दवलामेटीमध्ये संविधान दिवसानिमित्त भिम शक्ती युवामंचतर्फे दोन दिवसीय समाजप्रबोधन कार्यक्रम
दवलामेटी | WH NEWS प्रतिनिधी
भिम शक्ती युवामंच दवलामेटीच्या वतीने 2014 पासून सातत्याने संविधान दिवसानिमित्त समाजप्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. त्याच परंपरेनुसार याही वर्षी 26 व 27 नोव्हेंबर 2025 रोजी ग्रामपंचायत समोरील मैदानावर दोन दिवसीय व्याख्यान व भिमगीत समाजप्रबोधन कार्यक्रम उत्साहात पार पडला.
पहिला दिवस : 26 नोव्हेंबर संविधान व बाबासाहेबांवरील व्याख्यान
पहिल्या दिवशी व्याख्याते मा. जितेंद्र दादा आसोले यांनी “संविधान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनकार्य” या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात महामानव बुद्ध, राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, माता सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज, बिरसा मुंडा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई आणि साहित्यारत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना पुष्पमाला अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.
मुंबई 26/11 दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना तसेच मालेगाव,नाशिकमधील चिमुकली यज्ञा जगदीश दुसाने हिला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून राजेश तटकरे, वरिष्ठ पोलीस अधिकारी वाडी पोलिस स्टेशन होते. अध्यक्षस्थानी ममताताई धोपटे, माजी जि.प. सदस्य होत्या. प्रमुख उपस्थितीत माजी सरपंच रिताताई उमरेडकर, रक्षाताई सुखदेवे, सरला चिमोटे, ग्रामविकास अधिकारी माधुरीताई खोब्रागडे तसेच प्रतिष्ठित समाजसेवकांची उपस्थिती होती.
दुसरा दिवस : 27 नोव्हेंबर – ‘भिमक्रांतीचा बुलंद आवाज’ विकास राजा यांचे भिमगीत समाजप्रबोधन
दुसऱ्या दिवशी विकास राजा यांच्या भिमगीत समाजप्रबोधन कार्यक्रमाने वातावरण भारावून गेले. सामाजिक जागृतीचे संदेश देणाऱ्या गीतांनी उपस्थितांना प्रेरित केले.
या कार्यक्रमात ममताताई धोपटे, सरपंच गजानन रामेकर, रिताताई उमरेडकर, छायाताई खिल्लारे, रक्षाताई सुखदेवे, रोशन मेश्राम यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचे यश वाढवले. विशेष सहयोग कैलास बन्सोड, तिरुपती गद्दमवार, भारत सहारे, पवन गुरव, स्कायटेक बिल्डकॉनचे आकाश भारद्वाज, राकेश निकोसे यांनी दिला.
कार्यक्रमाचे आयोजन
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भिम शक्ती युवामंचचे निकेश सुखदेवे, स्वप्निल चारभे, शुभम भालाधरे, समीर सहारे, शुभम गजभिये, अमोल भातुकुलकर, सौरभ नाईक, संगीत करार, राहुल मोडघरे, रोहित राऊत, उमेश सुखदेवे, राज बागडे, वैभव तिरपुडे, विनय गवई, राजू ढोके आणि सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.
प्रास्ताविक रिताताई उमरेडकर यांनी केले तर संचालन उषाताई चारभे यांनी केले.आभार : शुभम भालाधरे वैभव तिरपुडे यांनी मानले.
गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
दोन दिवसीय कार्यक्रमाला दवलामेटी ग्रामस्थांनी मोठा प्रतिसाद देत समाजप्रबोधनाच्या या उपक्रमाला भरभरून दाद दिली.
