काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी राजेश लाडे यांची नियुक्ती

0
119

काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी राजेश लाडे यांची नियुक्ती

नागपूर, – कॉंग्रेस पार्टीच्या अनुसूचित जाती विभाग महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदी राजेश लाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती अ.भा.काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश लिलोठिया यांनी केली. लाडे यांच्या सोबत अनेकांची नियुक्ती अनुसूचित जाती विभागाच्या प्रदेश कार्यकारणीत करण्यात आली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लाडे यांची नियुक्ती महत्त्वाची मानली जाते.

प्रदेश अनुसूचित जाती सेलच्या माध्यमातून वंचित, शोषित नागरिकांच्या समस्या, अडी-अडचणीचे निराकरण करण्याचा प्रयत्न आणि मिळालेल्या संधीच्या माध्यमातून तळागाळापर्यंत काँग्रेस ची विचारधारा आणि अनुसूचित जातीशी निगडित नागरिकांच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य देणार असल्याचे राजेश लाडे म्हणालेत.

 

लाडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे कार्याध्यक्ष म्हणून दीर्घकाळ कामकाज यशस्वीरीत्या सांभाळले असून राज्यभर पदाधिकारी-कार्यकर्त्यांचे नेटवर्क उभारले आहे. सुशिक्षित, अभ्यासू, संघटन कौशल्य आणि दांडगा जनसंपर्क असलेला चेहरा म्हणून ते राज्यभर सुपरिचित आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here