3 आक्टोंबर ला नागपूरात आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषद..गगन मलिक फाउंडेशन ने केले आयोजन
नागपुर –गगन मलिक फाउंडेशन आयोजित 3 ऑक्टोबर 2022 रोजी नागपुरात आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेचे आयोजन भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पावनपर्वावर करण्यात येणार आहे.
या परिषदेत देश विदेशातून जवळपास 2000 प्रतिनिधी उपस्थित राहतील . ” बौद्ध धम्म : समता , स्वातंत्र्य , बंधुता व न्याय या मूल्यांच्या प्रस्थापनेसाठी त्यांची प्रासंगिकता ” ही सदर परिषदेची विषय संकल्पना आहे . सदर परिषदेचे उद्घाटन दिनांक 3 आक्टोंबर 2022 रोजी सकाळी 11.30 वाजता सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आले आहे . सदर परिषदेचे उद्घाटन जागतिक कीर्तीचे बौद्धपंडित व थायलंडच्या जगप्रसिद्ध चेरनत्वन आंतरराष्ट्रीय मेडिटेशन सेंटरचे प्रमुख भदन्त फ्रा मेधीमज्जीरोदम हे करणार आहेत .
परिषदेचे बीजभाषण डॉ . पोंगसाक टंगकाना अध्यक्ष , जी.एम.एन.एस फाउंडेशन , थायलंड हे करतील . सदर परिषदेला मार्गदर्शन करण्यासाठी मा . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मा . उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे . या परिषदेत जागतिक कीर्तीचे बौद्ध विचारवंत भदन्त फ्रा . पोर्नचाईपीन्यापोंगे , अध्यक्ष , वल्ड अलायन्स बुद्धिस्ट , भदंत फ्रॉ . महा आर्यन ( थायलंड ) मास्टर मिचेल ली . ( जर्मनी ) , कॅप्टन नट्टाकिट , ( थायलंड ) , श्रीमती टिथीरड हेंगसाकुल ( थायलंड ) , श्रीमती पटचारपीमोल , यंगप्रपाकोर्ण ( थायलंड ) ,
श्रीमती उषा खोराना ( थायलंड ) , डॉ . उट्टीचाई वोरासिंग ( थायलंड ) , डॉ . थीन क्वांग ( जर्मनी ) , कु . मिथीला चौधरी ( थायलंड ) हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील . सदर परिषदेला पद्मश्री डॉ . सुखदेव थोरात , माजी अध्यक्ष , विद्यापीठ अनुदान आयोग , नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ . सुभाष चौधरी , महाराष्ट्र शासनाचे प्रधान सचिव डॉ . हर्षदीप कांबळे , समाज कल्याण आयुक्त डॉ . प्रशांत नारनवरे , नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी , मा . गिरीश गांधी आदी मान्यवर मार्गदर्शन करतील . दिनांक 3 ऑक्टोंबर 2022 रोजी दुपारी 2.00 वाजता दुसऱ्या सत्राचे आयोजन करण्यात आले असून या सत्राची विषय संकल्पना व भुमिका डॉ . पुरणचंद्र मेश्राम विशद करतील या सत्रात भंते विमलकिर्ती गुणसिरी ( प्रख्यात बौद्ध विचारवंत ) ,
डॉ . वेदप्रकाश मिश्रा ( कुलपती , कृष्णा मेडिकल विद्यापीठ , कराड ) डॉ . यशवंत मनोहर ( प्रसिद्ध साहित्यीक ) , प्रा . जोगेंद्र कवाडे ( लॉग मार्च प्रनेते ) , डॉ . शैलेंद्र लेंडे ( विभागप्रमुख , डॉ . आंबेडकर विचारधारा विभाग ) , डॉ . नीरज बोधी ( विभागप्रमुख , पाली प्राकृत विभाग ) , डॉ . एन एस गजभिये ( माजी कुलगुरू , सागर विद्यापीठ ) , डॉ . रुपाताई बोधी ( प्रसिद्ध विचारवंत ) , डॉ . विमल थोरात ( प्रसिद्ध विचारवंत ) , डॉ . अर्पणा लांजेवार ( प्राध्यापक , केंद्रीय विद्यापीठ हैदराबाद ) , श्रीमतीसंघमित्रा ढोके ( उपआयुक्त नागपूर ) , प्रा . सविता कांबळे ( पाली विचारक ) , प्रा . सरोज वाणी ( पाली विचारक ) , डॉ . पी . एस . खोब्रागडे , प्रा . प्रवीण कांबळे व मोहन वाकोडे आदी मार्गदर्शन करतील .
सदर परिषदेचा समारोप समारंभ सायंकाळी 5.00 वाजता आयोजित करण्यात आला असून मा . ना . नितीन गडकरी ( केंद्रीय मंत्री , भारत सरकार ) हे या समारंभाचे प्रमुख अतिथी राहतील . तसेच विशेष अतिथी म्हणून लोकमत वृत्तपत्र समूहाचे प्रमुख मा . विजय दर्डा , आमदार नाना पटोले ( अध्यक्ष , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ) आमदार चंद्रशेखर बावनकुळे ( अध्यक्ष , भाजपा , महाराष्ट्र प्रदेश ) माजी मंत्री अॅड . सुलेखाताई कुंभारे ( प्रमुख ड्रॅगन पॅलेस ) व मा . सिद्धार्थ हत्तीमारे यांना आमंत्रित करण्यात आले आहे . या परिषदेच्या आयोजन समितीत गगन मलीक फाउंडेशनचे अध्यक्ष मा . गगन मलीक हे मुख्य संरक्षक असून ते परिषदेचे स्वागताध्यक्ष राहतील . तसेच नागपूर विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ . पुरणचंद्र मेश्राम हे परिषदेचे संरक्षक असून ते परिषदेचे प्रास्ताविक करतील . सदर परिषदेचे आयोजन मा . गगन मलिक फाउंडेशनच्या वतीने तसेच रा.तु.म. नागपूर विद्यापीठाचे बौद्ध अध्ययन केंद्र , समाजकार्य महाविद्यालय , कामठी , स्वर्गीय हिराबाई बहुउद्देशीय शिक्षण संस्था व मातोश्री अंजनाबाई बहुउद्देशीय महिला विकास मंडळ या संस्थांच्या सहयोगाने करण्यात आ आहे .
सदर परिषदेचे आयोजन समितीत कु . सोनाली वाकडे , डॉ . निरज बोधी , डॉ . रूबीना अंसारी , डॉ . प्रा . वंदना इंगळे व डॉ . प्रा . राजश्री मेश्राम आदींचा समावेश आहे . भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात बौद्ध तत्त्वज्ञानाच्या माध्यमाने संपूर्ण देशात समता , स्वातंत्र्य , बंधुता व न्याय ही मानवी मूल्ये प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने व भारतात संवैधानिक संस्कृती निर्माण करण्याच्या दृष्टीने व्यापक कृती कार्यक्रमाचा मसुदा तयार करण्यासाठी सदर परिषद महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक ठरणार असून या परिषदेत अधिकाधिक संख्येने अध्यापक , संशोधक , विद्यार्थी व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजन समितीने केले आहे .
Leave a Reply