मोमीनपुरा, भालदारपुरा,तुळशीबाग भागात..
वीज चोरी करणाऱ्या ६७ जणांवर कारवाई
– मोहिमेत प्रादेशिक संचालक व मुख्य अभियंत्यांचा सहभाग
नागपूर – वीज चोरी करणाऱ्या विरुद्ध महावितरणची विशेष मोहीम सध्या जोरात सुरु असून मंगळवारी व बुधवारी या दोन दिवसात मोमीनपुरा,इतवारी,तुळशीबाग,गांजीपेठ भागात राबविण्यात आलेल्या मोहिमेत ६७ जणांवर कारवाई करण्यात आली.नागपूर शहर मंडलचे अभियंते,कर्मचारी यांचे विशेष पथक तसेच पाच भरारी पथकाच्या वतीने ही कारवाई करण्यात येत असून शहरात १० सप्टेंबर पर्यंत ही कारवाई सुरु राहणार आहे. या मोहिमेत प्रादेशिक संचालक सुहास रंगारी व मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी प्रत्यक्ष सहभागी होऊन वीज चोरांवर कठोर कारवाईचे आदेश दिले.
नागपूर शहरातील इतवारी व तुळशीबाग उपविभाग अंतर्गत येणाऱ्या सिरसपेठ,गुलाबबाबा झोपडपट्टी,भुतिया दरवाजा,किल्ला,कर्नालबाग,गांजीपेठ,भालदारपुरा,बुद्धा कि मिनारा, चित्रा टॉकीज, तकिया,नाल साहब चौक,कसाब पुरा इत्यादी भागात पोलीस बंदोबस्तात वीज चोरी विरुद्धची मोहिमेत राबविण्यात आली. या मोहिमेत वीज चोरी करताना आढळलेल्या ६७ जणांवर वीज कायद्याच्या कलाम १३५ नुसार कारवाई करण्यात आली. मोमीनपुरा येथे कारवाई सूर असताना प्रादेशिक संचालक सुहास रंगारी व मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी वीज चोरी मोहिमेची पाहणी केली. शहरातील इतर भागातही त्यांनी भेटी दिल्या.
नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशीक संचालक सुहास रंगारी यांच्या निर्देशनानुसार व नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या मार्गदर्शनाखाली व नागपूर शहर मंडलचे अधीक्षक अभियंता अमित परांजपे, महाल विभागाचे कार्यकारी अभियंता समीर टेकाडे, गांधीबाग विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल जीवतोडे यांच्या नेतृत्वात ही विशेष मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेत अभियंते अविनाश तुपकर, प्रसन्न श्रीवास्तव,राहुल चिंतलवार, सचिन तिवाडे,सचिन लांजेवार, विनोद सोनटक्के,अशित रामटेके,साशंक डगवार, अशोक कुमार ओझा,मनीष वाकडे,निशांत जनबोधकर, वर्षा गरहवाल, सशिम बागडे,प्रशांत गिरिपुजे, भरारी पथकाचे अभियंते विलास नवघरे, उमप, संजय मते,अमोल करंडे दिलीप फुंडे, अमोल बन्सोड,मंगेश ताकसांडे,राहुल चिंतलवार,तुषार मेंढे तसेच तांत्रिक कर्मचाऱ्यांनी मोहिमेत सहभाग नोंदविला.
Leave a Reply