रक्तदान शिबिरात १२८ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक दायित्व निभविले
मंगरूळ दस्तगीर – स्थानिक पोलीस स्टेशन व हद्दीतील गणपती मंडळे, पोलीस पाटील,पत्रकार व लोकप्रतिनिधी तसेच श्रीसंत शंकर महाराज कला व वाणिज्य महाविद्यालय पिंपळखुटा, राष्ट्रीय सेवा योजना पथक यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित केले.यात एकूण १२८ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक दायित्व निभविले. रक्तदान हे सर्व श्रेष्ठ दान आहे.राज्यात रक्ताची कमी पडू नये या भावनेने सर्वांनी रक्तदान करावे असे आव्हान रक्त संकलन रक्तपेढी विभाग जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावतीचे डॉ.आशिष वाघमारे यांनी केले.
मंगरूळ दस्तगीर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सूरज तेलगोटे यांच्या पुढाकाराने हे शिबिर संपन्न झाले आहे.या शिबिराचे उद्घाटन मंगरूळ दस्तगीरचे ठाणेदार सुरज तेलगोटे यानी स्वतः रक्तदान करून या शिबिराचे विधिवत उद्घाटन केले.शिबिरात मंगरूळ दस्तगीर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सार्वजनिक गणपती मंडळाच्या युवकांनी तसेच परिसरातील युवकांनी रासेयो स्वयंसेवक यांनी हिरीरीने सहभाग नोंदवला.
महिलांचा उत्स्फूर्तपणे सहभागही महत्वपूर्ण होता.रक्त संकलन रक्तपेढी विभाग जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावतीचे डॉ.आशिष वाघमारे डॉ. राहूल खराटे श्री धीरज बोबडे श्रीमती संगीता गायधने यांच्या मार्गदर्शनाखाली चमूने केले.शिबिराच्या यशस्वीतेंकरिता रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.नरेश इंगळे,सहायक कार्यक्रम अधिकारी प्रा श्यामला वैद्य, प्रा सुषमा थोटे तसेच स्वयंसेवक स्वयंसेविका यांनी परिश्रम घेतले. दरम्यान शिबिराला प्राचार्य डॉ. सुभाष मुरे श्री संतोष नागपुरे प्रा. विजय कामडी यांच्या सह पोलीस विभाग अधिकारी/कर्मचारी विविध गणपती मंडळाचे अध्यक्ष स्थानिक लोकप्रतिनिधी,पत्रकार आदींनी सदिच्छा पूर्वक भेटी देऊन समाधान व्यक्त केले.
रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ नरेश इंगळे यांनी पोलीस विभागाचे कर्मचारी गणपती मंडळ पदाधिकारी पत्रकार गावकरी आणि सर्व रक्तदाते यांचे आभार मानलेत.
Leave a Reply