विश्व आदिवासी दिनानिमित्त जय बिरसा आदिवासी विकास सोसायटी लाव्हा तर्फे भव्य रॅलीचे आयोजन

0
103

 


विश्व आदिवासी दिनानिमित्त जय बिरसा आदिवासी विकास सोसायटी लाव्हा तर्फे भव्य रॅलीचे आयोजन

वाडी लाव्हा – विश्व आदिवासी दिनाच्या औचित्याने जय बिरसा आदिवासी विकास सोसायटी लाव्हा यांच्या वतीने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीची सुरुवात आंबेडकर नगर येथे बाबासाहेब डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून करण्यात आली. त्यानंतर लाव्हा येथे बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस माल्यार्पण व ध्वजवंदन सोहळा पार पडला.

यानंतर सोनबा नगर येथे कुवारा भिवसन पेन यांची पूजा करण्यात आली आणि बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. शेवटी टेकडी वाडी येथे बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे अनावरण करून कार्यक्रमाची सांगता झाली.

या रॅलीत सुखलाल भलावी, दिनेश उईके, सचिन सलामे, विनोद करनाके, महेश धुर्वे, श्रावण कुळमते, बुधारामजी कोवाचे, वाढवेजी, भोजराजजी पुसाम, रमेश सलामे, कपील पुसाम, सौरभ वरठी, बोरकरजी, धनपालजी मरसकोल्हे, महेशजी कुरसंगे, रेखलाल खंडाते, प्रमोद वरठी, जगदिश मरकाम, मनीश उईके, कठोतेजी, यशोदाबाई मडावी, शारदाताई मर्सकोल्हे, इंदिराताई कुरसंगे, रेखाताई कोडापे, पेंदामताई, दुर्गाताई कुरसंगे, ललीताबाई कोकोंडे, शिलाबाई पुसाम, शोभाबाई सलामे यांच्यासह मोठ्या संख्येने आदिवासी बांधव व भगिनी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामुळे लाव्हा परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.


 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here