र राज्य सेवा अंतर्गत ५%खेळाडु आरक्षणा पासुन वंचीत रहावे लागणार आहे. ज्यामुळे भविष्यात शालेय विद्यार्थी खेळाडुंना सेवाभरती करीता असलेला ५%खेळाडु आरक्षणाच्या लाभा पासुन वंचीत रहावे लागणार आहे. शासनाच्या परवानगीने तातडीने शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन तालुका ते राज्यस्तरावर करण्यात यावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली .

त्याच बरोबर महाराष्ट्रातील सर्व तालुका/जिल्हा/विभागिय क्रीडा संकुला मध्ये शालेय विद्यार्थी वर्गांच्या “खेळ व क्रीडा” सरावा करीता सकाळ व सायंकाळी सुनिश्चित वेळ आरक्षीत करण्यात यावी, महाराष्ट्रातील सर्व क्रीडा संकुलात उपलब्ध खेळ व क्रीडा मैदानांवरती “क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे.यांच्या कडुन कायम/कंञाटी क्रीडा प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी, महाराष्ट्रातील सर्व क्रीडा संकुलामध्ये(एक वर्षीय/सहा आठवडे एन.एस.एन.आय.एस) प्रशिक्षण पुर्ण केलेले/वरीष्ठ राष्ट्रीय स्पर्धा/आंतर विद्यापीठ स्पर्धा मध्ये सहभागी/प्राविण्य प्राप्त पुरूष व महिला खेळाडुंना क्रीडा संकुला मध्ये विद्यार्थी खेळाडुंना प्रशिक्षणा करीता मान्यता देण्यात यावी.

विविध खेळ प्रकारात सरावाच्या नावावर मनमानी सराव फी आकारून विद्यार्थी खेळाडूंची फसवणूक थांबवण्यासाठी महाराष्ट्र राज्य स्तरावरती “शासकीय क्रीडा संकुल शुल्क निर्धारण समिती” द्वारा एकसमान शुल्क महाराष्ट्रात आकारावे, महाराष्ट्र राज्य शालेय क्रीडा स्पर्धेत प्राविण्य प्राप्त शालेय विद्यार्थी खेळाडुंना शिष्यवृत्तीच्या स्वरूपात त्या सञात निःशुल्क सरावास मान्यता देण्यात यावी , महाराष्ट्रातील सर्व शासकीय तालुका/जिल्हा/विभागीय क्रीडा संकुल समिती” समिती मध्ये शालेय विद्यार्थी खेळाडु प्रतिनिधी म्हणुन दोन शा.शि.शि‌क्षकांना प्रतिनिधीत्व देण्यात यावे, महाराष्ट्र राज्य शालेय क्रीडा स्पर्धा मध्ये सहभागी विद्यार्थी खेळाडुंना सहभागी सञात “विमा कवच”चा लाभ देण्यात यावा, भारतीय शालेय खेळ महासंघ,दिल्ली द्वारा मान्यता देण्यात आलेल्या तसेच महाराष्ट्र राज्य शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे.यांनी आयोजनास मान्यता देण्यात आलेल्या सर्व अनुदानीत व विना अनुदानीत खेळ व क्रीडा स्पर्धांना वर्ग १० वी व १२ वी च्या विद्यार्थी वर्गांना अतिरीक्त क्रीडा गुणां करीता पाञ ठरवुन मान्यता देण्यात यावी.

महाराष्ट्र राज्य शालेय क्रीडा स्पर्धा आयोजना करीता पंचांना देय मानधन/ शालेय विद्यार्थी खेळाडुंच्या तालुका/जिल्हा/विभागीय व राज्य स्पर्धा आयोजन/चहा-नाश्ता/भोजन व निवास व्यवस्था खर्चा करीता सध्याच्या प्रचलित अनुदान रक्कमेच्या होणाऱ्या अनुदानीत शालेय स्तरावरील कार्यरत शा.शि.शि‌क्षकांना(कमीत कमी १२ वर्षे सेवा अनुभव) यांना क्रीडा व युवक सेवा कार्यालयां मध्ये प्रभारी”क्रीडा अधिकारी” या पदावरती “प्रतिनियुक्ती” कमीत कमी तिन ते पाच वर्षे देण्यात यावी. अशा विविध मागण्यांसंदर्भात देखील शिष्टमंडळाने विभागीय आयुक्तांशी चर्चा केली.
निवेदन सादर करतांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष-प्रशांत डवरे, माजी महापौर-ऍड. किशोर शेळके, विदर्भ कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष-जितेंद्रसिंह ठाकुर, अमरावती जिल्हा शारीरिक शिक्षक व क्रीडा विषय समितीचे डॉ. नितीन चवाळे , शिवदत्त ढवळे, संतोष अरोरा, प्रा. डॉ. सुभाष गावंडे, प्रा. डॉ. गजेंद्र रघुवंशी, प्रा. डॉ. अतुल पाटील, सुशील सुर्वे, संदीप इंगोले, प्रदिप ठाकरे, संदेश गिरी, महेश अलोने, विजय मानकर, अजय केवडे, प्रमोद महल्ले, आनंद मिश्रा, दिलबर शाह, अबरार साबीर, हबीब खान, निलेश शर्मा, योगेश सवई, अमोल वानखडे, अभिजित इंगोले,संकेत बोके, अभिजित लोयटे, भुषण बनसोड, गजानन आजनकर, ऍड. सुनिल बोळे, प्रा.डॉ. अजय बोन्डे आदीसह सर्व सदस्य, पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

क्रीडा स्पर्धेसाठी खेळाडूंचे आज राजकमल चौकात प्रतीकात्मक आंदोलन
सहा महिन्यांपासून खेळाचा नियमित सराव सुरु आहे. मात्र क्रीडा स्पर्धांचे आयोजन होत नसल्याने खेळाडूंचे नुकसान होत असून क्रीडा गुण तसेच सेवा भरती मधील ५ टक्के आरक्षण आदीं पासून खेळाडू वंचित आहेत , त्यामुळे शालेय क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात यावे, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी १० सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी ३.३० वाजता विविध खेळांचे खेळाडू हे क्रीडा गणवेश घालून राजकमल चौकात सराव करून प्रतीकात्मक आंदोलन करणार आहे. या आंदोलनात सर्व खेळाडू , शारीरिक शिक्षक , क्रीडा प्रतिनिधी व क्रीडा प्रेमींनी सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस चे शहराध्यक्ष प्रशांत डवरे यांनी केले आहे.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More posts