विकास कामांना दिलेली स्थगिती तत्काळ हटवून कामे सुरू करा

विकास कामांना दिलेली स्थगिती तत्काळ हटवून कामे सुरू करा

  • उत्तर नागपूर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
  • आठ दिवसात विकस कामे सुरू होतील असे जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन

WH News – उत्तर नागपूर विधानसभा मतदार संघातील सन २०२१-२२ तसेच २०२२-२३ मध्ये कोट्यवधींच्या विकास कामांना विद्यमान सरकारने स्थगिती दिल्याने उत्तर नागपुरातील विकास कामे खोळंबली आहेत. यामुळे नागिरकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष पसरला आहे.

 

येत्या आठ दिवसात सर्व वर्क ऑर्डर झालेली तसेच टेंडर झालेली आणि प्रस्तावित विकास कामे सुरू करण्याची मागणीचे उत्तर नागपूर ब्लॉक काँग्रेस कमिटीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. यावर येत्या आठ दिवसात विकस कामे सुरू होतील असे आश्वासन जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी शिष्टमंडळाला दिले.

निवेदनात म्हंटले आहे कि, तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने सरकारद्वारे १ एप्रिल २०२१ ते जून २०२२ पर्यंत शासन निधीतील सर्व मंजूर लोकोपयोगी कामांना अध्यादेश काढून विद्यमान सरकारने स्थगिती दिली. याचा फटका विकास कामांना बसला असून संपूर्ण नागपूर शहरातील विकास कामे ठप्प पडल्याने सामान्य जनता त्रस्त झाली आहे. शहरातील विकास कामे थांबल्याने जनतेत असंतोष निर्माण झाला आहे.

नागपूर जिल्ह्याचा विचार करता सन २०२१-२२ तसेच सन २०२२-२३ मध्ये तत्कालीन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी विशेष प्रयत्नांती जिल्हा वार्षिक योजनेचा निधी वाढवून कोट्यवधी रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर केला होता. सदर निधीअंतर्गत जनतेशी निगडित विकास कामांना मंजुरी दिलेली असताना किंवा मंजुरीच्या विचाराधीन प्रस्ताव असताना आपल्या नवीन सरकारने या सर्व विकास कामांना स्थगिती दिली आहे. आपल्या सरकारच्या धोरणामुळे नागपूर शहरातील प्रत्येक क्षेत्रातील विकास कामे खोळंबली असून जनता त्रस्त झाली आहे.

तत्कालीन सरकारच्या कार्यकाळात मंजूर विकास कामांवरील स्थगिती त्वरित हटवून विकास कामे तत्काळ सुरू करावी, अन्यथा उत्तर नागपुरातील जनता रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असा ईशाराही निवेदनातून देण्यात आला होता. सदर मागणीचे निवेदन नागपूर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले.

या प्रसंगी शिष्टमंडळात उत्तर नागपूर काँग्रेस कमिटी ब्लॉक अध्यक्ष सुरेश पाटील, मुलचंद मेहर, दीपक खोब्रागडे, माजी नगरसेवक परसराम मानवटकर, उत्तर नागपूर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा कल्पना द्रोणकर, सतीश पाली, युवक काँग्रेसचे महासचिव आसिफ शेख, संतोष खडसे, उत्तर नागपूर युवक काँग्रेसचे अध्यक्ष निलेश खोब्रागडे, मागासवर्गीय सेलचे गौतम अंबादे, ओबीसी सेलचे चेतन तरारे, निषाद इंदूरकर, राकेश इखार आदी उपस्थित होते.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More posts